Jan 26, 2022
नारीवादी

ग्रहण

Read Later
ग्रहण
आज कुलकर्णी फॅमिली ट्रिपला चाललीय मुंबई पहायला..
  रुही, अमित..ते बघा किती माकडं आहेत बाजूच्या झाडांवर.. रुही खिडकीच्या बाहेर पूर्ण तोंड नको काढुस ..
या माळशेज घाटात तुम्हाला आजू बाजूला धबधबे ,पक्षी आणि माकडं खूप पहायला मिळतील... मालती खूप आनंदाने तिच्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत आजचा दिवस एन्जॉय करत होती...

अमित - बाबा ,माधुरीचं ये मौसम का जादू है मितवा हे गाणं लावा ना ...

बाबा - तू आणि तुझी आई दोघेही या माधुरीसाठी वाट्टेल ते कराल , त्यामुळे गाणं लावावं लागणारच...

रुही - काय ओ बाबा तुम्ही एवढं घाबरता आईला ,मला वाटलं तुम्ही मस्त हॉलिवूड सोंग्स लावताल आपलं ऑल टाईम फेवरेट "Let me love you " लावा आणि या भैताडाचं नका ऐकू काही..

अमित - गपे डुचके, आई सांग गं हिला जेव्हा मधुरीचा प्रश्न असतो तेव्हा मी दुसरं काहीही ऐकून नाही घेत..

आई - अहो तुम्ही गुपचूप मौसम का जादू है मितवा लावा बरं का..

बाबा - जी सरकार...


ठण्डी ठण्डी पुरवैया में उड़ती है चुनरिया,
हे धड़के मोरा जिया रामा बाली है उमरिया

दिल पे, नहीं क़ाबु कैसा, ये जादू
ये मौसम का जादू है मितवा
न अब दिल पे क़ाबू है मितवा
नैना जिसमें खो गये दीवाने से हो गये
नज़ारा वो हर सू है मितवा
ये मौसम का जादू है मितवा

गाण्याच्या ठेक्यावर आई आणि अमित दोघेही मागच्या सीटवर बसून मस्त नाचत असतात, तर वैतागलेली 13 वर्षांची रुही तिच्या 10 वर्षाच्या लहान भावाला तोंड वाकडं तिकडं करून त्याला चिडवत होती..

रुही - अय बायकू बाई सारखा का नाचतोय ,मुलगी आहे का तू ?..

अमित - आई हिला सांग बरं.. नाहीतर हिला लय बदडवेल मी..


रुही - हात तर लावून दाखव

अमित - अस्स ? बघ मग आता मी काय करतो

अमित ने पुढच्या सीटवर बसलेल्या रुहीचे केसं ओढले त्यामुळे रुही पण चिडली ती सुद्धा अमितला मारू लागली,मालती दोघांना शांत करायचा प्रयत्न करत होती..

       माळशेज घाटात रस्ते खुप अरुंद असतात, त्यात दिवस सुद्धा पावसाळी सुरू होते, समोरून भरधाव वेगात एक ट्रक चुकीच्या दिशेने आला त्या ट्रक ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात यांची गाडी रोडच्या एकदम कडेला आली आणि गाडीचे पुढील दोन चाक रोडच्या बाजूला गेले त्यामुळे गाडी आता खोल दरीत कोसळणार हे निश्चितच होते... अचानक आलेल्या या संकटामुळे सगळे खूप घाबरले , रुही रडायला लागली...

बाबा - रुही रडू नकोस ,काही नाही होणार... मालती तू दरवाजा उघडून अमितसोबत बाहेर उतर.. मी रुहीचा सीटबेल्ट काढून आम्ही बाहेर येतो...

