गोष्ट एका प्रवासाची : भाग ४

गोष्ट एका अविस्मरणीय प्रवासाची!


"भेळ ...??",इतक्यात आराध्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो. देवांश समोर पाहतो तर आराध्या त्याला भेळ खाण्यासाठी विचारतं असते.

देवांश एक घास घेतो आणि पुन्हा भेळ आराध्याकडे सरकवतो.

"नालायक...", आराध्या भेळकडे पाहून शिव्या घालते.

"व्हॉट..?? तु म्हटली म्हणून चं मी घेतली भेळ..", आराध्या च्या तोंडातून, \"नालायक\", हा शब्दं ऐकून देवांशला वाटते की, आराध्या त्याला चं नालायक असे बोलली आहे म्हणून तो आराध्याला बोलतो.

"अरे एक मिनिट, मी तुला नाही बोलले नालायक, तो भेळ वाला भैय्या त्याने पुरी चं नाही दिली, मी त्याला नालायक बोलले.. ", आराध्या देवांशचा गैरसमज दूर करते.

"ओह्ह.. तु असे अचानक बोलली मगं मला वाटलं.. एनी वे तू अजूनच तशीचं आहेस पण.. अजूनही तुला भेळ आणि भेळ मधली पुरी तितकीच आवडते.. "

" माणसाने कायम जसे आहे तसे रहावे.. उगाचचं कशाला बदलायचे.. ", देवांश च्या बोलण्यावर आराध्या त्याला प्रतिउत्तर देते.

"ह्म्म खरयं.. ", देवांश ह्म्म म्हणून हुंकार भरतो आराध्या च्या बोलण्यावर.

" तू इथे कायं करतोयस पण?? आय मीन सेंकड क्लास कंपार्टमेंट?? ", आराध्या देवांशला विचारते.

आराध्या स्वतःहून काही बोलतेय याचा चं देवांशला खूप आनंद होतो.

"ते गडबडीत फर्स्ट क्लास चं तिकीट काढायचं विसरलो म्हणून..", देवांश उत्तर देतो.

"अरे बापरे तु कधीपासून विसरायला लागला गोष्टी..?? तुझ्या बायकोने आठवण नाही का करून दिली??", आराध्या च्या या प्रश्नावर देवांश काही चं बोलतं नाही तशी आराध्या पुन्हा विचारते.


"बाय द वे तुला कधीपासून गोष्टी विसरायची सवय लागली?? "

"पाच वर्षे झाली. ", देवांश शांतपणे उत्तर देतो.

" म्हणजे.. ", भेळ चा घास हातामध्ये तसाच धरून आराध्या फक्त एवढेच बोलते.
(कारण त्या एका \"म्हणजे\" च्या पुढे कायं म्हणायचे आहे आराध्याला हे देवांशला माहित आहे कदाचित म्हणूनच आराध्या पुढे काही बोलतं चं नाही. कारण आराध्या देवांशला पाच वर्षांपूवी चं तर सोडून गेली होती.)

पुन्हा दोघांमध्ये तीचं गुढ शांतता.. मध्ये मध्ये भेळ घेताना त्या पेपरचा होणारा कायं तो आवाज फक्त.

"बेटा तुम एक दुसरे को जानतें हो क्या??", त्यांच्या शेजारी बसलेले काका त्या दोघांकडे पाहून आता देवांशला विचारतात तसे ते दोघेही भानावर येतात.

"हां अंकल.. हम जानते हैं एक दुसरें कों..", देवांश त्या काकांना उत्तर देतो.

आराध्या आता खिडकीतून बाहेर पाहंत बसते पुन्हा भेळ खातं.

" अच्छा है बेटा.. सफर में कोई जाना पहचाना मिल जाए तो सफऱ भीं आसानी से कटता हैं.." ते काका देवांशला बोलतात.

"जी हाँ अंकल.. बहुत सहीं कहाँ आपनें.. ", देवांश त्या काकांना म्हणतो आणि आराध्याकडे पाहतो ती बाहेर बघतं बसलेली असते.

"आराध्या.. एकेकाळी बोलताना आपल्याला दिवस रात्र कमी पडायचे अगदी पण आता समोरासमोर आहोतं तरी काही बोलायचं म्हटले तरी अवघडपणा जाणवतोय.

