Login

सत्कर्म

पारिजातक आणि मानव
पारिजातका फुलासारखे लाभले
जरी काहीकाळ मानवास आयुष्य
पसरावी चोहीकडे सुगंधाने ख्याती
नको उगाच मोह असण्याचा दीर्घायुष्य

नाजूकता त्याची घ्यावी बोलताना
पांढरा रंग खुणावे शांत स्वभाव
केशरी दांडा म्हणतो वेगळे दिसावे
सत्कर्माने झळकावे स्वतःचे नाव

इतर फुलांचा हेवा न करता
आपले स्वत्व नेहमी जपावे
दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यास
स्वार्थ बाजूला ठेवून खपावे

वाऱ्याच्या झोकाने खाली पडता
मृत्यू अटळ स्वीकारायला हवा
क्षणभंगुर देहाचे सत्य जाणता
शिकू नित्य अनुभवाचा धडा नवा

© विद्या कुंभार

फोटो सौजन्य: साभार गुगल

🎭 Series Post

View all