      त्यांची गाडी एका साईडने लवंडत होती, अमित आणि मालती दोघे गाडीच्या बाहेर पडले... अमित रडू लागला त्यामुळे घाबरलेली मालती त्याला शांत करत होती तोच गाडीचा तोल सुटला आणि गाडी एका झटक्यात खोल दरीत दूरवर कोसळली...जोरात ब्लास्ट झाला .. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी तिथे अपघात पाहण्यासाठी गर्दी केली होती... मालतीला कळत नव्हतं की स्वतःला सांभाळू की घाबरलेल्या अमितला... बघता बघता क्षणात होत्याचं नव्हतं झालं... राजा राणीचा सुखी संसार त्या अपघातात मोडला गेला...             बिचारी मालती, तिला सासर होतं.. दिर, भावजय आणि सासूने तिला तिच्या मुलासोबत तिच्या माहेरी पाठवून दिलं.. तेव्हा तिला कळलं की घरातील आपला नवरा आणि मुलं सोडली तर दुसरं कोणीच आपलं नव्हतं .. जिथे तिची सासर ची माणसं तिला या कठीण काळात मदतीला आली नाही तिथे बाहेरची लोकं कसकाय मदत करतील म्हणून तिने तिच्या आईच्या घरी राहून स्वतःला लहानग्या अमितसाठी बदलवायचं ठरवलं... ती कथ्थक मध्ये प्रवीण होती त्यामुळे तिने डान्स क्लासेस शिकवायला सुरू केले, शिवाय फावल्यावेळात शिवणकाम सुद्धा ती करायची...तिचं ध्येय एकच होतं की अमितला स्वतःच्या पायावर उभा करायचं.. त्याचं जीवन समृद्ध करायचं... अमितला सुद्धा परिस्थितीची जाणीव होती इतक्या लहान वयात त्याच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरवलं होतं.. मालती जेव्हा तिच्या क्लासला येणाऱ्या मुलींना डान्स शिकवायची तेव्हा आपसूकच अमितचे देखील पाय तालावर थिरकायचे ..शेवटी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते खरंच असतं.. अमित सुद्धा रोज आईकडून डान्स शिकू लागला.. कथ्थक आणि लावणी हा अमितचा आवडता डान्स प्रकार ,शाळेत असताना गॅदरिंग मध्ये अमितची लावणी पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी असायची ... जेवढा अमित लावणी करताना साडीत सुंदर दिसायचा तेवढाच तो शर्ट पॅन्ट मध्ये देखणा रुबाबदार दिसायचा... त्याची आई त्याची दुसरी मैत्रीण होती त्यामुळे प्रत्येक गोष्ट तो आईसोबत शेअर करायचा... त्याच्या किशोर वयात त्याला कळलं की तो समलैंगिक आहे त्याला  दुसऱ्या मुलांप्रति आकर्षण आहे .. त्याने ही गोष्ट जराही न संकोच करता आईला सांगितली... मालतीला देखील अमित शिवाय कोणी नव्हतं त्यामुळे तिने  मुलाच्या या भावनांचा आदर केला आणि त्याला समजून घेतलं...


      आज अमितचा दहावीचा निकाल होता सकाळ पासून मालती आणि अमित दोघेही खूप चिंतेत होते... अमित जो दुपारी 12 वाजता निकाल पाहण्यासाठी घरातून गेला तो  दुपारचे 4 वाजले तरी आला नव्हता मालती खूप टेन्शन मध्ये आली होती... आपल्या हळव्या मुलाने निकाल चांगला नाही लागला म्हणून विपरीत काही केलं तर नसेल ना?.. यामुळे तिच्या मनाची घालमेल चालू होती, अमितच्या मित्रांना कॉल केला पण कोणीही उचलला नाही ...शेवटी तिने घराला कुलूप लावलं आणि अमितला शोधण्यासाठी बाहेर पडली, तोच अमित आणि त्याचे मित्रमंडळी पेढ्याचा बॉक्स घेऊन दारात उभे होते..

आई आई आई हे बघ हा घे कंदी पेढा...अहो काकू तुमचा अम्या आपल्या गावात पहिला आलाय... हो आई मी शाळेत आणि गावात पहिल्या नंबर ने पास झालोय... मालतीच्या आनंदाला पारावार नव्हता तिला सगळं अभाळ ठेंगणे झाल्या सारखं वाटू लागलं...

मालती - तो इस बात पर हो जाए पार्टी ..
अमित - with अपनी फेवरेट माधुरी..
मालती - जी हुजूर जरूर...

मालती आणि अमित ने मधुरीचा नवीन आलेला चित्रपट लावला... दोघेही मस्त पिझ्झा खात खात पिक्चर बघत होते तोच त्या मूवी मधलं घर मोरे परदेसिया गाणं लागलं आणि अमितचे पावलं त्या तालावर थिरकू लागले... अमित ने पायात घुंगरू बांधले आणि एक गर्रकन गिरकी घेऊन तो भिंगरी सारखं गोल गोल फिरत आलिया जशी नाचते तसंच  त्या नजाकता आणि अदाकारीने नाचत होता...