पाच वर्षांपूर्वी मला त्यावेळी तुला भेटायचं होतं, बोलायचं होत तेव्हा तु माझ्यासाठी तुझ्या पर्यंत पोहोचण्याचे सगळे रस्ते बंद करून टाकले होते आणि आजं अशी अचानक भेटली आहेस.. पुन्हा तु कधी भेटशील असे वाटले चं नव्हते. ", मनातल्या मनात देवांश आज खूप काही बोलतं असतो.

" देवांश.. देवांश.. ", देवांशला आवाज येतो तसे तो समोर पाहतो.. आराध्या त्याच्या समोर उभी राहून खांद्यावर हात देऊन त्याला हलवतं असते.

" तुझा फोन वाजतोय केव्हापासून?? ", आराध्या एवढे बोलून पुन्हा तिच्या सीटवर जाऊन बसते.

देवांश फोन उचलतो आणि फोनवर काही बोलून फोन ठेवून देतो.

"थँक्स...", देवांश आराध्याकडे पाहून म्हणतो तशी खिडकीमधून बाहेर पाहणारी ती आता देवांकडे नजर वळवते.

"उघड्या डोळ्यांनी झोपायची सवय पण लागली आहे का..??", आराध्या मिश्किलपणे देवांशला विचारते.

"नाही तसे काही नाही.. मी ते जरा ..काही नाही ", देवांश बोलणे टाळतो.

" ओके..", आराध्या एवढे बोलून पुन्हा मगाशीच वाचत असलेल्या एका पुस्तकात डोके खुपसून बसते.

"चष्मा कधीपासून लागला तुला?? आणि तु चक्क पुस्तक वाचायला लागली आहेस??", देवांश हळूच आराध्याकडे पाहून विचारतो.

" असचं लागली सवय.. चष्मा लागला तीन वर्षांपूर्वी.. का छान नाही दिसतं आहे का??"

"नाही गं छान दिसतोयं.. सहज विचारले मी..", आराध्या विचारते तसा देवांश उत्तर देतो तिला.


" ह्म्म.. ", आराध्या पुन्हा पुस्तकात डोके घालून बसते.


देवांश ही मगं उगाचचं मोबाईल चाळत बसतो पण त्याला बोअर होऊ लागते म्हणून तो खिडकीतून बाहेर पाहू लागतो.

मावळतीची वेळ ती.. एकीकडे तो रविराज सगळ्या जगाचा निरोप घेऊन जातं असतो आणि दुसरीकडे जाता जाता त्या रविराजाने केलेल्या रंगाच्या उधळणामुळे संपूर्ण आसमंत खूपच लोभसवाणे दिसतं असते.

"आराध्या..", असे म्हणून देवांश तिला खिडकीमधून बाहेर पहायंला सांगतो, तशी आराध्या बाहेर पाहते.

"ब्यूटीफुल..!", बाहेरचे ते मनमोहक दृश्य पाहून आराध्या च्या तोंडातून उद्गार बाहेर पडतात.

"तुला मावळतीचा सूर्य खूप आवडतो ना??"

"ह्म्म..", देवांश च्या प्रश्नावर आराध्या उत्तर देते.

दोघेही तो रविराज आसमंतात विलीन होईपर्यंत त्याच्याकडे पाहंत राहतातं.. इतक्यात पुढचे स्टेशन येते.

"चहा घेऊया..??", देवांश आराध्याला विचारतो तशी आराध्या मानेने चं होकार कळवते.

देवांश स्टेशनवर चहा घेऊन फिरणार्‍या एका  मुलाला आवाज देतो, तेव्हा तो मुलगा येतो त्यांच्या जवळ.

"भैय्या.. चार चाय देना गरमा गरम..", देवांश नकळतपणे बोलतो तशी आराध्या हसू लागते आणि देवांशला ही हसू येते.

क्रमशः

आराध्या का बरं हसली असेल?? आणि देवांशला ही का हसू हसू आले असेल या गोष्टीचा उलगडा उद्याच्या भागात होईल कथेच्या.. पण तत्पूर्वी कथेचा आजचा भाग वाचून तुम्हाला कसा वाटला आजचा भाग आहे कमेंट बॉक्स मधून कळवा मला.

🎭 Series Post

View all