खंत :आपलं काही चुकतंय का...?

बालविकास

"चिंटूच्या शाळेत आज आजोबांना बोलावले होते, "प्राध्यापिका जरा रागातच, आई वडील कुठे आहेत याचे..?त्यांनाच बोलावले होते...! जर आई वडील असे बेजबाबदार वागले, तर कसे चालेले. मुलाचं भवितव्य कसे घडेल.कशी घडणार आजची पीडी,  आणि चष्मा काढून पुसू लागल्या.

आजोबा आणि चिंटू एकमेकांकडे पाहत होतें. चिंटू थोडा घाबरलाच होता.




आजोबा म्हणाले,"त्याचे आई वडील दोघेही कंपनी च्या कामानिमित्त बाहेर गेलेत,राहिलो  मी आणि माझी बायको. तिला काही दिसत नाही म्हणून मला यावे लागले, आणि कोण सांगणार या नवरा बायकोला मुलांकडे लक्ष द्या. त्यांना वाटते चांगली शाळा बघून  अवाढव्य फी भरली कि झाले मोकळे...!

आजोबा चिंटूकडे  रागातच बघत हो
बघा कसा याला जाग्यावर आणतो ते शाळेत मोबाईल वर गेम्स खेळतोस.
मोबाईल तुला मिळाला कोठून...? चल घरी कसे फटके देतो बघ आता.

आजोबा जरा रागातच प्राध्यापिकान समोर बोलले.

प्राध्यापिका, "त्याला फटके देऊन काही होणार नाही.. एक दोन वेळा तो ऐकेल आणि परत तो कोडगा होईल . तो लहान आहे त्याला समजून सांगितले पाहिजे तेव्हा तो ऐकेल.
आणि त्याचे आई वडील आले कि माझ्याकडे पाठवून द्या. मी त्यांच्याशी बोलेन, त्याच्या मार्क्स बद्दल.

तुम्ही जाऊ शकता,प्राध्यापिका आजोबांना म्हणाल्या.

ते दोघे रूम मधून बाहेर पडले . आजोबा खूप समजावून सांगतात,"बाळा बघ तुझ्या मॅडम पुढे मला आज मान खाली घालावी लागली...!  तू आज अभ्यास करून चांगले गुण मिळवले असते तर आज मी ताट मानेने शाळेत आलो असतो. यापुढे तू मोबाईल घेणार नाहीस ना?
चिंटू, नाही आजोबा
शाळेत गेम्स खेळणार का?
चिंटू, नाही आजोबा.



आजोबा माझं खूप चुकलं हे तुम्ही बाबांना प्लीज सांगू नका,  नाहीतर मला बाबा खूप मारतील. मला आज माझी चुकी कळाली हे आधीच जर कोणी मला सांगितलं असत तर,मी एवढ् मोबाईलच्या आहारी गेलो नसतो. मला माफ करा.. !आजोबा मी पुन्हा नाही असं वागणार.


आजोबा, "नक्की ना...! मी नाही बाबा ना सांगणार... !   चल तुझ्यासाठी आज तुझ्या आवडीची  मिठाई घेऊ.

तसें  पाहिलं तर त्याची काहीच चुक नसते . त्या वेळेस त्याला समजून सांगितले असते तर आज अशी वेळच आली नसती . त्याच्याकडे लक्ष देईला आईवडिलांना वेळ नसल्याने आज ही वेळ आली.

                  एक आठवड्यानंतर त्याचे आई बाबा घरी येतात. रविवार असल्यामुळे सगळेजण घरी असतात. तेव्हा त्यांची थोरली मुलगी म्हणजे रिया च्या कॉलेज मध्ये पालक संमेलन ठेवलेले असते, आणि तती आई बाबांना तसें सांगते.दुपारी 1 वाजता, आपण सगळे जाणार आहोत असेही बोलते.

दुपारी 1वाजता सर्वजण कॉलेज मध्ये जाण्यासाठी  निघतात. कॉलेज मध्ये आनंदी वातावरण असते. सर्वजण आपल्या आई वडिलांविषयी सांगत असतात.



रिया उठते सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात, आणि माईक घेऊन ती  बोलू लागते. मला तर आठवतच नाही कि मी आई बाबान शी मनमोकळपणाने कधी बोलले....!
यांना कधी लॅपटॉप, मोबाईल मधून वेळ तरी मिळाला पाहिजे आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात.
लगेच श्रेया तिला साथ देत  तिच्या हातून माईक घेऊन बोलू लागते. हे विसरूनच गेलेत, हे विसरूनच गेलेत कि, एवढ्या मोठया फ्लॅट मध्ये आम्ही ही असतो.


हे पैसे कमवतात आपल्यासाठी,  पण यांनी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे कि,  आमचे बालपण, तरुणपण पुन्हा येणार आहे का...?आम्ही कोणाबरोबर मनमोकळ करून बोलायचं.
पैसा म्हणजे सर्वसुख आहे का..?


