गोष्ट एका प्रवासाची : भाग १५

गोष्ट एका अविस्मरणीय प्रवासाची!
अरे डोळ्यांनी पाहिलेल्या सगळ्या गोष्टी काही खर्‍या नसतातं असे तूचं म्हणायचा ना??

आठवं??

तू इतक्या सहजपणे हे ठरवून मोकळा ही झालास की मी हेमंतसाठी तूला सोडले आहे ते??

तुला खरचं वाटलं की मी तुला सोडून दुसर्‍या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते, हेच तुझं प्रेम??

देवांश आपलं काही महिना किंवा एक वर्षाचं प्रेम नव्हतं.. लग्नाआधीची तीन आणि लग्ना नंतरची पाच अशी टोटल आठ वर्षे आपण सोबत होतो मगं त्या आठ वर्षात तू मला एवढेच ओळखले का रे??"आराध्या देवांवर एका मागोमाग एक प्रश्नांचा मारा करते, आणि देवांश मात्र शांत उभा असतो.

" आता वाचा गेली का तुझी??


तुला आठवतं असेल तर आठवून बघं, मी तुला सोडून जायच्या काही दिवस अगोदर हेमंत आणि कविता घरी आलेले.. "


" हो आठवतयं मला.. आणि मी आल्यावर ते दोघे खूप घाईगडबडीत गेलेले..", आराध्या विचारते तेव्हा देवांश काही आठवून बोलतो.

"हो कारण त्या दिवशी चं त्यांनी मला त्यांच्या एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली आणि त्यांनी पहिल्यांदा हे मला चं सांगितले होते शिवाय त्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल अजून कुठे चं वाच्यता करायची नव्हती म्हणून ते तू आल्यावर त्या दिवशी घाईगडबडीत गेले.

तुला माहित नाही म्हणून सांगते तू ज्या हेमंत सोबत माझे सबंध जोडले होतेस त्याच हेमंत आणि कविताने मला वारंवार समजावले होते.

आणि त्यांच्या समजावण्याचा कुठेतरी माझ्यावर ही परिणाम होत होता.

तू जेव्हा ऑफिस पार्किंग मध्ये पहिल्यांदा मला आणि हेमंतला एकत्र बघितले ना, जेव्हा मी त्याच्या हातामधून गुलाब घेत होते त्याला मिठी मारत होते तेव्हा डेटवर जायची खूप छान आयडिया दिली म्हणून तो आभार व्यक्त करत होता.

तू जेव्हा सोसायटी मध्ये पाहिले तेव्हा हेमंत सोबत मी दिसलेले तुला पण गाडीत बसलेली कविता तुला ओळखता आली नाही कारण तुझ्या सर्वांगात त्यावेळी गैरसमजा चं भूत फिरतं होतं.

आणि जेव्हा तू आईला, मला आणि हेमंतला एकत्र पाहिलेले ना काही दिवसांनी तेव्हा आम्ही सगळे मंदिरात जात होतो कारण तिथे कविता पूर्वीपासून चं आमची वाट पाहत उभी होती.

आम्ही त्या दिवशी त्यासाठी साड्या नेसल्या होत्या जरीच्या आणि आईचा आशीर्वाद घेताना हेमंत आभार व्यक्त करत होता कारण मी आणि आई फक्त दोघी चं त्यांच्या प्रेमासाठी एवढे करतं होतो, त्यांना समजूत घेत होतो पण तू मात्र तुझ्या गैरसमजूतीने स्वतःचे केवढे नुकसान करून घेतले हे बघं.

देवांश तुला खरं सांगू कविता आणि हेमंत चं लग्न झालं त्या दिवशी मला त्यांचा आनंद पाहून तुझी आठवण आली खूप प्रकर्षाने.

मी कितीतरी वेळ तुझे फोटो, आपले फोटो पाहंत होते.. माझ्या बॅगेत चुकून आलेला तुझा टी शर्ट त्या दिवशी अंगावर चढवताना मला तु अगदी घट्ट कवटाळून घेतले आहेस असे चं वाटतं होते.

आणि फोनमध्ये फोटो , व्हिडिओ पाहताना मध्ये चं मला आपला तो महाबळेश्वर च्या सनसेट पॉईंटवर आपण काढलेला व्हिडिओ दिसला.
आणि खूप भरून आलं मला त्या व्हिडिओ मुळे.

आपण दोघांनी आपल्या आवडत्या गाण्याचा रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ.


¶जब कोई बात बिगड़ जाए,
जब कोई मुश्किल पड़ जाए
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा..
जब कोई बात बिगड़ जाए,
जब कोई मुश्किल पड़ जाए
तुम देना साथ मेरा, ओ हमनवा..


ना कोई है, ना कोई था, ज़िन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा…
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा…


हो चाँदनी जब तक रात,
देता है हर कोई साथ
तुम मगर अन्धेरों में,
ना छोड़ना मेरा हाथ 
जब कोई बात बिगड़ जाए,
जब कोई मुश्किल पड़ जाए
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा..
ना कोई है, ना कोई था,
ज़िन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा, ओ हमनवा…


वफ़ादारी की वो रस्में,
निभाएँगे हम तुम कसमें
एक भी साँस ज़िन्दगी की,
जब तक हो अपने बस में
जब कोई बात बिगड़ जाए,
जब कोई मुश्किल पड़ जाए
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा..
ना कोई है, ना कोई था,
ज़िन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा…

दिल को मेरे हुआ यकीं,
हम पहले भी मिले कहीं
सिलसिला ये सदियों का,
कोई आज की बात नहीं
जब कोई बात बिगड़ जाए,
जब कोई मुश्किल पड़ जाए
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा
ना कोई है, ना कोई था,
ज़िन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा,
ओ, हमनवा.. ¶

अचानक सगळे काही डोळ्यासमोर उभे राहिले रे.. लग्न झाल्यावर सुरुवातीला हातात हात घालून आपण न जाने किती रस्त्यावर हे गाणं गातं वेड्यासारखं फिरलो होतो. हे गाणे म्हणताना आपण आयुष्यभर एकमेकांसोबत आहोत हेचं सांगायचो एकमेकांना .

आणि या गाण्याने मला आठवण करून दिली की, मी अशी कशी तुला सोडून आले.

किमान एकदा तरी तुझ्याशी बोलायला हवं होतं मी असं राहून राहून वाटतं होतं मला.. गाण्याने जसे आपल्याला जवळ केले होते तसेच या गाण्याने चं एका क्षणात मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली होती आणि मी तुला भेटायला यायचे ठरवले होते.

क्रमशः

आराध्या देवांशला खरचं भेटायला गेली होती का?? आणि जर ती भेटायला गेली होती तर मगं असे कायं घडले की त्यांच्यात दुरावा आला या प्रश्नाची उत्तरे पुढील भागात.

सर्व वाचकांची मनापासून माफी मागते.. काल कॉपी करताना चुकून आधीचा चं भाग कॉपी होऊन पोस्ट झाला शिवाय काही टेक्निकल इश्यू मूळे मला भाग पुन्हा एडिट आणि प्रकाशित करता आला नाही.. आणि डिलीट ही करता आला नाही.
सर्वांची मनापासून माफी मागते.












🎭 Series Post

View all