गोड शंकरपाळी

गोड शंकरपाळी

साहित्य -

अर्धा किलो मैदा, एक वाटी साखर, एक वाटी मोहनासाठी तूप, दीड वाटी दूध, चवीपुरते मीठ.तळणासाठी तेल. 

कृती -

मैदा चाळणीतून चाळून घ्या. त्यात किंचित मीठ व एक वाटी तूप घालून चांगले फेटून घ्या. एक वाटी साखरेची पिठी करून त्यात मिक्स करून घ्या. दुधाने तो पिठीसाखर घातलेला मैदा भिजवून घ्या. दोन ते तीन तास व्यवस्थित झाकून ठेवा. नंतर चांगला मळून घ्या.व लाट्या करून पोळी सारख्या लाटून घ्या.आणि पाहिजे त्या आकाराची शंकरपाळी कापून घ्या.व तेलातून तळून घ्या.


२) तीळ वड्या/लाडू

साहित्य -

अर्धा किलो तीळ, दीड पाव गुळ

कृती -

प्रथम गुळ चांगला बारीक करून घ्या. आता गॅसवर कढई ठेवून तीळ व गूळ एकत्रच कढईत टाका. सारखे भाजत राहा. हळूहळू गुळ विरघळू लागेल व त्यासोबतच तिळही भाजले जातील. चांगले लालसर होत आले की लगेच गॅस बंद करा. थोडे थोडे करून हे मिश्रण पोळपाटावर लाटून घ्या. व लगेच वड्या पाडा. गॅस बंद करून कढई गॅसवरच राहू द्या. पाहिजे तेवढेच मिश्रण पोळपाटावर घ्या. जरा पातळच लाटा. म्हणजे या वड्या विकतच्या सारख्या कुरकुरीत होतात. ही कृती झटपट करावे लागते कारण हे भाजलेले तिळगुळाचे मिश्रण थंड झाल्यावर कडक होते. याच मिश्रणाचे तुम्ही छोटे छोटे तिळाचे लाडू तयार करू शकता.

येत्या दिवाळीला ही रेसिपी अवश्य करून बघा.

मस्त खा.

स्वस्थ रहा.

धन्यवाद