गोष्ट एका प्रवासाची : भाग १३

गोष्ट एका अविस्मरणीय प्रवासाची!


देवांश एवढे बोलून एक उसासा सोडतो आणि समोर बसलेल्या आराध्याकडे पाहतो.

आराध्या च्या डोळ्यात सुद्धा अश्रू दिसतात देवांशला.. ती रडत असते.

" आराध्या कायं झालं तू का रडतेयं?? हे बघं माझा काही राग नाही तुझ्यावर..", देवांश आराध्याला बोलतो, तशी आराध्या त्याच्या गालावर एक चापट मारते आणि सीटवर डोळे ठेवून पुन्हा रडू लागते.

देवांशला मात्र आराध्याचे हे वागणे कळत चं नाही.

"आराध्याने मला चापट का मारली..?? "देवांश मात्र आराध्याकडे पाहून विचार करतं राहतो.

" आराध्या.. तू काही बोलणार आहेस का प्लीज..??", खूप वेळ झाला तरी आराध्या खाली मान घालून नुसती बसली आहे हे पाहून देवांश आता वैतागतो आणि तो आराध्याला विचारतो.

आराध्या उठते आणि देवांशकडे पाहते.. रडून रडून डोळे लाल झालेले असतात तिचे.

"आराध्या तुलि अचानक कायं झालं आणि तू मला चापट का मारली?? ", आराध्या च्या गालावर आपले दोन्ही हात ठेवून तिचा चेहरा स्वतःकडे वळवत देवांश आराध्याला विचारतो.

आराध्या देवांशचा हात दूर झटकते.. आणि तिथून उठून वॉशरुम मध्ये जाते.

देवांश तिच्या पाठोपाठ ती कुठे गेली आहे हे पहायला जातो.

देवांश आराध्याची वाट पाहंत तिथेच कम्पार्टमेंट च्या दाराजवळ उभा राहतो.

पहाटे पाच ची वगैरे वेळ.. अजूनही आसमंतात अंधार असतो चं थोडासा आणि त्या अंधारात ते टपोरं चांदण अगदी खुलून दिसतं होतं.. त्या चांदण्यांना पाहून मनातलं सारं मळभ क्षणभरासाठी कुठेतरी लुप्त झाल्यासारखं वाटत होतं देवांशला.

"कायं चाललयं हे सगळे?? मी न ठरवून देखील आज स्वतःच त्या सगळ्या गोष्टी आपोआप उलगडतं गेल्या पण मगं आता गोष्टी उलगडतं आहेत चं तर आराध्या आता का टाळतेय उत्तर द्यायला.

काहीही होऊ दे पण मी आराध्याला उत्तर द्यायला भाग पाडणार चं जरी तिला सांगायच नसेल तरीही.
या प्रवासात आता मला आमच्या आयुष्यासारखं अर्धवट काही चं ठेवायचं नाही आहे. ", देवांश मनातल्या मनात सवतःशीचं हितगूज साधत असतो इतक्यात वॉशरुमचा दरवाजा उघडल्याचा आवाज येतो आणि आराध्या बाहेर येथे.

देवांशला तिथे पाहून ती सीट जवळ जातं चं असते इतक्यात देवांश तिचा हात ओढून तिला स्वतःकडे खेचतो.

" देवांश बिहेव.. आपण ट्रेन मध्ये आहोत.. ", आराध्या देवांशकडे पाहून एक रागीट कटाक्ष देते.

"लूक आराध्या पहाटेचे पाच वाजले आहेत, आपल्या दोघांव्यतिरिक्त गेले अडीच तास मलातरी कोणीही जागे दिसलेले नाही सो डोन्ट गिव्ह मी दॅट रिजन..", देवांश ही आराध्याला सडेतोड उत्तर देतो अगदी.

" लिव्ह मी देवांश प्लीज..", आराध्या देवांश पासून नजर चोरून बोलते.

"येस आय वील लिव्ह यू पण त्या अगोदर मला उत्तर हवयं.. ", देवांश बोलतो.

