Login

गोंदण

गोंदण एक वेदनादायक अनुभव
सकाळचे दहा वाजत आले होते.चौकातून आरोळी आली ," सुया बिब्बे घ्या, गोंदण काढून घ्या".….. आजीने त्या गोंदण काढणाऱ्या बाईला हाक मारली .हिरव्याकंच नऊवारी लुगड्यात डोक्यावर बुट्टी घेऊन त्यामध्ये पिना चापा,आरसे कंगवे ,रबराची पाकिटे सुया दाभने  व गोंदन काढायचे साहित्य घेऊन आली आजीने तिला टोपली उतरवायल मदत केली टोपली खाली ठेवून मावशी दारात फतकल मारून बसली .तिच्याकडून सुया दाभण घेतली आजीने, थोडं पाणी प्यायला द्या माय म्हणत तिने आजीकडे पाणी प्यायला मागितले आजीने गडबडीने आणि थोडं पाणी माजघरात जाऊन आणले व तिला प्यायला दिले स्वतःच्या टोपलीतून स्वतःचा चार ठिकाणी पोचे आलेला तांब्या तिने काढला थोड्या पाण्याने खळबळून त्यात तिने आजी ला पाणी घाला असे सांगितले आजीने ही वरून त्यात पाणी ओतले.  उन्हात पायपीट करत आलेली ती खुप तहानली होती
तिने गटागटा ते सर्व पाणी संपवले म्हणाली स ,"नाती आल्यात जणू सुट्टीला गोंदण काढून घ्या की मावशी". आजी म्हणाली "बरी आठवण केलीस बस बाई बोलावते माझ्या नातीना". आजीने हाक मारतात धडाधडा जिने उतरून आम्ही चौघी खाली येऊन बसलो .मोठ्या मावशीच्या मुलीला फार हौस, ती पटकन तिच्या पुढे जाऊन बसली तिने hआताच्या बेचक्यात तिची मान घट्ट धरली.व आजीकडून एक दिवा मागून त्याच्यावरती सुई गरम करू लागली रंगाची डबी काढून त्याच्यात सुई बुडवली व ताईच्या कपाळावर काढू लागली हौसेने बसलेली ताई वेदनेने कळवळू लागली .तिची पकड ढीली नव्हती, त्यामुळे तिच्या कचाट्यातून ती मान सोडून घेऊ शकत नव्हती म्हणून  शेवटचा उपाय म्हणून तिने भोंगा पसरला जोराने ओरडून रडू लागली. तो आवाज अगदी कोणाला सहन होईना...... समजून सांगितले थोड्यावेळाच काम आहे,  रडू नकोस आत्ता होईल बघ आणि गोंदण काढून घ्यावे तेच बायकांची मरणापर्यंत साथ करतो .बाकी काही येत नाही बाईच्या बरोबर गोंधळ घातला ताईने रडून ती लाथा मारत होती हात पाय झाडत होती.कपाळ लालबुंद झाल होत. तिची धडपड त्या बाईला आवरेना म्हणून  शेवटी  ती बाई तिला म्हणाली ," आता परत ओरडली स्तर तुझ्या जिभेला चटका लावेल हे ऐकून ताई शांत बसली पण तिच्या चेहऱ्यावरच्या वेदना आम्ही समजू शकत होतो त्या डोळ्यातून पाणी गळत होते तिचा पूर्ण चेहरा वेदनेने आक्रसून गेला होता ते सर्व दृश्य पाहून आम्ही पाठी बसलेलो  दोघी बहिणींनी पाठीच्या पाटी माडीवर पोबारा केला व दाराला आतून कडी लावून घेतली. कुतूहल असल्यामुळे माडीवरून वाकून आम्ही ते दृश्य पाहू लागलो धाकटी मावशीची धाकटी मुलगी मात्र आजीच्या कचाट्यात सापडली आजीने तिला गच्च धरून ठेवले मोठ्या ताई नंतर तिचा नंबर लागला तीही तशीच वेदनेने कळवू गोंदन काढून घेतली शेवटी आम्हा दोघींना आजीने खूप हाका मारल्या पण आम्ही काहीकेल्या कडी काढली नाही.आम्हाला हाका मारून मारून शेवटी कंटाळून आजीने तिला एक भाकरी भाजी व ताक दिले .गोंदण काढायचे पैसे बाईने पिशवीत घातले.आजीला आम्हा दोघीना बोलवा म्हणू लागली. पण एकंदरीत या प्रकरणाचा धसका घेतलेल्या आम्ही दोघींनी खाली यायचे टाळले तेव्हा कंटाळून आजी तिला म्हणाली..…. "जा बाई आता या दोघी काही गोंदण काढून घेत नाहीत असे वाटते .राहू दे परत एकदा आलीस की बघूया ,"....अक्षरशः ती बाई गावची वेस ओलांडू पर्यंत आम्ही माडीवरून तिला पाहत होतो आम्ही संध्याकाळपर्यंत खाली आलो नाही ...आम्ही काही गोंदण काढून घेतले नाही दुसऱ्या दिवशी बाबांना सांगून आजीला सांगायला लावल की आम्ही काही गोंदण काढणार नाही. जबरदस्तीने आम्हाला काढायचं नाही. यामुळे आजीने परत आम्हाला गोंदन काढायची सक्ती केली नाही.आज ३० वर्षानंतर आमच्या बहिणींना त्या गोंदण काढणाऱ्या बाईच्या नावाने खडे फोडताना पाहते. त्याना हवी तशी फॅशन करता येत नाही सलवार कुर्ता जीन्स घातलं तरी पण ते कपाळावरचं गोंदण उठून दिसतं त्यामुळे सगळा लूकच चेंज होतो आम्ही दोघी बहिणींनी सावधगिरी बाळगून त्या वेळेला पळ काढला त्याचे आम्हाला खूपच कौतुक वाटते बरे झाले नाही तर त्या दोघी सारखी आमची अवस्था झाली असती.
सगळ्या अंधश्रद्धा ना आपण किती खतपाणी घालायचे ते शेवटी आपल्यावरच असते.पण आज मात्र ती फॅशन झाली आहे टॅटू च्या नावाखाली सर्व स्त्रिया आपल्याला पाहिजे ते पाहिजे त्या अवयवावर गोंदवून घेत आहे आम्ही त्या अनुभवापासून सुद्धा खूप लांब आहोत. शरीराला वेदना देऊन काय ते प्रदर्शन करायचे आपल्या रसिकतेचे ..... असो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्हाला ती वेदना त्यावेळेला बघवली नाही म्हणून आम्ही ते गोंदण काढून घ्यायचं टाळलं