गोंदण कथामालिका (भाग - १५)
कथा पुढे-
कावेरीच्या मनात पटेल मॅडम साठी वेगळीच श्रद्धा निर्माण झाली. पण त्या रोज शिकवायला यायच्या नाहीत, आठवड्यात कधीतरी एकदा, कुणी शिक्षक रजोवरती असेल तर त्या वर्गामध्ये यायच्या.
पण कावेरी न चुकता त्यांना सकाळी भेटून नमस्ते म्हणून यायची.
पण कावेरी न चुकता त्यांना सकाळी भेटून नमस्ते म्हणून यायची.
त्यापण ती भेटेल तेव्हा तिला काहीतरी नवीन सांगायच्या किंवा विचारायच्या . मनातल्या छोट्या छोट्या शंका ती विचारायची. पण एक होतं की त्यांना नुसतं भेटलं तरीही तिला खूप छान वाटायचं.
शिक्षक असाच असावा ज्याला शंका विचारायची भीती वाटू नये , असं काहीतरी तिचं मत बनलं होतं.
शिक्षक असाच असावा ज्याला शंका विचारायची भीती वाटू नये , असं काहीतरी तिचं मत बनलं होतं.
कावेरी सोबत उर्मी, सिंधू, शारदा, सुनिता आणि इतर दोघी मैत्रिणी यांचा छान एक गट तयार झाला होता. कावेरी हुशार असल्याने सगळ्यांना तिच्याशी मैत्री करावी वाटे. वर्गातही ती बरेचदा मॉनिटर असायची.
तर ही चाणाक्ष व चतुर बुद्धीची कावेरी आता सातवीत आली होती. वयाच्या मानाने व्यक्तिमत्त्व ही निखरत होतं. समजदारी वाढली होती. आता पूर्वीसारख पटकन शंका विचारल्या नाही तरीही विचार केल्यावर उत्तर नाही सापडलं तर मात्र ती प्रश्न विचारायची.
काही शिक्षकांना तिचं हे प्रश्न विचारणं कौतुकास्पद वाटायचं तर काही शिक्षकांना तयारी केल्याशिवाय त्यांच्या वर्गात जावंसं वाटायचं नाही.
परंतु काही शिक्षकांना त्या प्रश्नांचा वैताग यायचा. ८५-९५ या काळात इंटरनेट किंवा कंप्युटर वगैरे असं काहीही नव्हतं त्यामुळे शिक्षक किंवा पुस्तक हे दोनच मार्ग होते ज्ञान मिळवण्याचे .
परंतु काही शिक्षकांना त्या प्रश्नांचा वैताग यायचा. ८५-९५ या काळात इंटरनेट किंवा कंप्युटर वगैरे असं काहीही नव्हतं त्यामुळे शिक्षक किंवा पुस्तक हे दोनच मार्ग होते ज्ञान मिळवण्याचे .
शंका निवारणासाठी शिक्षकांना विचारणं सोपं होतं. पण शिक्षकांना हे प्रश्न विचारण्यासाठी ही हिंमत लागते ती मात्र सगळ्यांत नसायची.
शिक्षक -शिक्षिका म्हटलं की अगोदर भीती वाटायची. एक आदरयुक्त भीती.
शिक्षक -शिक्षिका म्हटलं की अगोदर भीती वाटायची. एक आदरयुक्त भीती.
तर झालं असं की एक दिवस विज्ञानाच्या वर्गात भौतिक शास्त्राच्या मॅडम "उष्णता" (Heat) हा पाठ शिकवत होत्या. त्यांनी उष्णतेचे प्रकार व त्याचे उपयोग वगैरे सांगायला सुरूवात केली.
कावेरीच्या मनात विचारचक्र सुरू झालं , म्हणजे भौतिक शास्त्राच्या उष्णतेमुळे जीवशास्त्रातले जीव आहेत नाही का?
जीवशास्त्रात प्रकाश संश्लेषण शिकवलं होतं तेव्हा सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती आपलं अन्न बनवतात असं सांगितलं होतं सरांनी.
मधल्या सुट्टीत सिंधूने विचारलं होतं की "वनस्पती म्हणजे झाडंच ना कावू मग ते भाजी भाकर कसं बनवित्यात ?"
उर्मी , सुनिता व कावेरी खूप हसल्या होत्या.
"अगं तसं नाही काही . त्यांच्यामधे ते क्लोरोफिल असतं ना , तेच त्यांचं अन्न!" कावेरीने समजावण्याचा प्रयत्न केला होता पण सिंधूला मुळी \"क्लोरोफिल \" या शब्दाचं उच्चारणच करता आलं नाही . मग जो धुमाकूळ घातला हिता मैत्रिणींनी! प्रत्येकजण तिच्याकडून तो शब्द म्हणून घेण्याचा प्रयत्न करत होतं.
