गोष्ट एका प्रवासाची : भाग ११

गोष्ट एका अविस्मरणीय प्रवासाची!


" तू घरी मला टाळाटाळ करतं होती म्हणून त्या दिवशी मी मुद्दाम तुझ्या ऑफिस मध्ये आलो.. खरंतर मला काही इश्यू नव्हता क्रीएट करायचा तिथे म्हणून मी मुद्दाम तुझ्या ऑफिस समोर जे कॅफेटेरिया आहे मी तिथे बसून तुझ्या ऑफिस सुटण्याची वाट पाहंत बसलो होतो."

"मगं तू मला भेटला का नाहीस?? की पुन्हा काही घडले होते?? ", देवांश च्या बोलण्यावर आराध्या त्याला विचारते.

" त्या दिवशी सहा वाजले तसे मी तुझ्या ऑफिस समोर डोळे लावून बसलो होतो आशेने.. तू दिसशील आणि मगं मला हे बोलायचं, मला ते बोलायचं असं किती काही ठरवलं होतं मी पण.. ", देवांश बोलायचे थांबतो.

" पण कायं?? ", आराध्या विचारते.

"त्या दिवशी तू दिसली तसा मी खुर्चीवरून उठून कॅफेटेरिया च्या बाहेर आलो आणि तू मला दिसलीस म्हणून आनंदी झालो पण क्षणातचं माझ्या सगळ्या आनंदावर पाणी फिरलं.

तू तुझ्या ऑफिस कलीग सोबत मस्त हसतं होती, छे मला तुझ्या हसण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता पण मला वाटलेलं मी इतके दिवस तुला भेटायला नाही आलो म्हटल्यावर तू थोडीशी का होईना डिस्टर्ब असशील.

मी तरीही तुझ्या जवळ येत चं होतो पण तुझ्या जवळ यायच्या आधी चं मला हेमंत हातामध्ये गुलाबाचे फूल घेऊन तुला देताना दिसला. तू ही ते गुलाबाचे फूल स्वीकारले आणि त्याला मिठी मारलीस मगं मात्र माझा सगळा धीर सुटला मला वाटलं की तू त्याच्या सोबत आनंदी आहेस म्हणून तू मला सोडून गेलीस त्यामुळे मी तसाच आल्या पावली परत फिरलो.

मला एकदा वाटतं होतं मनातून की माझी आराध्या मला सोडून दुसऱ्या कोणावर प्रेम नाही चं करू शकतं म्हणून मी पुन्हा उद्या तुला तुझ्या घरी येऊन भेटायचं ठरवलं.

मी दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर चं उठून तुझ्या घरी आलो होतो. रविवार असल्याने तू नक्कीच घरी असणार याची मला आशा होती चं म्हणून मी मुद्दाम एक फुलांचा बुके आणि तुझी आवडती सिल्क देखील घेतली होती सोबत.. खूप आनंदाने मी तुझ्या सोसायटी च्या कंपाऊंड मध्ये पाऊल ठेवले पण गेटजवळ उभे असताना चं मला तू आणि हेमंत कार जवळ उभे दिसला.

तू साडी घातली होती आणि हेमंतने सुद्धा छान सुट घातला होता. हेमंतने अगदी काल सारखेच तुला गुलाबाचे फूल दिले आणि तू सुद्धा ते फूल अगदी हसतं स्वीकारले.. इतक्यात मला तुझी आई दिसली.. आई ही खूप छान तयार होऊन आली होती, हेमंत त्यांच्या पाया पडला तेव्हा त्यांनी आशीर्वाद सुद्धा दिले. मगं मात्र माझं होतं नव्हतं तेवढं सारं अवसान गळून पडलं.

तुमची कार कम्पाऊंड च्या बाहेर जाईपर्यंत मी तिथेच गेट च्या थोडेसे बाजूला उभा होतो.

मी तुमचा पाठलाग करायचे ठरवले. मी हेल्मेट घातले आणि बाईक वरून तुमचा पाठलाग सुरू केला.

