गोष्ट एका प्रवासाची : भाग ८

गोष्ट एका अविस्मरणीय प्रवासाची!


" मी कळवले असते तर तु विश्वास ठेवला असता का सांग ना??

तुला वाटलं असतं मी नाटक करतोय नेहमीप्रमाणे म्हणून तु आली नसतीस. आणि असेही मला हॉस्पिटलमध्ये कोणी आणले ते ही मला माहित नव्हते.

मी रस्त्यावर पडलो होतो तुझ्या घरी येत असताना, तेव्हा चं कोणीतरी मला हॉस्पिटलमध्ये नेले असे मला डॉक्टरांनी सांगितले. ", देवांश आराध्याला सांगतो.


" पण अचानक हार्ट अ‍ॅटॅक कसा कायं आला..??", आराध्या देवांशला विचारते.


" तुझ्या जाण्याचा धक्का मी नाही पचवू शकलो.. ", देवांश उत्तर देतो तशी आराध्या शांत होते. तिला तो दिवस आठवतो.

(पाच वर्षांपूर्वी..)

" आराध्या तू खूप चुकीचं वागतं आहेस.. गेले आठवडाभर देवांश रोज घरी येतोय आपल्या किमान तु एकदा तरी बोलायले हवे त्याच्याशी असे माझे वैयक्तिक मत आहे. "


" आई, तु रोज खाताना का मला या विषयावरून बोलत असते गं?? तुला माझ्या इथे असण्याचा त्रास होतं आहे का सांग बरं मला..?? ", आराध्या आईला न रहावून विचारते.

" आराध्या, तु काही ही कायं बोलतेयं?? मला तुझ्या असण्याचा का त्रास होईल पण तू देवांश सोबत तुझे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मिटवून घ्यावे आणि पुन्हा त्याच्यासोबत आनंदाने संसार करावास असं वाटतं मला.

आणि इतके दिवस तू मला खोटं बोलायला भाग पाडतं होती पण काल तू जे काही वागलीस देवांश सोबत ते अत्यंत चुकीचे होते, लक्षात ठेवं.
अगं चक्क तु दरवाजा बंद केलास त्याच्या तोंडावर ही कायं पद्धत आहे वागण्याची??

मी तुला अगोदर चं सांगून ठेलतेयं जर देवांश आज आला तर मी खोटे ही बोलणार नाही आणि तुला दरवाजा ही बंद करू देणार नाही त्याच्या तोंडावर, कळलं..तुला आज देवांशशी बोलावे चं लागेल. ", आई आराध्याला आग्रह धरते.

" आई देवांश आज येईल असे मला तरी वाटत नाही. आणि तू मला प्लीज नको सांगू की मी देवांश सोबत कसे वागायचे ते?? "


" मी आई आहे तुझी आणि जर तू चुकीचं वागतं असशील तर तुला तुझी चूक दाखवून देणं काम आहे माझं, समजलं..?? ", आराध्या च्या बोलण्यावर आई तिला ओरडते.

"आई, तुला अजूनही मी चुकतेयं असचं वाटतयं. अगं तुला तर सगळं माहित आहे ना?

आई, मी नाही राहू शकत देवांश बरोबर.. खूप घुसमट होते माझी आता.. ", आराध्या काकुळतीला येऊन बोलते आईला.

" अगं राहू शकतं नाही म्हणजे??

प्रेमविवाह केलाय ना तुम्ही दोघांनी?? प्रेम इतक्यात आटलं तुमचं??

आणि भांडण कुठल्या नात्यात होतं नसतात म्हणून कायं नातं तोडायचं नसतं.. ", आई आराध्याला समजावण्याचा प्रयत्न करते.

" हो आई, माझं देवांश वर प्रेम होतं म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं.

खूप आनंदी होतो आम्ही दोघे पण आता देवांश पूर्वीसारखा नाही राहिलायं. तो खूप बदलला आहे.
पूर्वी तो प्रत्येक कामात मला मदत करायचा पण हल्ली छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा तो दखल घेत नाही.

घर आणि संसार हा दोघांचा असतो एकट्याचा नसतो आई.. देवांश सोबत मी ही जॉब करते म्हणून मी काही दुर्लक्ष तर नाही ना करतं या सगळ्याकडे.

आई एकवेळ त्याच उशीरा येणं देखील मान्य आहे मला, पण त्याचा बेजबाबदारपणा, कुठल्याही गोष्टीत मला गृहीत धरून चालणं नाही पटतं मला, खूप त्रास होतो मला त्याचा.

तो जेव्हा जवळ येतो तेव्हा ही पूर्वीसारखा तो मला प्रेमाने जवळ घेत नाही त्याची गरज आहे म्हणून तो जवळ येतो, मला कधी कधी खरचं बलात्कार केल्याची जाणीव होते, देवांश माझा नवरा असला तरीही."

"आराध्या तू कायं बोलतेयं ते तरी कळतंय का गं तुला?? ", आराध्याचे बोलणे ऐकून आईचा पारा चढतो.

" हो आई, मला सगळे कळतंय पण आपल्या या समाजात एकदा का लग्न झालं मुलीचं की तिचा नवरा हवा तेव्हा प्रणय करू शकतो बायकोशी मगं अगदी तिची मर्जी नसली तरीदेखील.

आणि माझा देवांश असा नव्हता.. माझा हात भाजला म्हणून आठवडाभर रोज फुंकर घालणारा देवांश असा का वागतोयं ते मला माहितं नाही खरचं.

मी खूप वाटं पाहिली.. सहा महिने वाट पाहिली पण जेव्हा माझी सहनशक्ती संपली तेव्हा चं मी हा निर्णय घेतला आहे.

आणि इथून पुढे तू पुन्हा पुन्हा याच विषयावर बोलणार असशील तर मी वेगळे राहील माझे माझे..",एवढे बोलून आराध्या दरवाजा खाडकन बंद करून घराबाहेर पडते.

" घड्याळात तर बरोबर नऊ वाजले आहेत.. देवांश रोज याच वेळी येतो किंवा इथे उभा असतो, आज दिसतं नाही आहे म्हणजे कदाचित काल मी केलेला अपमान त्याच्या चांगलाच वर्मी लागला असावा.

एका दृष्टीने चांगले चं झाले ते..", आराध्या मनातल्या मनात बोलते आणि कार काढून निघते.


संध्याकाळी ती घरी येते तेव्हा आईने तिच्या आवडीचे जेवण बनवले होते अगदी आणि ती देवांश विषयी काही चं बोलतं नव्हती.

" याचा अर्थ मला सकाळी वाटले तसेच घडले.. देवांश आज आला नाही आणि इथून पुढे ही तो येणार चं नाही.", मनातल्या मनात आराध्या खूश झालेली असते.

त्यानंतर मात्र देवांश आराध्या च्या घरी फिरकत देखील नाही.


क्रमशः

देवांश त्या दिवशी घरी का आला नाही हे सत्य कळल्यावर आता आराध्याची नेमकी कशी रिएक्शन असेल?? देवांश हॉस्पिटलमधून आल्यावर पुन्हा आराध्याकडे जातो की नाही हे सगळे पाहण्यासाठी कथेचा उद्याचा भाग नक्की वाचा.



🎭 Series Post

View all