Jan 26, 2022
नारीवादी

#आईच लग्न...

Read Later
#आईच लग्न...
ऑक...ऑक..  आ***ई.. गं.....शांभवी खाली पडत पडत उद्गारली...

जवळच असलेल्या शार्दुलने शांभवीला पकडलं.. पण शांभवीची अवस्था पाहून घरच्या सगळ्यांना प्रश्न पडला..? नेमकं काय झालं असेल शांभविला..? सगळ्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसत होत.. शरद ने गाडी काढली आणि सगळेजण दवाखान्यात पोहोचले.. तिथे गेल्यावर शांभवीला लग्नाआधीच दिवस गेलेत हे समजले.. तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.. एवढी गुणी, नवसाने मागितलेली माझे लेक.. अशी वागुच शकत नाही.. हसत्या- खेळत्या घराला कुणाची नजर लागली..? असं सर्वांना वाटू लागलं..


शांभवी मात्र आई-वडिलांच्या नजरेला नजर मिळवू शकली नाही.. शार्दुलने आपल्या बहिणीला जवळ घेऊन प्रेमाने विचारलं, तेव्हा तिने सुरजचं नाव सांगितलं.. क्षणाचाही विलंब न करता शार्दुल आणि शांभवी सुरजच्या घरी पोहोचलो.. श्रीमंत घरातला सुरज शांभवीच्या मनाची घालमेल समजू शकला नाही..त्याने सरळ अबोर्शन करण्याचा शांभवी ला सल्ला दिला.. रागाने लाल झालेला शार्दुल शांभवी खातर शांत बसला.. खिन्न होऊन शांभवी घरी परतली.. घरच्या सगळ्यांनीही शांभवीला अबोर्शन करण्याचा सल्ला दिला..


शांभवी ने मात्र मनाशी ठरवलं होतं, माझ्या चुकीची शिक्षा या निष्पाप जीवाला का द्यायची..? नवरात्र उत्सव चालू असतो.. शांभवी म्हणाली, "आई जगदंबेचीच ही इच्छा असेल, मी या बाळाला जन्म  द्यावा अशी.. तिचाच आशीर्वाद असेल माझ्या बाळाच्या पाठीशी.. शांभवी बोलत असताना जणू तिच्यातील दुर्गा मातृत्वाच्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे असं सर्वांना वाटलं.. शांभवी चा तो प्रचंड आत्मविश्वास पाहून आई-बाबांनी ही ते मुल या जगात आणण्यास परवानगी दिली..


शांभवीने मात्र सर्वांकडून वचन मागितले, की तिचं होणारं बाळ वडिलांचे नाव विचारेल, तेव्हा कोणीही त्याला त्याच्या वडिलांचे नाव सांगणार नाही.. सर्वांनी वचन पाळण्याची ग्वाही दिली.. नऊ महिने, नऊ दिवस आणि त्यानंतर बाळंतपणातील त्या असह्य वेदनांवर विजय मिळवत शांभवी ला कन्यारत्न प्राप्त झाल..नवरात्रातली दुर्गा रूपातली शांभवी आत्मविश्वासाने बोलली होती; म्हणून कन्येचे नाव \"दुर्गा\" ठेवण्याचं सर्वांनी ठरवलं.. दुर्गा डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करू लागली..
योगायोगाने सुरज म्हणजे ज्याने शांभवी ला फसवलं होतं.. तो त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला.. दारूच्या नशेत गाडी चालवताना गंभीर जखमी झाला होता.. रात्रभर जागून दुर्गा या व्यक्तीला शुद्धीवर आणत होती, हे पाहून शार्दुल निशब्द झाला.. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.. ज्याने दुर्गाला गर्भातच मारा असं सांगितलं होतं तोच आज तिच्या हातून वाचला होता..


शुद्धीवर आलेला सुरज न सांगताच सर्व काही समजून गेला.. सुरज स्वतःला "राक्षस" म्हणून घरी जाऊन आई बाबांजवळ मोठमोठ्याने रडू लागतो.. दुसऱ्या दिवशी सुरजचे आई- बाबा शांभवीच्या घरी येऊन तिची माफी मागतात.. सूरज ने केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नव्हताच ; एवढा चुकीचा तो वागला होता.. पण एक्सीडेंट नंतर त्याच्यातील राक्षस दुर्गेकडून मरण पावला आहे.. आता तोही माणूस झालाय बघ.. तुझी इच्छा.. क्षमा कर त्याला.. असे म्हणून आई-वडील निघून जातात..


दुर्गा म्हणते, "आई तुझं दुर्गा, सरस्वती, महिषासुरमर्दिनी... अशी कितीतरी रूप मी पाहिली आहेत.. आज मला तुला लक्ष्मीच्या रूपाने बाबांना स्वीकारताना पाहायचंय.. माफ कर त्यांना.. सगळ्यांनी समजल्यावर शांभवी सुरज सोबत लग्नाला तयार होते.. आणि लक्ष्मीच्या रूपाने सासरी जाते..

सौ. प्राजक्ता पाटील..
लेख आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

प्राजक्ता पाटील

Teacher

Reading And Writing is my Passion....