क्लास मधील सर्वात हुशार मुलगी प्रीती सगळ्यांना आवडणारी गोड मुलगी स्टेज वर येते आणि बोलू लागते,
 
माझे बाबा खूप वेगळे आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ ही असतो. मी त्यांच्याशी मनमोकळे पणाने बोलते ही. ते माझा सर्व हट्ट आणि लाड पुरवतात.

तिच्या बोलण्यामुळे पालकांनमध्ये एका जणांच्या डोळ्यात पाणी येते आणि ते गृहस्थ माईक मागतात आणि बोलू लागतात.
              "आज माझे खरे डोळे उघडले ते माझ्या मुलीमुळे... प्रीती माझी मुलगी आहे.

माझा व्यवसाय असल्यामुळे माझ्याकडे कुटूंबाला कधीच वेळ देऊ शकलो नाही. प्रीती ला नेहमीच मुलगी म्हणून तुचतेची वागणूक दिली.                                           

"किती वेळा तरी तिने माझा मारही खाल्ला असेल. तिचे मी कधीच हट्ट लाड पुरवले नाही. हिच्यासाठी माझ्याकडे कधीच वेळ नव्हता. आज माझ्या मुलीमुळे माझे डोळे उघडले. तिचे वडील तिची माफी मागतात. प्रीती पळत जाऊन बाबाच्या गळ्यात पडते.


                     आता मॅडम बोलू लागतात,
आजच्या पालक स्नेहसंमेहन  घेण्याचे कारण म्हणजे पालक आणि मुलांच्यात वाढलेला दुरावा हेच मूळ कारण होत.


आपण आज नव्या पिडीच्या नावाने खापर फोडतो, "कि यांना फक्त मोबाईल फेसबुक, व्हाट्सअप यातच त्यांचं आयुष्य चालय,  पण हा विचार केला का कोणी.... ! "कशामुळे यांना मोबाईल चे व्यसन लागलय..? यात एकच कारण आहे ते म्हणजे आपण एकत्र राहतो पण आपल्याला एकमेकांनासाठी वेळच कुठे असतो.....!यामुळे मुले एकलकोंडी होऊन चॅटिंग, फेसबुक, व्हाट्सअप यामध्ये गुंतले गेलेत.

आई वडिलांनी मुलाशी बोलले पाहिजे, त्यांच्या बरोबर आज काय घडलं आज...! शाळेत काय शिकवले....! अशाप्रकारे त्यांच्याशी बोलून त्यांना बोलत केल पाहिजे. यामुळे मुलांना आई वडिलांच्यात मित्र आणि मैत्रीण दिसून येईल.

आपण काच पुसताना तिला तडा जाऊ नये ज्या प्रकारे त्याची काळजी घेतो तशीच लहान मुलांचे संगोपन करताना ही घेतली पाहिजे .
जसे आपण देवावर विश्वास ठेवतो. तसेच आपल्या मुलांना आईवडील हेच देव असतात.

         आणि सुरुवात करतात कहाणी सांगायला,
"  सखू हिच्या नशिबी फक्त गरिबी. घरोघरी जाऊन ती धुण्या भांड्याची कामे करत.आयुष्य कष्टत चालेले पण त्यात ही यश  नाही. 

नवरा नेहमीच दारूच्या नशेत. त्याची कधीच साथ नाही. तिलाच मारहाण करून तिच्याकडून पैसे घेत. तिला आता या गोष्टीचा कंटाळा आला होता. ती कंटाळून छोट्या मुलीला घेऊन नदीत उडी मारायला जाते. नदीच्या ठिकाणी पोहचल्यावर मुलीच्या गळ्यात पडून खूप रडते., "शेवटी मुलगी बोलते आई तू रडू नकोस मी तुझं ऐकणार तुला त्रास नाही देणार. मुलीची निरागस पणा बघून सखूला अजूनच रडायला येते. तिला एवढे पण माहित नसते कि या नदीत उडी मारली कि आपण या जगातच राहणार नाही.


             याचप्रमाणे मुले ही चिखलाचा गोळा असतात. त्यांना जसा आकार आईवडील देतात तसं ते घडतात.

पुढे मॅडम बोलतात,
त्यामुळे आजपासून मुलांना आपल्या आईवडिलांच्यात मित्र आणि मैत्रीण दिसली पाहिजे.तुम्हाला काय वाटतंय.बदल घडवायला सुरुवात आपल्यापासूनच करूयात....!!

               हो नक्कीच... !  सगळेजण ओरडतात.

मुलांना चांगलं घडवण आजच्या काळात खूप गरजेचे आहे. मुलं आपलं ऐकत नाही असं आपण सांगतो, पण तो आपलाच अपमान असतो. कारण आपली मुलं आपल्यालाच ऐकत नाहीत हे किती आपलं दुर्भाग्य आहे. मुलांना मोबाईल देऊन चारणे, तू असे कर मी तुला हे खेळणं देतो असं म्हणून आपणच त्यांना वाईट सवयीना प्रवृत्त करत असतो.त्यामुळे मुलांना योग्य शिकवण देणे आईवडिलांच्याच हातात असते.


              *****       समाप्त   *****




©️®️komal ranjeet Dagade.