सूर्याला तर इतका मोठा आगीचा गोळा म्हणतात, इतक्या वर्षांत तो विझला नाही का ?
मग ते काय असेल जे इतकी वर्षं जळत आहे?
बरं काहीही जाळ लं तर धूर निघतो याच्यावर तिचं मैत्रिणींशी संगनमत झालं होतं.
पुन्हा दुसर्या दिवशी उष्णता एक उर्जेचा प्रकार आहे असं मॅडमनी सुरूवात केली की कावेरी म्हणाली की "बाई तुम्ही काल जे शिकवलं त्याच्यावर माझ्या मनात एक शंका आहे विचारू का ?"
"विचार पण उगीचच काहीही विचारून वेळ खाऊ नकोस. माझा पाठ्यक्रम तुमच्या वर्गात मागे पडलाय."
म्हणून तिने मॅडमला अदबीने विचारलं की" बाई चंद्रपण रात्री प्रकाश देतो ना तर , चंद्रावर माणूस कसा गेला होता?"
"अच्छा! पण चंद्रात उष्णता नाही ना फक्त प्रकाश आहे आणि तो पण स्वतःचा नाही तो तर परावर्तित प्रकाश आहे."
मग मॅडमनी विस्तृतपणे त्या घटनेबद्दल , चंद्रावर कसे गेले होते वगैरे सांगितलं.
पुढचं कुतूहल म्हणून तिने पटकन विचारलं ,"बाई चंद्रावरती लोक गेले मग सूर्यावरती का जात नाहीत?"
आता मात्र मॅडमला तिच्या या प्रश्नामुळे वैताग आला व त्या वेगळ्याच सुरात म्हणाल्या , "कावेरी खिडकीतून बाहेर बघ. दुपारची वेळ आहे नाही का ? तर तिथे शाळेसमोर जे पत्र्याचं घर आहे ना त्या पत्र्यांवर चपलेविना जाऊन उभी राहा. कितीवेळ उभारशील ? मग त्यानंतर तुला कळेल की माणूस सूर्यावर का जात नाही?"
सगळी वर्गातली मुलं टाळ्या देवून देवून हसली.
तिच्या मैत्रिणीं व मुलीही हसल्या.
कावेरीला खूप अपमानास्पद वाटलं. आणि त्यादिवशी कावेरीने ठरवलं यानंतर आपल्या मनामध्ये काही शंका आली तर दुसऱ्या कुठल्या टीचरला विचारायचं नाही .
पण फारच राहवलं नाही गेलं तर फक्त पटेल मॅडमनाच विचारायचं.
कावेरीला खूप अपमानास्पद वाटलं. आणि त्यादिवशी कावेरीने ठरवलं यानंतर आपल्या मनामध्ये काही शंका आली तर दुसऱ्या कुठल्या टीचरला विचारायचं नाही .
पण फारच राहवलं नाही गेलं तर फक्त पटेल मॅडमनाच विचारायचं.
साधारण आठ दिवसांनंतर एक दिवस पटेल मॅडम स्टाफ रूम मधे सुट्टीच्या वेळी तिला फ्री दिसल्या. काहीतरी कामात होत्या व वह्या तपासत होत्या.
ती त्यांच्या जवळ अनुमती घेवून गेली पण त्यांच्या जवळ जाऊन घुटमळली.
"बोल कावेरी, काही अडचण की काही शंका?" त्या प्रसन्न हसल्या.
" आहे ना बाई, ते असं की मला एक प्रश्न होता , तो चूक असेल तर जाऊ द्या पण बरोबर असेल व तुम्हाला माहीत असेल तर मला सांगाल का?"
" अगं काय झालं ? इतकी प्रस्तावना? "
" काही विशेष नाही , विज्ञानाच्या मॅडमनी सांगितलं की माणसं चंद्रावर गेली मग माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणूस सूर्यावर का जात नाही ? म्हणजे कळेल ना की का बरं सूर्य इतका गरम आहे आणि काय जळतंय इतक्या वर्षांपासून असं ?"
"बरं सायन्टिस्ट मॅडम , या संदर्भात खूप संशोधन चालू आहे. बाहेरच्या देशात विशेषतः अमेरिका व रशियात बरेच प्रयोग होताहेत. पण आपल्याला सगळी माहिती कळत नाही ना ! पण तुला माहीत आहे ना , सूर्य हा आगीचा गोळा आहे, वर्षांनुवर्षे तो जळतो आहे व त्याच्या त्या उष्णतेवरच इतकी कामं होतात, ग्रहांना प्रकाश मिळतो. सूर्य स्वयंप्रकाशित आहे तर त्याचं तापमान किती कोटी डिग्रीमध्ये असेल ? विचार केलाय का? येणार्या काही काळामध्ये आणखीसुद्धा खूप माहिती लोकांना कळेल. काही वर्षांत सूर्या बदलची पूर्ण माहिती शास्त्रज्ञ शोधून काढतील. पण त्याच्या लांब लांबपर्यंत जरी आपण गेलो तर कुठलाच धातू वापरून. . . त्याच्या एका ठरावीक अंतराच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. हो की नाही . तर तो धातूसुद्धा वितळून जाईल. जेव्हा धातू वितळवून जातो तेव्हा माणूस तर भस्म होवून जाईल. !"
