गोंदण - (भाग १४)
कथा पुढे-
"हे किचन मणजी काय असतं ?"
"अगं स्वयंपाक घर आहे ना त्याला किचन म्हणतात ! गॅसवर करतेस का भाकरी की स्टोव्ह वर?"
" ते काय आनी! तसलं काही नाही आमच्याकडं. चूल हाय मस्त . . . घातलेली . तिच्यावरच करते ना भाकरी. शेगडी बी हाय कोळशाची."
" काय सांगतेस ? चुलीवर ? मग पोळायची भिती नाही वाटत तुला ? "
" भीती काय त्यात . सवय पडली"
सिंधूने डबा संपवला.
सिंधूने डबा संपवला.
उर्मीलाची पोळी भाजी खावून झाली पण कावेरीच्या डब्यातलं अन्न तसंच होतं.
ती इकडे नव्हतीच जणु!
घंटी वाजली तसं उर्मी नं तिला हलवलं .
"अगं हे खाणार होतीस ना तू लोणी ब्रेड? मी तुझ्यासाठी आणलं होतं? वेळ संपली कावू चल!"
\" सगळेच पृथ्वीवर राहतात तर वरचा इतका मोठा पडदा कसा चालेल ?\"
तिच्या मनामध्ये आकाश म्हणजे एक आच्छादन आहे व त्याच्या पलीकडे काहीतरी आहे अशी कल्पना होती.
आकाश एखादा पडदा आहे व त्यातूनच पाऊस पडतो असं वाटायचं . म्हणजे आपण पृथ्वीच्या आत राहतो व पृथ्वीचं बाहेरचं आवरण म्हणजे आकाश असं धरून चालली होती.
उर्मी ने हलवताच कावेरी म्हणाली ," पृथ्वी गोल फिरली तर आपल्याला का कळत नाही? आपली घरं का फिरत नाहीत . तिथेच त्याच जागी कशी
असतात?"
असतात?"
"मला काय ठावं ?" सिंधु पटकन म्हणाली.
"अरे देवा कावूऽ . . तू ते भुगोलाचंच घेवून बसलीस का गं, अजून ?" उर्मी म्हणाली.
"भूमरे सरांनाच विचार उद्या !" सिंधु म्हणाली.
"नाही. सगळे हसले आज मला वर्गात. मी कुणालाच नाही विचारणार. मीच शोधून काढणार !"
"म्हणजे तू वैज्ञानिकीन होनार ?" सिंधु पटकन म्हणाली व तिघीही जोरात हसल्या.
"हे काय असतं?" हळूच उर्मीने विचारलं.
"अगं आमच्या गावात नाय का, डाक्टरची बायको डाक्टारीण , वकिलाची बायको वकिलीण अन मास्तरची बायको मास्तरीण असं !" तोंडावर हात ठेवत सिंधू हसायला लागली.
"म्हणजे वैज्ञानिकाची बायको वैज्ञानिकीण का?" उर्मी म्हणाली व दोघी हसायला लागल्या.
"कावू मंग बया तुला तर वैज्ञानिकाशी लगीन कराव लागन!" सिंधू हसली.
कावेरी मात्र या विचारानेच कावरी बावरी झाली.
लग्न? म्हणजे वैज्ञानिक नवरा?
लग्न? म्हणजे वैज्ञानिक नवरा?
गोदाताई सारखं लग्न व गोपाळभावजीसारखा खरा नवरा ?
"इश्य!"
"आपण असं लग्न लग्न बोलायचं नसतं , लहान आहोत ना अजून . माझी आई तर रागावते." कावेरीने दोघींना हळूच सांगितलं.
"अगं . . गंमत केली कावू, तू काय लगेच वैज्ञानिक नवरा शोधणार की काय ?"
उर्मी असं म्हणाली अन शाळेची घंटा वाजली.
वर्गात जाण्याची घाई झाली. विषय संपला हिता तरीही कावेरीच्या मनात काहीतरी रुजलं होतं.
वर्गात जाण्याची घाई झाली. विषय संपला हिता तरीही कावेरीच्या मनात काहीतरी रुजलं होतं.
वैज्ञानिक शोध लावतात, त्याच्याशी लग्न झालं की ती पण वैज्ञानिकीण होणार मग तो सगळे शोध लावेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
गणिताच्या वर्गातही ती पाढे म्हणताना चुकली. त्या सरांना वाटलं हिची तब्येत वगैरे बरी नसावी म्हणून गोंधळलेली असेल कावेरी.
