गोष्ट एका प्रवासाची : भाग १०

गोष्ट एका अविस्मरणीय प्रवासाची!


संध्याकाळी ती घरी येते तेव्हा आईने तिच्या आवडीचे जेवण बनवले होते अगदी आणि ती देवांश विषयी काही चं बोलतं नव्हती.

" याचा अर्थ मला सकाळी वाटले तसेच घडले.. देवांश आज आला नाही आणि इथून पुढे ही तो येणार चं नाही.", मनातल्या मनात आराध्या खूश झालेली असते.

त्यानंतर मात्र देवांश आराध्या च्या घरी फिरकत देखील नाही.

अचानक ट्रेन मधली लाईट चालू होते तशी आराध्या भूतकाळाच्या गर्द विचारांमधून बाहेर येते.

ती पाहते तर देवांश तिथे नसतो.. ती खिडकीमधून पाहते  देवांश स्टेशनवर उभा दिसतो तिला.

ती अंगावर स्कार्फ घेते आणि खाली येते.

"तू खाली कधी उतरला ..?", आराध्या देवांशला विचारते.

"जेव्हा तू विचारांत हरवली होती तेव्हा.."

"म्हणजे..??", देवांशचे बोलणे ऐकून आराध्या न रहावून विचारते देवांशला.

अगं आपण बोलत होतो त्यानंतर तू अचानक विचारांत हरवली.

अगं एक पाच मिनिटांपूर्वी चं हे स्टेशन आले आणि या स्टेशनवर गाडी अर्धा पाऊण तास थांबते चांगली मगं म्हटलं उगीचचं आतमध्ये बसून कायं करायचे म्हणून पाय मोकळे करायला आलो खाली.. ", देवांश आराध्याला सांगतो.

" अच्छा..इडली खाऊया?? "

" कायं..?? ", आराध्याचा प्रश्न ऐकून देवांश अवाक् होऊन आराध्याला विचारतो.

" इथे इडली खूप छान मिळते म्हणून विचारले मी..",आराध्या देवांशला तिचे प्रश्न विचारण्या मागचे कारण स्पष्ट करते.

" ओके चालेल.. ", असं म्हणून देवांश तिच्या पाठोपाठ जाऊ लागतो.

दोघेही इडली वाल्या भैय्याकडूव इडली चटणी घेतात.

"आराध्या अजूनही तू रात्री अडीच वाजता इडली खातेस?? "

" देवांश आपण माणूस सोडतो पण त्या माणसासोबत असलेल्या सवयी अगदी घट्ट मिठी मारून बसतात आपल्याला.. ", देवांश च्या प्रश्नावर आराध्या नकळतपणे बोलून जाते.

¶लग जा गले के फिर ये हसीं रात हो.. न हो..
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो.. न हो..

हमको मिली हैं आज ये घडीयाँ नसीब से
जी भर के देख लीजिये हमको करीब से
फिर आप के नसीब में ये बात हो.. न हो..
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो.. न हो..

पास आईये के हम नहीं आयेंगे बार बार
बाहें गले में डाल के हम रो ले ज़ार ज़ार
आँखों से फिर ये प्यार की बरसात हो.. न हो..
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो.. न हो..
...¶


  इडली वाल्या मुलाकडे जो मोबाईल आहे त्यावर हे गाणं लागतं.

आराध्या आणि देवांश एकमेकांच्या डोळ्यात पाहंत राहतात खाताना.

या क्षणी देवांशला आराध्याला कडकडून मिठी मारावीशी वाटते.

"आराध्या मी तुला एकदा मिठी मारू शकतो??", देवांश विचारतो तशी आराध्या त्याला काही चं बोलू शकतं नाही.

देवांश त्याची इडली ची डिश बाजूला ठेवतो आणि आराध्याला मिठी मारतो. आराध्या च्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात.

देवांशला तिच्या हुंदक्यांचा आवाज जाणवतो तसा देवांश तिच्यापासून दूर होतो. त्याला तिच्या डोळ्यातील अश्रू दिसतात तो तिला काही विचारणार इतक्यात आराध्या तिथून धावत जाते आणि ट्रेन मध्ये चढते.

देवांश त्या इडली वाल्या मुलाला त्याचे पैसे देतो आणि समोर असलेल्या टपरीवरुन दोन चहा घेऊन तो ट्रेन मध्ये चढतो.

ट्रेन आता नुकतीच चालू झालेली असते. आराध्या जवळ जाऊन देवांश तिच्या हातात तो चहाचा कप देतो. आराध्या काही एक न बोलता चहा घेते.

ट्रेन आता स्टेशनला मागे टाकतं पुढे धावू लागते, तसे ट्रेन मधली लाईट पुन्हा बंद होते.

मध्यरात्रीची अडीच तीनची वेळ.. सगळे प्रवासी जवळजवळ झोपी चं गेलेले असतातं.

लाईट बंद आहेत हे पाहून देवांश आराध्याच्या जवळ जातो आणि तिला क एक कळायच्या आत तो तिला पुन्हा मिठीत घेतो.

"मला हार्ट अ‍ॅटॅक आला होता हे समजल्यामुळे तू इतकी हळवी झालीस आणि मगाशी तुझ्या डोळ्यातून त्यामुळे चं अश्रू बाहेर आले ना??", देवांश हळू चं आराध्याला विचारतो तेव्हा आराध्या फक्त, "ह्म्म.." म्हणून हुंकार भरते.

कितीतरी वेळ देवांश तिला तसेच हाताने मायेने थोपटत राहतो डोक्यावरून.

काही वेळाने आराध्या त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेते.

" तुला कसे कळले..?? "

" आराध्या.. कम ऑन इतकी वर्षे आपण सोबत होतो, तुला मी तितके तरी ओळखतो चं.. ", देवांश आराध्याला बोलतो.

" तू हॉस्पिटल मधून बाहेर आल्यावर ही मला कळवू शकला असतास??", आराध्या मुद्दाम चं विषय भरकटवते.

"मी आलो होतो आराध्या तुला सांगण्यासाठी.. " देवांश तितक्या चं शांतपणे बोलतो.

" तू आला होतास पण कधी?? आय मीन आई काही बोलली नाही मला तसे.", आराध्या काहीसे आठवून बोलते.

" कारण भी तुझ्या घरी नव्हतो आलो. ", देवांश आराध्याला सांगतो.

"घरी नाही तर मगं कुठे आला होता तू?? ", आराध्या विचारते.


" तू घरी मला टाळाटाळ करतं होती म्हणून त्या दिवशी मी मुद्दाम तुझ्या ऑफिस मध्ये आलो.. खरंतर मला काही इश्यू नव्हता क्रीएट करायचा तिथे म्हणून मी मुद्दाम तुझ्या ऑफिस समोर जे कॅफेटेरिया आहे मी तिथे बसून तुझ्या ऑफिस सुटण्याची वाट पाहंत बसलो होतो."

"मगं तू मला भेटला का नाहीस?? की पुन्हा काही घडले होते?? ", देवांश च्या बोलण्यावर आराध्या त्याला विचारते.

क्रमशः

आराध्या च्या ऑफिस मध्ये जाऊन ही देवांश आराध्याला का बरं भेटला नसेल??
की पुन्हा देवांश सोबत कुठली घटना घडली होती या सगळ्या गोष्टींचा उलगडा कथेच्या पुढील भागात होईल.

🎭 Series Post

View all