रघुवर तेरी राह निहारें
रघुवर तेरी राह निहारें
सातों जनम से सिया

घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया
घर मोरे परदेसिया
आओ पधारो पिया

ता दी या ना ता दे रे ना दुम
ता दी या ना ता दे रे ना धीम
ता दी या ना ता दे रे ना धीम
ता दा रे ना दे धीम ता दा नि

तेवढ्यात त्याच्या घरात एकजण शिरला, दिसायला गोरापान मस्त मर्दानी बॉडी जणू स्वर्गातून मादक मुखडा खाली आलाय असं वाटलं... अमित ने शेवटच्या स्टेपला जोर्यात  गिरकी घेतली आणि तो  पडणारच तोच त्या व्यक्तीने अमितला धरलं... दोघेही दोघांच्या नजरेला नजर भिडवून बघत होते....

एक चितवन में ज्योति ऐसी ,
मन आंगन हो जग मग जग मग ,
मोह की मारी एक कुमारी ,
कि पग होए ड्ग मग डग मग ,
तार जिया के छेड़ रही है , प्रीत की अठखेलियां

मालती ने अमितच्या डोळ्यात राज विषयी जे पाहिलं ते तिला नाही आवडलं... हो राज पाटील होता तो गावातील सावकाराचा मुलगा...गावात दहावीत पहिल्या नंबर ने पास झालेल्या मुलाला पाहण्यासाठी आणि गुलाबपुष्प देण्यासाठी तो आला होता... अमित त्याच्या पासून बाजूला झाला.. आणि मालती जवळ गेला...अमितच्या पायातील वाजणारे ते घुंगरू राज टकमक पाहतच  होता तोच ...

Oops सॉरी मी काढतो घुंगरू...

अमित खाली बसून घुंगरू काढत होता...

मालती - अहो थोरले पाटील तुम्ही इकडं कुठं वाट चुकलात...

राज - अहो तुमच्या पोराचं कौतुक करण्यासाठी आलोय मी .. हे घ्या मिठाई ..

मालती - अहो याची काय गरज होती..

राज -असं कसं काकू.. तुमचा अमित एवढा हुशार आहे म्हंटल्यावर त्याचं कौतुक करायला हवं ना ... आणि हो तुम्ही त्याच्या पुढील शिक्षणाची काळजी करू नका..

मालती - नाही तुम्ही अजिबात मदत करू नका, अमितची आई आहे अजून अमितसाठी खंबीर... या स्वाभिमानामुळेच तर मी आज एकटीने सगळं जपलं..

राज -बरं राहिलं आम्ही नाही करणार मदत त्याला , पण आपल्या गावात प्रत्येक यशवंत मुलाला स्कॉलरशिप आपण देतो निदान ती तरी घ्यायला हवी तुम्ही, त्यावर तुमच्या अमितचा अधिकार आहे आणि त्याने तो मेहनतिने मिळवलाय...

राज निघून जातो, आई किती चांगला मुलगा आहे ना हा राज , श्रीमंतिचा अजिबात माज नाही त्याला, अगदि साधा राहतो त्याच्या राहणीमायावरून तरी तसंच दिसतं..

आई - भोळा गं माझं लेकरू.. अरे राहणीमाना वरून समोरचा कसा आहे हे कधी ठरवू नये... हे बघ अमित मला माहित आहे तुला मुलं आवडतात पण बेटा जर कोणी विनाकारण जवळीक केली किंवा काळजी करू लागलं की त्याच्यापासून चार हात लांब राहावं , ही दुनिया खूप दुहेरी चेहऱ्यांनी भरलेली आहे त्यामुळे कोणाच्याही जाळ्यात अडकू नकोस...

मालती त्याला काहीतरी सांगतेय याच्याकडे त्याचं लक्षच नव्हतं तो तर बाहेर गेलेल्या राजला गाडीत बसून जाऊ पर्यंत बघतच होता...

      आता प्रेमाचा बाण सुटलेला होता, अमितच्या ह्रदयात तरी राज बद्दल वेगळ्या भावना जाग्या झाल्या होत्या.. अमितच्या आई ने कितीही सांगितलं तरी प्रेम ही अशी गोष्ट आहे जी नकळत होते आणि टाळता येत नाही... पण काही गोष्टींना भुरळून जाऊन प्रेमाच्या नावाखाली खूप निष्पाप जीवांचे लचके तोडले जातात आणि भावनांचा खेळ खेळला जातो...


      वो खुसरो हो या बुल्लेहशाह
      हर शक़्स जला है, खामखाँ
      जिसने ये आग टटोली है...
      ये इश्क़ इश्क़ ये इश्क़ इश्क़क्रमशः..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

मित्र राघव

Writer

Like to write fictional stories