गाडी चालवताना ही माझं मन मला सतत हेचं सांगत होतं की माझी आराध्या मला सोडून दुसऱ्या कोणावर प्रेम नाही चं करू शकतं.

सुरूवातीलि तुमची गाडी एका फुलाच्या दुकानावर थांबली, हेमंतने गाडीतून उतरून हार घेतले. मी तुमच्या पाठीमागे चं होतो त्यामुळे मला ते दिसले तरीही मनाला सतत बजावत होतो की, \"आराध्या माझी आहे. \"

जेव्हा कार मंदिरा जवळ थांबली आणि एक गुरूजी धावत चं तुमच्या जवळ आले तेव्हा मात्र माझा होता नव्हता तेवढा सगळा भ्रम दूर झाला.

हातातील तो बुके हातातून केव्हा खाली पडला हे कळले देखील नाही.
माझ्यापासून तू खूप दूर गेली आहेस। ई गोष्ट मला पूर्णपणे हेलावून गेली.

कसेतरी करतं मी घरी पोहचलो, त्या दिवशी तू सही केलेले डिवोर्स पेपर हातात घेऊन मी कितीतरी वेळ रडत होतो.. अख्खी रात्र मी फक्त सिगारेट वर सिगारेट ओढत राहिलो आणि दारू पित राहिलो.


सकाळी जाग आली तेव्हा डोकं जड झालं होतं खूप.. मला जगायची इच्छा चं होतं नव्हती.

आईनंतर माझं सगळं जगं फक्त तूच तर होतीस पण तू गेल्यावर मात्र मला अनाथ झाल्यासारखे फील झाले आराध्या.. लाईफ मध्ये पहिल्यांदा इतके एकटे वाटले की बस्स.

तू मला सोडून गेली याचं दुःख तर होत चं पण तुझं हेमंतवर प्रेम आहे हे तुला एकदा ही मला सांगावसं वाटलं नाही याचा राग आला भयंकर.

घरात तुझ्या आठवणी मला छळत होत्या अक्षरशः
मी पुन्हा दारू पिऊन झोपलो.

तू गेल्यापासून दारू प्यायचं प्रमाण इतकं वाढलं होतं की बस्स.. कधी कधी मी ऑफिस मध्ये सुद्धा दारू पिऊन जाऊ लागलो. लेट जाणं, दारू पिणं, काम पूर्ण न करणं याचा व्हायचा तोच परिणाम झाला, मला जॉब वरून काढून टाकलं गेलं.

बॉसने केलेला अपमान इतका जिव्हारी लागला की मी ऑफिस मधून थेट बारमध्ये गेलो आणि तिथे इतकी दारू पिली की बस्स मला माझा तोल सुद्धा राहिला नाही.

मी दारू पिऊन गाडी चालवतं असताना चं माझी बाईक एका कारला धडकली. यावेळी मात्र थोडक्यात निभावलं नव्हतं काही.

माझा पाय चांगलाच दुखावला गेला होता आणि मला दहा दिवसांची सक्त ताकीद दिली होती आरामाची डॉक्टरांनी.

डॉक्टरांचे बोलणे ऐकून मला स्वतःचा चं इतका राग आला की बस्स मी खिशातून सिगारेट चं पाकीट बाहेर काढलं आणि लायटर लावून सिगारेट पेटवत चं होतो इतक्यात,

"सिगरेट स्मोकिंग इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ..", असे म्हणतं चं एका सुंदर तरूणीने रूममध्ये प्रवेश केला.

क्रमशः

देवांश म्हटला तसे खरचं आराध्याने हेमंत सोबत लग्न केलं असेल का?? आणि देवांशला आता सिगारेट पिण्यापासून थांबवणार ती सुंदर तरूणी नक्की कोणं आहे??

या सगळ्या गोष्टींचा उलगडा कथेच्या पुढील भागात होईल त्यासाठी कथा आवर्जून वाचा.

🎭 Series Post

View all