Jan 22, 2021
Love

गोष्ट एका मुक्या प्रेमाची

Read Later
गोष्ट एका मुक्या प्रेमाची

गोष्ट एका मुक्या प्रेमाची 

 

माणसाचा दर्जा माणसाच कर्तृत्व, वक्तृत्व आणि त्यांच्या विचारांवर अवलंबून असतो. माझ तर पक्क मत आहे की हजारात एखादाच या तिन्ही गुणांनी संपन्न असतो. 

काहीलोक म्हणतात "प्यारमे सब जायज है"पण हे तिन्ही गुण संपन्न व्यक्ती अशा काही गोष्टी मानत नसतो, तो आपल्या धुंदीत असतो.  अशा माणसांची ह्या तिन्ही गुण संपन्नतेमुळे काही वेळा हार ही पदरात पडते.  पण अशा व्यक्तीला अशा हारेची पर्वा नसते. 

माझ्या कथेचा नायक ही असाच तिन्ही गुणसंपन्न आहे. माझ्या कथेचा नायक हा एका मुलीच्या प्रेमात पडला आहे. कथेच्या नायकाचे नाव रवी आहे आणि तो ज्या मुलीच्या प्रेमात पडला आहे त्या मुलीचं नाव किरण आहे. 

रवीच घर हे किरण च्या घरापासून काही अंतरावरच आहे.  रवीची घरची परिस्तिथी मध्यम वर्गीय आणि किरण खानदानी श्रीमंत.  रवीचा स्वभाव मुळातच शांत आणि सरळ असल्या कारणाने एव्हड्या वर्षात तो तिला पाहून नपाहिल्या सारखाच होता. दोघेही गावठीकाणी राहतात.  गावचे लोक सगळे सण हौशे मौजेने साजरे करतात. दहीहंडी चा सणं ही मोठ्या हौशेने साजरा होतो अशाच दहीहंडी च्या निमित्ताने किरण एकदा रवीच्या घरी आली होती तेव्हा रिमझीम मस्त पाऊस पडत होता रवीची नजर अचानक किरणवर पडली आणि रवी  जागीच हबकला,  आणि मनातल्या मनात तिच्या सौंदर्याची तारीफ करू लागला... 

"असंच होत स्वप्न सुंदर,  आयुष्याला मी पाहिलेलं 

देवानेही हातच राखून, सौंदर्य तुला वाहिलेलं "

याच क्षणी रवी किरणच्या प्रेमात पडला.  आता त्याला हे जग वेगळंच जाणवत होत. तो खूपच शांत व वैचारिक झाला होता. त्याचे डोळे सतत तिला शोधत तिच्या वाटेकडे लागलेले असायचे. ती दिसताच क्षणी रवी खूप आनंदून जायचा. एकेकाळी गावातल्या सणा कार्यात जायला कंटाळणारा रवी आता सगळ्या कार्यात पहिली हजेरी लावायचा कारण रवीला किरण बरोबर एकदा तरी बोलण्याची आणि पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होती. आता किरणने तिच्या मैत्रिणींकडून आणि स्वतः ही जाणलं होत रवीच प्रेम. 

किरण आता टाळाटाळ करू लागली होती. रवीचाही सज्जनपणा तिझ्याशी बोलण्यात आडवा येत होता.  रवी तिच्या मैत्रिणींमार्फत किरणला काही सांगण्याचा प्रयत्न करत होता पण काय सांगावं काही सुचत नव्हतं. 

थोड्याच दिवसात रवीने शहरात एक नोकरी शोधली व तो नोकरीवर रुजू झाला.  जसजसे दिवस जातहोते रवीचे किरण वरचे प्रेम आणखीनच वाढत होते.  एकदा रवीला कळलं की शहरातली त्याची मैत्रीण ही किरणची वर्ग मैत्रिण आहे. मागकाय रवीला हा एक बहाणाच मिळाला. 

एकदा असच रवीच्या ऑफिस मधून रवीने खूप मन एकाग्र कायेंऊं आणि हिम्मत करून किरणच्या घरी कॉल  केला आणि नशिबाने कॉल हा किरणनेच उचलला. जणू तिला माहित असावं की रवीचाच कॉल येणार आहे. रवीचे हातपाय लटलटत होते,  अंगावर काटा आला होता.  रवी म्हणाला "मी टेलिफोन एक्सचेन्ज मधून बोलतोय,  तुमच्या लाईन मध्ये काही खराबी तर नाही ना?? "

किरणने उत्तर दिले, "लाईन बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही. "

पुन्हा रवी म्हणाला "तुमचा नंबर एकदा कन्फर्म करा.. 238865..बरोबर ना? "

किरण म्हणाली "हो "

रवी म्हणाला "तर तुमचं नाव जरा सांगता ka?? "

ती म्हणाली "किरण....... "

