हिरव्या मेथीचे भजे

हिरव्या मेथीचे भजे


हिरव्या मेथीचे भजे

बाजारात छान हिरवी मेथीची भाजी आली आहे .
चला मग हिरव्या मेथीचे भजे बनवू .

साहित्य : - हरबऱ्याची डाळ १ वाटी ( चण्याची डाळ ) , हिरवी मेथीची भाजी 1वाटी ( तोडून ,धुऊन, चिरून ) हिरव्या मीरच्या ३ -४ , तिखट 1 चमचा ,आख्खे धणे १ चमचा ( coriander seed ) मीठ , आवडत असल्यास धणे - जीर पावडर १ चमचा .

कृती : - हरबऱ्याची डाळ ( चण्याची डाळ ) तीन वेळा धुऊन सहा तास भिजवून घ्यावी .
डाळ भिजल्यावर जास्तीच पाणी काढून बारीक वाटून घ्यावी .

वरील वाटलेल्या डाळमधे कापलेली मेथीची भाजी , हिरवी मीरची बारीक कापून , तीखट ,आख्खे धणे , मीठ , धणे- जीरे पावडर सर्व घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे .

( वाटलेल्या डाळमधे भाजी पहिले थोडी घालून गोळा बनवून बघावा , त्यानुसार भाजी घालावी .)

( भाजी जास्त पडल्यास दोन चमचे बेसन पीठ घालावे )

वरील मिश्रणाचे थोडासा दाब देऊन छोट्या लाडू सारखे भजे बनवून तळून घ्यावे .

यात मेथीचे भाजीचे पान लाडू सारख करताना दाबले जातात त्यामुळे भजे कडू लागत नाही .

गरमागरम भजे तळलेल्या मीरची सोबत खायला घ्यावे .


Veena 


********

Like , Comment ,Share करा