गोष्ट आहे किरणची भाग-1

Gosht Ahe Kiranchi Part1


मोबाइल ची बेल वाजली.म्हणून किरणला जाग आली.तशी ती दररोजच लवकर उठत असे.पण आज जरा विशेष होते.

उठुन तिचं स्वतःचे सर्व आवरून झाले होते.आईही उठुन, तिचीही आवरण्याची लगबग सुरू होती.तरीपण वृषाली उठली नव्हती.म्हणुन आई किरणला म्हणाली,
"वृषालीला उठवना, किरण,आवरायला पाहिजे ना?"
"हो उठवते." किरण म्हणाली.
चहा घेऊन झाल्यावर ती वृषालीला उठवु लागली.


सोनाली आणि वृषाली दोघीही उठल्या.
वृषाली स्वतःहाचे कान पकडत सोनालीला म्हणाली."स्वारी दी.आज माझ्यामुळे तुला बघायला येणार्या पाहुण्यांना \"नंतर या\"असे सांगावे लागले.

अंथरुणाच्या घड्या करत करतच सोनाली म्हणाली,"त्यात काय विशेष, येतील ना परत कधीतरी."
असे म्हणत तिने सर्व अंथरुणं व्यवस्थित ठेवले.
या दोघींचे आवरेपर्यंत किरणताईने स्वयंपाक केला.

आज वृषालीचा आई-वडीलां सहित सत्कार समारंभ पुणे येथील \"तनिष्क\" हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला होता.

या कार्यक्रमासाठी तीघींना म्हणजे, किरणताई आणि तिच्या दोन्ही लेकी सोनाली अन् वृषाली जाणार होत्या.आई येणार नव्हंती.

तरीपण \"आवरा\" असे म्हटले की समोरील व्यक्तीस हुरूप येतो.तसेही किरणताई दररोजच साडेनऊ पर्यंत दुकानात जातच होत्या.

………..

" एस वृषाली किरण"
हे नाव उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कडकडाटात तिचे स्टेजवर आगमन झाले.
ठेंगण्या बांध्याची, निमगोरी, मध्यम देहयष्टी असलेली ही तरुणी.. तरुणी कसली??
ही तर क्लास वन अधिकारी.! क्लास वन च्या पोस्टवर सलेक्ट झालेली.

काही दिवसापूर्वीच स्पर्धा परीक्षेचा रिजल्ट लागला होता.\" गरुड झेप क्लासेस\" चे बरेच विद्यार्थी या परिक्षेत सलेक्ट झाले होते.या सर्वांमध्ये \"एस वृषाली किरण\" ही सगळ्यात अव्वल होती. म्हणून क्लासेसने या सर्वांचा आई वडिलांसहित सत्कार व गौरव सोहळा, क्लासेसच्या हेड सरांनी, म्हणजेच श्रीरंग सरांनी ठेवलेला होता.

शिक्षणाधिकारी साहेब, या सत्कार सोहळ्याला, \"अध्यक्ष\" म्हणून लाभलेले होते.

सत्कारासाठी वृषालीचे औक्षण केले गेले. स्टाफ मधील शिक्षिका गौरी मॅम ने तिला औक्षण केले.
हेड सरांनी "वृषाली मॅम, तुमचे आई-वडील आले असतील तर त्यांनाही इकडे बोलवा." असे सांगितले.
"ठीक आहे सर." असं वृषाली म्हणाली. म्हणून तिने आईला स्टेजकडे बोलावले.

समोर बसलेल्या किरण ताई उठून स्टेजकडे आल्या. आणि वृषाली जवळ जाऊन उभ्या राहिल्या.
हे पाहून गौरी मॅम म्हणाल्या, "आणि पप्पा नाही का आले?"
"नाही मॅम." असे वृषालीने सांगितले.

स्टेजवर किरणला पाहुन जे क्लासेस चे हेडसर होते, ते तर अवाकच झाले. आणि तिच्याकडे पाहून ते उद्गारले.
" किरण तू!!अन् इथे??"
हा अनपेक्षित प्रश्न ऐकून किरण ताई ही कावर्या बावर्या झाल्या.आणि सरांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागल्या. नुसती किरणताईच नव्हे. तर.. स्टेजवरील सर्वच जण प्रश्नार्थक चेहऱ्याने एकमेकाकडे बघू लागले.

समोर असे अचानक श्रीरंगरावांना पाहून किरण ताई ही गोंधळून गेल्या. असं हे पाहून श्रीरंग सर उठून किरण ताईकडे आले. आणि त्यांनी विचारलं," किरण, ही वृषाली मॅम म्हणजे तुझी…?" वाक्य पूर्ण होण्याअगोदरच.

🎭 Series Post

View all