गोष्ट माझ्या दोश्याची

विनोदी कथा

दमलेल्या बाबांची गोष्ट ऐकली असेल न ,
आता माझ्या फसलेल्या दोश्याची गोष्ट ऐका ...


हे मात्र अगदी खरं आहे की ,
आपण एखाद्याला कितीही प्रेम दया
पण तो तुम्हाला तेवढेच प्रेम देईल की नाही हे सांगता येत नाही ...
किंबहुना आपन तशी अपेक्षाच ठेवायची नाही
?
आपण स्वतः हुन त्यावर प्रेम केलं होतं न
बस्स तर मग
येणाऱ्या परिणामांची जवाबदारी पण आपलीच
हो ना ...

हो हो
मी तुझ्या बद्दलच बोलतेय
माझ्या प्रिय दोसा

किती प्रेमाने मी तुला
लहाण्याचे मोठे केले .
( म्हणजेच ते वाटून उटून रे ) 

तुझ्या साठी मी सकाळची
माझी आवडती झोप खराब केली
आणि आदल्या रात्री काय
डंका पिटला होता ,
उद्या नास्ता ला तू ( दोसा )
आहेस म्हणून ...

आणि तू ...
तू काय केलंस

माझा प्रेमभंग
तुझे दोन्ही साथीदार
( बटाटा भाजी नी सांबार रे )
अगदी नववधू प्रमाणे तयार होते
बस्स तू आलास की ....

पण तू असा काही रुसून बसला

तुझ्या मुळे किती किती ऐकावं लागलं मला .
सगळ्या सुगरण बायांना फोन करून तुझ्यावरचं औषध मागितलं मी ,
पण आईशप्पथ काही गुण येईल तूला 
वाहत्या पाण्यात सर्वांनी हात धुतले
अ ग जे जमतं तेच करावं माणसाने

पण

तुला काय माहिती
एका रणरागिणीशी गाठ पडली आहे तुझी 
रवा नी आणखी बरेच जिन्नस टाकून
तुला छान घट्ट केलं नी बनविले न तुझे
अप्पे 
शेवटी काय तर ,
तुला कसंही करून साऱ्यांच्या पोटात टाकायला मी जिंकली होती ...


मै झुकेंगा नही साला


ही साठा उत्तराची कहाणी
पाचा उत्तरा सुफळ संपूर्ण ....

©®मीनल सचिन ठवरे