संध्याकाळी घरी आल्यावरही ती कुठल्यातरी विचारात होती. घराचे दार कुठल्या बाजूला आहे , समोर काय काय आहे ते पाहून घेतले.
सकाळी सूर्योदय झाल्यावर पुन्हा तिने एकदा पाहिलं की घराचं दार तिकडेच आहे की नाही घरासमोरची दुकानं किंवा घर काही जागा बदलतात का?
त्यात तिला काहीही बदल दिसला नाही.
मग तिला मनात वाटायला लागलं जे पण भूगोलाच्या पुस्तकात लिहिलंय ते सगळं खोटं आहे किंवा मग आपल्याला जे दिसतं तेच खरं आहे .
त्यात तिला काहीही बदल दिसला नाही.
मग तिला मनात वाटायला लागलं जे पण भूगोलाच्या पुस्तकात लिहिलंय ते सगळं खोटं आहे किंवा मग आपल्याला जे दिसतं तेच खरं आहे .
या विचाराने ती शांत झाली. पण तिला हे सगळं पाहताना तिच्या बाबांनी पाहिलं आणि विचारलं !कावेरी काय शोधत होतीस?"
" बाबा आपल्या घराचं दार रात्रीपण इकडेच होतं आणि सकाळी पाहिलं तर . . . . आणि सकाळी पण इकडेच आहे."
" हो मग. तुला काय वाटलं, मध्यरात्रीतून बदलणार होतं का? जादू बिदू केलीस की काय तू?"
" बाबा आपल्या घराचं दार रात्रीपण इकडेच होतं आणि सकाळी पाहिलं तर . . . . आणि सकाळी पण इकडेच आहे."
" हो मग. तुला काय वाटलं, मध्यरात्रीतून बदलणार होतं का? जादू बिदू केलीस की काय तू?"
" तसं नाही बाबा आमच्या भूगोलाचे सर म्हणाले की पृथ्वी . . . म्हणजे आपण राहतो ना तिच्यावर ,ती पृथ्वी फिरते. तर मग आपलं घरही फिरायला हवं ना!"
"अगं कावू, असं नसतं! काहीपण चालतं तुझ्या डोक्यात. बरं तू एक मोठा बॉल घेवून ये मग मी तुला दाखवतो. . कसं ते!" त्यांना कौतुकही वाटत होतं व हसू येत होतं.
" आता नको बाबा , संध्याकाळी बघुयात ते. शाळा आहे ना!"
बाबा म्हणाले ," ठीक आहे , सरांचं नाही कळालं तर संध्याकाळी दाखवतो. सांग तसं!"
तिला खूप छान वाटलं की बाबांनी तिच्या प्रश्नांना महत्व दिलं.
तिला खूप छान वाटलं की बाबांनी तिच्या प्रश्नांना महत्व दिलं.
"सांगते बाबा. टाटा! आता मला शाळेला जायचे आहे." ती शाळेला जाण्यासाठी तयार झाली.
ती आणि ऊर्मी मिळून शाळेत आल्या .
ती आणि ऊर्मी मिळून शाळेत आल्या .
चार तास झाल्यानंतर गणिताचा तास होता. कावेरीने नेमका लालच अभ्यास केला नव्हता.
सर काही बोलतील याचाच विचार करत होती इतक्यान एक नवीन बाई वर्गात आल्या.
सर काही बोलतील याचाच विचार करत होती इतक्यान एक नवीन बाई वर्गात आल्या.
बहुतेक गणिताचे कदम सर रजेवरती असावेत.
एक नवीन मॅडम आल्या याचा आनंद झाला सगळ्यांना कारण एकच मराठीच्या बाई होत्या शाळेत.
नवीन मॅडम त्यांच्या वर्गात आल्या , नाव सांगितलं की" मी शुभा पटेल , आता तुमची नावे सांगा ."
कावेरीला आणि उर्मीला त्यांची लांब वेणी व साडी खूप आवडली .
नवीन मॅडम त्यांच्या वर्गात आल्या , नाव सांगितलं की" मी शुभा पटेल , आता तुमची नावे सांगा ."
कावेरीला आणि उर्मीला त्यांची लांब वेणी व साडी खूप आवडली .