" कशाचं उत्तर..?? ", आराध्या विचारते.

" तुला अजूनही एवढा त्रास होतो का मला काही झालं की?? तु मगाशी माझे बोलणे ऐकून चं रडतं होतीस ना??

आणि तू मला चापट का मारली..??", देवांश विचारतो.

" मला तुला उत्तर नाही द्यायचं.. "

" म्हणजे तू माझ्यामुळे चं रडत होती.. ", आराध्याचे बोलणे ऐकून देवांश सहज निष्कर्ष लावतो तशी आराध्या कशीबशी त्याचा हात सोडवते आणि म्हणते,

" ओह्ह प्लीज मी तुझ्यामुळे रडतं चं नव्हते.. मी का रडू तुझ्यासाठी आणि.. तुझी आर्या ती रडेल तुझ्यासाठी.. ", आर्या चे नाव ऐकून देवांश गोंधळतो खरा पण त्याला अगोदर आराध्याचे नेमके कायं म्हणणे आहे ते ऐकून घ्यायचे असते म्हणून तो शांत बसतो, आणि आराध्याचे बोलणे ऐकू लागतो.

" देवांश सिरीयसली इतका वेळ सहानुभूती होती पण मला ना तुझी कीव येतेय आणि तिरस्कार सुद्धा आहे तुझ्याबद्दल प्रचंड मनात आत्ता या क्षणी.

तू खरचं किती मुर्ख आहेस.. म्हणजे जे डोळ्यांना दिसले तेचं खरे समजून तू तुझ्या मनाचे ही न ऐकता सहजपणे निष्कर्ष लावून स्वतःच स्वतःची वाताहत करून घेतलीस.. किमान एकदा तरी स्वतःच्या मनाचे ऐकायचे किंवा कमीत कमी तुला एवढा राग होता ना माझ्या बद्दल मगं तो राग माझ्यावर व्यक्त तरी करायचा.

म्हणजे आज आपण भेटलो नसतो तर तू आयुष्यभर भ्रमात चं राहिला असतास नाही का?? ", आराध्या च्या डोळ्यात आता प्रचंड राग होता.

" कायं बोलतेयं तू आराध्या?? कसल्या भ्रमात आहे मी?? " देवांशला काही कळत नाही तसे तो आराध्याला विचारतो.

" हे चं की माझं हेमंतशी लग्न झालं आहे आणि माझं त्याच्यावर प्रेम जडलं म्हणून मी तुला सोडून गेलेले. ", आराध्या एक उसासा सोडतं बोलते.

"कायं तुझं लग्न नाही झालं?? पण कसं शक्य आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे..", देवांश आता शॉक होऊन बोलतो.

"मुर्ख आहेस तू कारण.. डोळ्यांनी अर्धवट पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून मोकळा झालास.

अरे डोळ्यांनी पाहिलेल्या सगळ्या गोष्टी काही खर्‍या नसतात असे तूचं म्हणायचा ना??

आठवं??

तू इतक्या सहजपणे हे ठरवून मोकळा ही झालास की मी हेमंतसाठी तूला सोडले आहे ते??

तुला खरचं वाटलं की मी तुला सोडून दुसर्‍या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते, हेच तुझं प्रेम??

देवांश आपलं काही महिना किंवा एक वर्षाचं प्रेम नव्हतं.. लग्नाआधीची तीन आणि लग्ना नंतरची पाच अशी टोटल आठ वर्षे आपण सोबत होतो मगं त्या आठ वर्षात तू मला एवढेच ओळखले का रे??"आराध्या देवांवर एका मागोमाग एक प्रश्नांचा मारा करते, आणि देवांश मात्र शांत उभा असतो.

क्रमशः

खूप गोंधळ उडाला आहे ना?? आराध्या आता बोलतेय ते खरं आहे की जे देवांशने पाहिलं ते खरं आहे हे ठरवणं तसं खूप अवघड आहे.

या सगळ्या कन्फ्यूजन चे उत्तर कथेच्या पुढच्या भागात मिळेल.

🎭 Series Post

View all