जेंव्हा देव्हाऱ्यातला देव निघून जातो भाग -७

RAHASYA story marathi marathi thriller cinema thriller story suspense marathi story suspense marathi cinema ira blogging marathi marathi cinema marathi katha lockdown lockdown marathi

अक्का  विचारात.........

, देव्हार्याच्या आजू बाजूला विचार करत फिरत असतात. अचानक पलीकडून आवाज येतो , बघतो तर काय संपूर्ण "राजेपाटील" घराण्याच्या वाड्याला  आग  लागलीये.. घरातील सर्व जण इकडे तिकडे पळत होते.. 

अच्युत आणि पार्थ प्रचंड घाबरून जमिनीवर रडत होते.. शांभवी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. अक्का त्यांच्याकडे मदतीसाठी पळत होत्या.. पण अक्कांना मात्र त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा कोणताच पर्याय दिसत नव्हता. 

वरून घराचं कौलं अच्युत आणि पार्थ च्या अंगावर पडलं .. 

" पार्थ.... अच्युत ............" पार्थ ....

शांभवी : अक्का अक्का,, उठा .. काय झालं ?

अक्का घामाघूम होऊन झोपेतून उठतात आणि डोक्याला हात लावून बसतात. 

विचित्र स्वप्न पडलं  ग शाम्भवी.

अक्का शांभवी च्या चेहऱ्याकडे बघतात,, आणि महेश ICU मध्ये असल्यामुळे शाम्भवी चा चेहरा कोमेजून गेलेला असतो.

"अक्का, उठा  आपल्याला रामपूर ला निघायचं आहे आता.

घरातील सर्व जण  तयारी करून, दुपारचं जेवण सोबत घेऊन रामपूर ला जायला निघतात. अक्कांच्या लक्षात येतं की  देव्हार्याचा कळस जरी चोरीला गेलाय तरी देवाऱ्याजवळ कोणीतरी  असणं खूप गरजेचं होतं पण अक्का आणि शांभवी शिवाय कळस चोरी बद्दल कोणाला माहीत नव्हतं. आणि ह्या क्षणी ती गोष्ट संपूर्ण परिवाराला सांगणं म्हणजे संपूर्ण  परिवाराला मानसिक धक्का बसणार होता.

महेश ला मात्र ऍम्ब्युलन्स मधून रामपुरात पोहचवणार होते ,महेश सोबत सुरेश जायला तयार झाला.

आणि बाकीचे रमेश, सविता, अक्का, पार्थ, अच्युत ,शांभवी आणि अर्चना सर्व जण मोठ्या गाडीत जाणार होते.

अर्चना ४ चाकी गाडी चालवण्यात तरबेज होती. घरातली सगळ्यात लहान सून जरी असली तरी  तेवढीच समजुतदार  आणि जबाबदार होती. 

पण आदल्या दिवशी रात्री एक अजून घटना राजेपाटील घरात घडली होती. महेश ला बघून दवाखान्यातून आल्यावर अर्चना आपल्या खोलीमध्ये जातांना तिला देव्हाऱ्याजवळ कोणीतरी भटकताना दिसला होतं .पण अक्कांनी तिला खोलीमध्ये पाणी घेऊन बोलावल्यामुळे ती घाई घाईत अक्कांच्या खोलीत गेली. परत येतांना तिने देव्हाऱ्याजवळ बघितला तर तिथे मात्र कोणीच नव्हतं.पण देव्हाऱ्याच्या दिव्याचा प्रकाश कमी झालेला असल्याने तिने देव्हाऱ्यात जाऊन दिवा लावायचं  ठरवलं.

देवघराची खोली आकर्षक अशी कोरीव काम असल्याने त्यात लहान लहान भोकं असलेली  कलाकुसर केली होती.. त्यामुळे आत प्रकाश आहे  की नाही हे लगेच कळत असे. अर्चना देव्हाऱ्यात गेली आणि तिने दिवा लावला. दिव्यामुळे  संपूर्ण देवघरात प्रकाश पसरला आणि देव्हाऱ्यावर कळस नाही हे घरातल्या ३ऱ्या व्यक्ती ला समजलं होतं. पण महेश ची तब्येत नीट होत नाही तोपर्यंत कोणालाच काही सांगायचं नाही हे तिने ठरवलं  होतं. 

एवढी मोठी गोष्ट पोटात ठेवणं म्हणजे अगदी कठीण काम होतं पण अर्चनाला परिवाराच्या मानसिक परिस्थिती ची जाणीव असल्याने तिने कोणालाच काही न सांगायचं ठरवलं  आणि दुर्दैवाने म्हणा की  सुदैवाने तिने सुद्धा देव्हाऱ्यावर असलेली ती अक्षरे : 

अहिल्याबाई राजेपाटील  " - "  कळसापूर " - "उत्तर"- " विघ्नहर्ता " - " आत्मभैरव"

तिने त्याचा फोटो आपल्या मोबाइलला ,मध्ये घेतला. 

आता घरातल्या थोरल्या, धाकल्या सुनेला आणि अक्कांना  कळस चोरी बद्दल माहित होती. 

पण अर्चना ला ठाऊक नव्हतं की  अक्का आणि शांभवी ला माहित आहे आणी अक्का आणि शाम्भवीला सुद्धा खबर नव्हती की  अर्चना ला ठाऊक आहे.

रामपुरात जायला अर्चना ने गाडी चालवायला सुरवात केली. रमेश तिच्या बाजूच्या सीट वर तिला रस्ता  दाखवयला बसला.

गाडी सुरु होताच अक्कांनी देवांचं  नाव घेतलं ." आमचा प्रवास नीट  होऊ दे रे भगवंता "

गाडी हळू हळू कोल्हापूरच्या बाहेर आली, आजू बाजूला हिरवळ , डोंगर दिसत होते. अच्युत आणि पार्थ खिडकीतून बाहेरच दृश्य बघत होते पण बाकी घरातील सर्व जण मात्र महेश च्या चिंतेत व्यस्त होते.

अर्चना अगदी हळुवारपणे  ट्राफिक, डोगंरान मधून गाडी चालवत होती. रमेश मोबाइल मधला मॅप बघून तिला रस्त्यांची दिशा सांगत होता. 

" अर्चना , अगं पुढे २० KM वर ACCIDENT झाला आहे , त्या रस्त्याने गेलो तर वेळ लागेल आपल्याला पोहचायला "

"मग दुसरा कोणता रस्ता आहे का?

थांब मी बघतो,

" हा बघ एक कळसापूर मार्गे एक रस्ता आहे, पण तो जरा कच्चा  रस्ता दिसतोय"

"कळसापुर नाव ऐकताच अर्चना ने गाडीला जोरात ब्रेक लावला"

" शांभवी, अक्का एकेमकांकडे अगदी  आश्चर्याने  बघायला लागल्या"

अर्चना ??? काय झालं ?? ब्रेक का लावलास तू?

उम्म्म.... काही नाही... माझी गडबड झाली नेमका कोणता रस्ता  आहे ते. 

" बरं... सावकाश ... मग जाऊयात का कळसापुर   च्या रस्त्याने "?

" हो रमेश, " अक्का क्षणाचा उशीर न करता म्हणाल्या "

"ठीक आहे अक्का, मी गाडी त्या रस्त्याने वळवते.

दुसऱ्या शब्दाचा उलगडा आता अर्चना, अक्का आणि शांभवी ला झाला होता.

आता मात्र तिघी जणी कळसापुर कधी येईल याची वाट बघत होत्या.

🎭 Series Post

View all