तिला पाहुन मला माझ ते रूप आठवलं,जेव्हा नुकतीच मी छापखान्यातुन बाहेर आलेले. गोरा रंग,त्यावर गुलाबी नक्षी असलेल्या रिकामी ओळी आणि वरही गुलाबी कलरच कव्हर आणि अंगाला एक सुंदर सुवास.
मी दुकानात अशी मिरवत बसलेली आणि ती आली..काहीतरी स्पेशल हवं शोधणाऱ्या नजरेन तिने मला हेरलं.ती ही गोडचं होती. शेलटी अंगकाठी ,गव्हाळ रंग,उत्सुकत्ता पुर्ण भिरभिरते डोळे आणि सतत हसुन आपली चंचलता दाखवणारी तिची चेहरापट्टी मला तर जाम आवडली.
मला खोक्यात बांधुन माझी पाठवणी केली गेली होती तिच्याकडे..तिचा तो स्पर्श मी कधीच विसरू शकणार नाही.मलमली हातांनी तिनं मला कुरवाळलं .तिचा अलवार स्पर्श मला मोहरून गेला. आतापर्यत मला जाड्या मशीनी नि राकट हातांनीच हाताळलं होतं पण तिने मात्र प्रेमाने माझा गंध तिच्या श्वासात भरला आणि मी माझ्या मालकिणीच्या प्रेमात पडले.
हाय !काय दिवस होते ते..ती माझ्यात स्वत:च्या भावाना उतरवायची तेव्हा तिच हळुवार हातांनी पकडलेल पेन माझ्या शरीरावरून अगदी मोरपीसासारख फिरयचं .
तिच ते पेन ..किती प्रेम करायचं माझ्यावर .मला त्रास होऊ नये म्हणुन अलगद फिरायचं.पण हाय हे मिलन फक्त रात्रीचच व्हायचं.
मी दिवसा कपटाच्या आत दडलेली आणि माझा प्रियकर तो मात्र माझ्या सवतिबरोबर तिच्या अभ्यासाच्या नावाने दिवस रात्र लगट करत बसायचा.
कधी मी रूसली तर मुद्दाम माझ्या शरीरात स्वत:ची नीब टोचायचा ,आई ग! असा राग यायचा त्याचा कि काय सांगु.
पण, जेव्हा तिच्या मनातल ती लिहायची तेव्हा मला फार छान वाटयचं.कीतीतरी तिच्या मजा माझ्या ह्द्यात तिने बंद करून ठेवलेल्या.खासकरून तिला आवडणारा तो.
त्याच वर्णन ती जेव्हा लिहायची ,काय गुदगुली व्हायची माझ्या मनाला.ती लिहायची..
"तो तसा दांडगा आहे पण ,भारी करामती आहे. टीचरच्या खोड्या काढुन जेव्हा वर्गाला हसवतो तेव्हा मला जाम आवडतो."
"कधी कधी वाटतं तो हळुच माझ्याकडे बघतो आहे. खासकरून पी.टी.च्या तासाला तेव्हा तर मी कुठे लपु असं होतं. तो उंच आहे .जेव्हा तो उन्हात वॉलीबॉल खेळतो ना ..!तेव्हा उन्हात अगदी तांबुस होतो."
"मला तेव्हा तो अजुन सुंदर दिसतोआणि जेव्हा माझ्याकडे पाहुन हसतो तेव्हा मला वाटतं मीही सुंदर आहे.नाहीतर क्लासमध्ये सगळेच मला हुशार ढापणी म्हणुनच चिडवतात.पण,तो तसा नाही आहे. त्याला मी आवडत असेन का?"
हे वाचल्यावरती असं वाटयचं एकदा तरी तो भेटावा. दिसायला ,वागयला कसा असेल तो माझ्या पेनासारखा बेर्दद बालम, का माझ्यात खुणेसाठी ठेवलेल्या फुलासारखा सुकुमार अलवार राजकुमार.
एक दिवस मात्र तिने धीर करून मला शाळेत नेलं आणि शेवटच्या तासाला मला हळुच त्याच्या दप्तरात टाकलं.तिने मला सांगितल होतं कि ती आता तिच्या भावना माझ्यातर्फे त्याला सांगणार आहे आणि मला होकाराच उत्तर घेउनच ये म्हणुन दटावणीही केलेली.
मी ही उत्साहात होते , हे पहायला कि तो कोण आहे माझ्या मालकिणीचा जीवलग, पण जेव्हा मी त्याच्या दप्तरात गेले तेव्हा तर असं वाटलं होतं.
"आई ग..!वाचवा हो कुणीतरी..किती घाण होती त्याच्या दप्तरात.."आई गं..!बिचारे दप्तर काका. किती सहन करतात ते.मला तर अगदी घुसमटल्यासारख वाटत होतं..ते बिस्कीटाचे चुरे , ते केळीची साल आणि पेनाची टोपण ..देवा देवा..!नरकच पाहीला होता मी त्याच्या दप्तरात."
त्याच्याबरोबर कशीतरी झुलत मी घरी त्याच्या आले.माझ्यासारख्या बाकी वह्यांही माझ सुंदर रूप पाहुन नाक मुरडत होत्या.