"अरे हो ना म्हणजे हे डोक्यातच नाही आलं माझ्या ?"
"आता होळी पौर्णिमा असते तर आपल्याला थोडं जवळ गेली की उष्णता जाणवते. शेकोटीजवळ ऊब मिळते पण जास्त जवळ बसलो तर? त्यामुळे लांबून म्हणजे दुरून अशी काही यंत्र काढली जातील ज्यामुळे सूर्याचा अभ्यास करता येईल. पण मला नाही वाटत की सूर्याच्या जवळपासही माणूस फिरकू शकेल. यासंबंधी मला अजून काहीही कळालं तर मी तुला नक्की सांगेन. सध्या तर मला इतकंच माहिती आहे."
पटेल मॅडमच्या या उत्तराने कावेरीचं मन प्रसन्न झालं, चेहरा खुल ला व सगळा ताण नाहिसा झाला.
" किती छान सांगितलं मॅडम नी सोपं करून. " तिने सिंधु, उर्मी व सुनिताला तेच सगळं सांगितलं.
मैत्रिणींना कावेरीचा अभिमान वाटला कारण जे डोक्यात आहे त्याची माहिती ती काढतेच असं!
" किती छान सांगितलं मॅडम नी सोपं करून. " तिने सिंधु, उर्मी व सुनिताला तेच सगळं सांगितलं.
मैत्रिणींना कावेरीचा अभिमान वाटला कारण जे डोक्यात आहे त्याची माहिती ती काढतेच असं!
कावेरीच्या वर्गात बरीच मुलं देखील होती पण त्या काळात मुलं मुली शक्यतो जास्त बोलायचे नाहीत. फार तर त्यांच्यामध्ये कधी कधी भांडणं व्हायची. वर्गामध्ये एका बाजूला मुलं एका बाजूला मुली अशी बसण्याची व्यवस्था असायचे त्यामुळे बसण्याच्या जागेवरून वगैरे किंवा बोर्डवर लिहिण्यासाठी वगैरे विरोधी पक्षाचा भाव जास्त असायचा.
जर कुणाला प्रश्नोत्तरं वगैरेची वही पण पाहिजे असेल तर मुलं मुलांनाच विचारायचे आणि मुली मुलींनाच विचारायच्या.
कुठल्या मुलाने जर मुलीला वही मागितली किंवा कुठल्या मुलीने मुलाला मागितली की लगेचच तोंडावर हात ठेवून , काहीतरी गडबड आहे असं विचार करायचे किंवा खुसफुस व्हायची.
कुठल्या मुलाने जर मुलीला वही मागितली किंवा कुठल्या मुलीने मुलाला मागितली की लगेचच तोंडावर हात ठेवून , काहीतरी गडबड आहे असं विचार करायचे किंवा खुसफुस व्हायची.
त्यामुळे तिची सातवीपर्यंत कुणा वर्गमित्राशी मैत्री झालीच नाही.
हो, अभ्यासामध्ये मात्र स्पर्धा होती त्यामुळे वर्गातल्या दोन- तीन मुलांची आणि दोन तीन मुलींची नेहमीच परीक्षेतल्या मार्कांसाठी खडाजंगी व्हायची .
हळूहळू मुला मुलींच्या वागण्या बोलण्यात फरक होऊ लागला.
मुलं वाढीस लागली तशी तशी त्यांच्या स्वभावात बदल व्हायला लागले.
नेमक्या दिवाळीच्या सुट्टयांनंतर भूमरे सरांची बदली झाल्याने वर्गशिक्षिका म्हणून पटेल मॅडम त्यांच्या वर्गात आल्या.
वर्गशिक्षिका पटेल मॅडम व त्या इंग्रजी आणि भूगोल शिकवणार होत्या.
कावेरीला खूप आनंद झाला.
असंही इंग्रजीच्या नावाने तिच्या मनात खूप भीती होती आणि पटेल पटेल मॅडमसारख्या बाई जर इंग्रजी शिकवतील तर त्यात काहीच शंका राहणार नाहीत असं तिला वाटलं.
असंही इंग्रजीच्या नावाने तिच्या मनात खूप भीती होती आणि पटेल पटेल मॅडमसारख्या बाई जर इंग्रजी शिकवतील तर त्यात काहीच शंका राहणार नाहीत असं तिला वाटलं.
क्रमशः
लेखिका - ©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक - १३. ११. २०२२
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा