गोष्ट माझ्या पाककौशल्याची

पाककौशल्य
*गोष्ट माझ्या पाककौशल्याची*

तर आहे असं की
प्रत्येकाला कश्या न कश्यात आवड असते. म्हणजे अमुक याला त्याच्यात आवड आहे म्हणून का दुसऱ्यालाही त्यातच असावी असा काही नियम आहे का ?
नाही ना ...
मग प्रत्येक गृहिणीला स्वयंपाकात आवड असायलाच हवी अशी बळजबरी का ?

स्वयंपाकाचा आणि माझा ३६ चा नाही नाही त्याही पेक्षा जास्त ६३ चा आकडा आहे.
फार पूर्वी पासून म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासूनच मला स्वयंपाकाचा कंटाळा.
ह पण खायचा नाही ह. सर्व कर्तबगार हुन्नरी गृहिणीच्या स्वयंपाकाला मी नेहमीच न्याय देते.

जसजसं वय वाढू लागले
तसतसे मी एक एक पदार्थ शिकत गेले.
आणि लग्न जुळेपर्यंत मला
*चहा आणि कुकर लावता यायला लागला* ?
चहा मध्ये आजही मला कुणी टक्कर देऊच शकत नाही यातच आयुष्याची कमाई आली माझ्या. ?

तर खरा *कहाणी मे ट्विस्ट* तर आता आहे.
माझे दोनाचे चार हात झाले.
(म्हणजे माझे हात तर तसेही काही कामाचे नव्हतेच पण असो)
आणि सासरी आल्यावर लक्षात आलं
सासूबाई म्हणजे साक्षात *अन्नपूर्णा* ?आणि त्यांच्या नशिबी देवाने अशी सून का मारली असावी?
हे त्यांचे पुण्य होते की माझे पाप?
असो...
तर त्यांच्या हाताला वेगळीच चव. आहाहा....
कुठलाही पदार्थ खावा आणि खातच रहावा इतक्या त्या सुगरण.
आणि महत्वाचे माझा जेवढा वेळात कुकर लाऊन व्हायचा,
त्यांचा तेवढ्या वेळात पूर्ण स्वयंपाक तयार राहायचा...
(न उलगडलेले कोडे)

मग त्यांच्याच हाताखाली मी चटणी,
पोळी, दाल फ्राय, जिरा राइस, फोडणीचा भात असेल मोठं मोठाले पदार्थ शिकले.
पण अजूनही पदार्थ मला बघून जळतात हो.
आता मी सुंदर आहे त्यात माझा काय दोष.
असो तर मी किचन मध्ये दिसली की,
घरच्यांचे डोळे बाहेर यायचे.
पण मजाल आहे कुणी ब्र काढेल.
मग नवरा हळूच आईला म्हणायचा
*तू कर ना काही आज इच्छा होतं आहे खायची तूझ्या हातचे*
??‍♀️

कालांतराने वेगळे झाल्यावर बरेच नवीन पदार्थांचा मी शोध लावला.
नवरा मुलं गपगुमान सगळे गिळू लागले अन् माझ्यातला आत्मविश्र्वास वाढऊ लागले.
त्यांना आता माझ्या हातची चवेची सवय होत होती.
कधी कधी नवरा सांभाळतो किचन
ते मला आराम मिळावा म्हणून की त्यांना चांगल खायला मिळावं म्हणून हे काही मला माहीत नाही आणि मला माहिती करायचेही नाही.

नवरा टूर वर असला अन् आपण प्रेमानी चौकशी केली
*जेवलास ना रे*
तर म्हणतो कसा
*घरच्या पेक्षा चांगल जेवलो ग*
?
असं असतं बघा.
त्याला मुलंही दुजोरा देतात
*पप्पा लकी आहेस रे*
?
पण मी लक्षच देत नसते.
हे असं आहे
खायचं की नाही तुम्ही ठरवा बस...
अजूनही आमच्या आई मोठं मोठी जबाबदारीचे काम मला देत नाही.
(प्रेम आहे त्यांचे)
वयाच्या *साठीपर्यंत*
*पुरणपोळी* शिकेलच याचे प्रॉमिस केलंय मी नवऱ्याला.
त्याआधी जमली तर कळवते तुम्हाला...

तुमचीच सर्वगुण संपन्न

©®मीनल सचिन
?