का ? नाही मुरडणार नाक.कोणी सहामाहीतच पिवळ्या पडलेल्या तर कुणी पाने फाडल्यामुळे रोडवलेल्या. तर कुणाला पेन घासुन घासुन कुरूप बनवलेलं.
मेल्याने त्यांच एक पान नीट सोडल नव्हत.."आई ग..!मला नाही राहयच ह्याच्याकडे .देवा मला सुरक्षित मालकिणीकडे पोहचव रे..!मी देवाचा धाव करत राहिले.
"पण, देवाला माणसांची प्रार्थना ऐकायला वेळ नव्हता तर मी निर्जिव पामराचे हाल कोण दुर करणार.
"पण, देवाला माणसांची प्रार्थना ऐकायला वेळ नव्हता तर मी निर्जिव पामराचे हाल कोण दुर करणार.
तो आला नि त्याने तसचं मला चिकट मॅगीच्या हाताने माखलं. किती फटाफट आणि धिडसघाईत हाताळत होता मला . माझी एक बाजु मधुनच एका हातातच धरलेली आणि माझी तर दुसरी बाजु हवेत लोबंकळुन दुखत होती.
"आई गं..! किती दुखतयं..लागा पन्नो पे डाग ..छुपाऊ कैसे .?मैं अब घर जाउ कैसे..?"असं वाटलं होतं मला.
माझ्या गोऱ्या पानांना पिवळे ,लाल डागांनी माखत खिदळत तिच्या प्रेमभावना तो वाचत होता.
मी तर परत गेल्यावर तिला सांगणार आहे..बाई शहाणी असशील तर अश्या बेशिस्त माणसांबरोबर नातं जोडुच नको.
हे काय कमी होतं म्हणुन थोड्या वेळाने त्याच्या आई तरातरा आत आली.मला पाहुन सरसर माझी पाने पलटवली नि माझे पान करर्कन फाडलं.आई गं..किती दुखलं होतं मला.
माझी मालकिण पण पान फाडताना बरोबर दोरेवाली दोन पाने पाहायची मग मला हळुच कुरवाळुन पानांना विलग करयची..पण ही बया राक्षस कुठली.
अरे! ह्या बाईला तर प्रायव्हसी पण माहीत नाही.सरळ आली आणि घेतली समोरची वही नि फाडल पान..नको अशी सासु माझ्या कोवळ्या मनाच्या मालकिणीला नकोच .
अरे! हे काय करतोय, तुझ्या वहीच पान घेना..माझ्याच पाठी काय उत्तरें लिहीतो आहेस..काय ह्याच पेन आहे..किती दमाटतो माझ्यावर .माझ्या पानात भोकचं पाडलं ..आणि काय ते अक्षर..कोंबडीचे पाय..बिलकुल शोभत नाही माझ्या गोऱ्या रेखीव पानांना.काय रे!पाटीवर अक्षरे गिरवताना झोपा काढत होतास काय?
देवा !काही तरं ..पण ह्याचा होकार नसु दे गं..कुठे माझी शुद्घलेखन ,टापटीप ,मोत्याच्या अक्षरवाली गोड मालकिण आणि कुठे हा कोंबडीचे पाय काढणारा ,गभाळा ..जोडी जुळेल काय?
**************************************
"आज चार दिवसांनी शाळा उघडणार ..आज मी माझ्या मालकिणीकडे जाणार..माझ्या लाडक्या पेना मी येत आहे तुझ्याकडे.."
"अरे हे काय..काढना !मला बाहेर ..मला बाहेर जायचयं." अशी माझी तगमग होत होती. दप्तर काकांना मी विचारलही की काय होतं आहे..आपण सगळे खोक्यात बांधुन कुठे जात आहोत ?"
काकांनी जे मला सांगितल त्यानंतर तर मला जगावसच वाटत नाही .."देवा का ..असं मी काय पाप केल होतं जी मला ही शिक्षा दिली ?" हा प्रश्न आजही मनात सतावत राहतो,पण उत्तर मात्र कधीच मिळालं नाही.
त्याच्या बाबांची बदली झाली होती आणि आम्ही दुसरीकडे गेलो.
त्याच्या बाबांची बदली झाली होती आणि आम्ही दुसरीकडे गेलो.
तेव्हापासुन माझी नी माझ्या मालकिणीची ताटातुट झाली..आता मी हिशेबाची वही बनली आहे..मलाच माझे रूप ओळखता येत नाही आहे.माझी पाने निखळुन काढली आहेत.कधी सामानाच्या यादीसाठी तर कधी घर खर्चाचा हिशोब लिहण्यासाठी.आता मीही पार खंगली आहे.कोणतही माझे पान आता कोरें नाही...
आता लवकरच मी रद्दीत जाणार आहे, पण मनात एकच समाधान आहे कि तो तिला काय म्हणला होता ह्याचं उत्तर फक्त मलाच माहित होतं आणि बरं झाले कि ते तिला कळलं नाही ...नाहीतर तिच्या अश्रुचं ओझ मला सावरता आलं नसतं.
समाप्त
***********************************
एका उपक्रमात एका वहीची भावना मांडायची होती.तुमची अशी कोणती अधुरी प्रेमकथा होती का?मला नक्की कमेंटमध्ये सांगा.