रवीने विचार केला की किरणने तिझ्या बाबानं ऐवजी स्वतःचे नाव का सांगितले असेल. पण उत्तर नाही सापडले. रवी खूपच खुश झाला आणि फोन ठेवला. रवीने खूप विचार करून किरणच्या वर्गमैत्रिणीचा फोन नंबर मागण्याच्या बहाण्याने किरणला पुन्हा कॉल केला,  तो कॉल सुद्धा किरणनेच उचलला,  मग रवी म्हणाला "हॅल्लो कोण किरण?  मी रवी बोलतोय" किरण म्हणाली "कोण " रवी म्हणाला "मी रवी मला पूनमचा (शहरातली मैत्रीण ) फोन नंबर हवा होता" मग किरणने लगेच नंबर दिला.

आता रवी हळूच आवाजात म्हणाला "माफकरा,  मगाशी मीच कॉल केला होता." त्वरित किरण उत्तरली "मला माहित आहे ". आता रवीच्या तोंडचं पाणीच पळाल होत. फोन ठेऊका असं विचारत रवीने फोन ठेवला.  

रवी खूपच खुश होता आता कारण किरणने जाणून सुद्धा रवीबरोबर बोलली होती. अशा प्रकारे रवीला त्याच्या प्रश्नाचे उत्तर इथे मिळाले होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे पाच दिवस कॉल केले. सर्व कॉल किरणच उचलायची जाणून बुजून पण रवीची हिम्मतच होत नव्हती आपलं प्रेम स्पष्टपणे व्यक्त करण्याची. रवीला सतत ती रागावेल किव्वा नाकारेल याची भीती वाटत असावी. एकदातर ऑफिस मध्ये मिटटींग चालू असल्या कारणाने रवीला ऑफिस मधून कॉल करणे शक्य नव्हते म्हणून त्याने पी. सी. ओ.  वरून कॉल करून तिला सांगितले होते की "आज बोलायला जमणार नाही तरी मी उद्या कॉल करतो, चालेल ना? " तर ती चक्क "हो चालेल " असं म्हणाली. मग काय रवीचा आनंद गगनात मावेना कारण किरणच्या "हो चालेल " या शब्दांनी किरणच्याही रवीबद्दलच्या प्रेमाची रवीला जणू पावतीच मिळाली होती. 

पण नियतीच्या की तिच्या मनात काही औरच होत.  रवीने पुन्हा किरणला कॉल केला,  रवी म्हणाला "मला तुला काही सांगायचं आहे पण कसे बोलू शब्दच सुचत नाहीत मला,  तुला तर समजत असेलच. 

रवी म्हणाला "जर तुझा हो असेल तर आत्ता माझ्या ऑफिस मध्ये कॉल कर मी समजून जाईन ". रवीने फोन ठेवला आणि लगेंच ऑफिसच्या फोनची रिंग वाजली, रवीने मन एकाग्र करून छातीमध्ये जोरात धडधडणाऱ्या हृदयाला शांत करत फोन उचलला तर तो कॉल दुसराच कुणाचा होता. खूप वेळ सरला पण किरणचा काही कॉल आला नाही. रवी खूप हताश झाला होता. दुसऱ्या दिवशी रवीने किरणला कॉल केला तर तिकडून किरण उत्तरली "तुम्हाला काय बोलायच आहे ते स्पष्ट आणि आत्ता बोला,  पुन्हा कॉल करू नका ". यावेळी रवीच्या पायाखालून जमीनच सरकली होती.  रवी म्हणाला "मी काय बोलणार?  मला काही बोलायच आहे पण हिम्मतच होत नाही माझी". त्यावर किरण म्हणाली "मी फोन ठेवते ". रवी ओरडत होता "एक मिनिट एक मिनिट माझ ऐकूनतर घे " पण नाही किरणने फोन ठेवला होता आणि रवीच्या प्रेमाचा येथे हा असा अंत झाला. 

अजूनही किरणला पाहून रवीची छाती धडधडते पण प्रेमाची इच्छा मात्र झडते. रवी आणि किरणच नातच ते काय फोनवरच जुळलं आणि फोनवरच तुटलं. 

रवी हा सज्जन जरी असला तरी सज्जनपणा आणि दुसऱ्या व्यक्ती बद्दलचे आकर्षण या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. आकर्षणाचं मोठं उदाहरणं द्यायचं झालच तर विश्वमित्र आणि मेनका तर या रवीची काय बिशाद. फोन मात्र कारण हा एक आकर्षणाचा भाग होता. 

कदाचित अजूनही रवीबद्दल किरणच्या मनात प्रेम असेलही पण आता रवीचा प्रेम या गोष्टीवर विश्वासच नाही उरलाय. 

रवीच्या आयुष्यात आकर्षणाच्या भावनेत प्रेम हे मृगजळासारखं जाणवल एव्हडं मात्र खर...