"मी नवीन आलेय इथे व मला काहीच विषय दिलेला नाही. तुमचा क्लास रिकामा आहे म्हणून मला पाठवलंय. बरं , कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा!" मॅडम हसत मुखाने म्हणाल्या.
" मग तुम्ही कुठल्या विषयाच्या शिक्षिका ?" वर्गातल्या हुशार नंदूने विचारलं.
" बरं . . असं काही नाही मी विज्ञान व भूगोल शिकवू शकते. शिवाय गणित व मराठी माझे आवडते विषय आहेत."
"म्हणजे सगळेच विषय येतात तुम्हाला! दोन्ही शिकवता म्हणजे. . . ?" उर्मी पटकन म्हणाली.
"म्हणजे काय?"
"आमच्या कावू ला खूप प्रश्न असतात म्हणजे जगावेगळे खूप प्रश्न पडतात. ती विचारू शकते तुम्हाला." उर्मीला म्हणाली.
"विचारा ना ?"
"तुम्ही पण वैज्ञानिकिण बाई का ? सगळीच उत्तर येतात तुमास्नी?" सिंधूने हळूच भीत भीत विचारलं.
" हे पहा, तुम्ही विचारा जर माहीत असतील उत्तरं तर सांगेन व माहीत नसेल तर. . . मी माहीत करून सांगेल."
"कसं माहित कराल? ते सांगता का?" कावेरी आता बोलली.
" काय नाव तुझं? कावेरी अच्छा! हे पहा , वाचन करावं लागतं. कधी कधी पुस्तकच आपल्याला सगळी माहिती देतात. माणसांकडे प्रश्नांची उत्तरं नाही सापडली की पुस्तकांमध्ये शोधायची."
" पण बाईऽ ती पुस्तकं कुठं शोधायची?" कावेरीच्या या प्रश्नाने नव्या पटेल मॅडम जोरात हसल्या.
" पुस्तकं ग्रंथालयात मिळतात किंवा तो विषय शिकणार्या व शिकवणार्या लोकांकडे असतात. मिळवायची व हवं असलेलं ज्ञान मिळवायचं. असं प्राप्त केलेलं ज्ञान किंवा माहिती सहजासहजी विसरली जात नाही. ती आपली बौद्धिक संपत्ती बनून राहते. "
नव्या मॅडम इतकं छान बोलत होत्या शिवाय त्यांची भीती तर वाटत नव्हती. सगळ्यांना या मॅडम खूप आवडल्या.
मग कावेरीने आपल्या मनातल्या शंका मॅडमला सांगितल्या.
क्लासमधली काही मुलं पुन्हा हसायला लागली, कावेरी एकदम नाराज झाली.
तिचा चेहरा पाहून मॅडम म्हणाल्या "अगं असं नाराज होऊन कसं? हे सगळे जे मोठे मोठे वैज्ञानिक झालेत ना या सगळ्यांना तर जगाने वेडं ठरवलं होतं. तुम्हाला माहित आहे का ज्या माणसाने सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की पृथ्वी गोल आहे त्याला तर शिक्षा दिली गेली त्यावेळी , कारण तोपर्यंत लोकांना वाटायचे की पृथ्वी सपाट आहे . जमीन जशी दिसते तशी एकसमान व सपाट. पण नंतर ते सिद्ध केलं गेलं मग लोकांनी विश्वास ठेवला. आता तंत्रज्ञान सुद्धा प्रगत झालं आहे त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. "
इतक्या सुंदर पद्धतीने सांगितल्यामुळे मुलांना या सगळ्यात खूप आवड निर्माण झाली.
कावेरीने जेव्हा पृथ्वीबद्दलचा प्रश्न विचारला तेव्हा मॅडम नी एक फुटबॉल मागवला व त्यावर एक काळा टिपका काढून कावेरीला व पूर्ण वर्गाला प्रात्यक्षिक दाखवलं. मनातली ती शंका तर गेली. त्याचं निरसन झालं.
पण पटेल मॅडम नी एक्स्ट्रा क्लासमधे त्यांचा विषय सोडून दुसराच विषय शिकवला म्हणून भूमरे सरांना मनातून राग आला होता.
पण कावेरीला शांत शांत वाटायला लागलं.
क्रमशः
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक - ०४.११.२२