जेव्हा देव्हाऱ्यातला देव निघून जातो भाग 5

MARATHI RAHASYA MARATHI KATHA DEWHARA DEV AASTIK NASTIKअक्का आणि शांभवी च्या मनात आता फक्त देव्हाऱ्यावर लिहिलेली अक्षरेच घुटमळ करत असतात. नेमका काय अर्थ असेल त्या अक्षरांमागे? कोणीतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतय का?  आणि सगळ्यात मह्त्वाचं म्हणजे अक्काचं नाव ५० वर्षांपूर्वी असलेल्या देव्हाऱ्यावर कसं  काय आहे.!

शाम्भवी अक्षरांचा काढलेला फोटो सारखा बघत होती त्यातून काही उमगतंय का....

"राजेपाटील" कुटुंब दुपारच्या जेवणासाठी बसणार होतं . अच्युत ची तब्येत सुद्धा आता बऱ्यापैकी सुधारली होती, अर्चना, सविता आणि शांभवी तिघी जणी जेवणाची तयारी करत होत्या. अक्का जेवणाच्या खोलीत आलया. सर्व जण जेवायला बसणार तेवढ्यात .......  बाहेरून  आवाज आला.


" जय कालभैरव"  .... ...... .....  "जय कालीमाता " ...... ...

सगळ्यांच लक्ष गेट  च्या दिशेने गेलं. अक्कासोबत सर्व जण बाहेर दरवाजा जवळ आले.

समोर अतिशय विशेष  प्रकारचा वेष असलेला एक योगी पुरुष दिसला.  खाली रंगेबेरंगी कापडाच्या चिंध्या गुंडाळलेला धोतर. वर अंगावर संपूर्ण  शरीराला भस्म लावलेला.. गळ्यात वेग-वेगळ्या प्रकारच्या रुद्राक्षांच्या  माळा. हातात एक कमंडलू आणि शरीरावर भस्म लावल्या मुळे संपूर्ण शरीर अगदी उठून दिसत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारचा तेज होतं. चेहऱ्याचा रंग अगदी तेजपूर्ण आणि डोळे त्याहूनही तेजस्वी. प्रत्यक्ष नारायण अवतार घेऊन आलाय असा जाणवत होत.. त्यांच्या आवाजात सुद्धा एक विशेष प्रकारची धार होती.. जणू १२ वर्षांचं तप त्यांच्या आवाजातून ओसंडून वाहत होतं.

" " जय कालभैरव"  .... ...... .....  "जय कालीमाता " ...... ...  असं म्हणत ते योगी महाराज दरवाज्याजवळ आले.

त्यांनी अक्कांच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं , आणि अक्कांना एक वेगळ्याच प्रकारची विशेषता जाणवली. अक्कांना वाटलं की  व्यक्ती आणि आपण खूप वर्षांपासून ओळखत आहोत. काहीतरी अगदी जवळचं नातं आहे आपला आणि ह्यांचं..

" अहिल्याबाई..!  त्या योगी पुरुषाने अक्कांच नाव घेतलं. आणि पुढे बोलायला लागला.  
" अहिल्याबाई राजेपाटील" -  


" तुफान आ जाये कोई, गीर जाता होंसला है "
" तकलीफ होती है, कभी कभी खुदा नाराज हो जाता है"

" आगे और है  मुश्किले, और है आंधी"
"खुदा पे रखना तुम विश्वास, हर पल हा नया इम्तिहान"

पर एक बात जरूर तुम याद रखना, सवालोके जवाब तुम इतिहास मे ढुंढना "

" " जय कालभैरव"  .... ...... .....  "जय कालीमाता " ...

अक्कांना वाटलं भगवंताने पाठवलेला काही संकेत आहे.
"राजेपाटील " घरातलं  त्यान्ना कोणी  नमस्कार करायला जाणार, त्यांच्याशी बोलणार त्या आधी ते योगी पुरुष पुन्हा बाहेर जायला निघाले.
गेटपर्यंत पोहच्यल्यावर त्यांनी पुन्हा एकदा अक्कांकडे त्याच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाले " होंसला मत हारना "

आणि गेटच्या बाहेरून कधी गायब झाले कोणालाच समजला नाही. महेश ने त्याचा दुरूनच नमस्कार केला आणि म्हणाला " भगवंता , सुखी ठेव राजेपतील कुटुंबाला "

असं  म्हणत संपूर्ण कुटुंब जेवणासाठी गेलं,  आणि जेवण सुरु झालं.

अच्युत आता बरा झाला होता आणि पार्थ सुद्धा खुश होता. अच्युत आणि पार्थ दोघेही लहान असले तरी ते दोघे अगदी राम आणि लक्ष्मणासारखे होते. शांभवी काकू त्यांची फेव्हरेट काकू होती. आपल्या आई पेक्षा येते काकू सोबत च वेळ घालवायचे.. आणि शांभवी ला सुद्धा मूल नसल्यामुळे तिला हे दोघे पण अगदी आपल्या मुला  सारखे वाटायचे.
ते दोघेही अगदी गोड. अगदी गोरेपान, तब्येत सुद्धा अगदी धष्ट-पुष्ट  आणि खेळून आल्यावर त्याच्या गालवर गुलाबी रंगाची छाप असायची. भरपूर दूध पीत असल्याने त्यांची त्वचा सुद्धा लूस-लुशित. त्याचा लहापणीचा फोटो बघितला तर जणू २ ससे एकमेकांशी खेळात आहे असं वाटायचं..

" शाम्भवी काकू , जेवण झालयावर आम्हाला रामायणाची गोष्ट सांगणार ना तू ?" - पार्थ म्हणाला

" हो बेटा, पण तू पूर्ण जेवण संपवला तरच बरं "

" नाही काकू, रामायण नाही आज महाभारत ची स्टोरी .. प्लिस.."!! मला अर्जुन सारखं धनुष्य चालवायचं  आहे "

" नाही,, मला रामासारखा धनुष्य चालवायचा आहे"

" हो हो ... दोघं गोष्टी सांगेन मी, पण आधी जेवण संपवा बरं "

सर्व जण पोटभर जेवण करतात आणि " पार्थ, अच्युत आणि शाम्भवी त्यांना खोली मध्ये झोपायला घेऊन जाते"

"महेश वकील असल्यामुळे त्याला कोर्टात जावा लागणार होतं"
शाम्भवी महेश ला निरोप देऊन खोलीत जाते तर तिथे अक्का , पार्थ आणि अच्युत गप्पा मारत असतात.

"अक्का, ते योगी पुरुष तिन्ही तुम्हाला काही संकेत दिला असंच वाटलं मला "
कारण इतके वर्षांत कोणी योगी पुरुष आपल्या घरी आला नाही, आणि आज अचानक आणि त्यान्ना तुमचा नाव सुद्धा ठाऊक होतं .

हो शांभवी मी त्याच विचारात आहे. मला खूप प्रश्न त्यांना विचारायचे होते, पण माझ्या तोंडाला जणू कुलूप लागले होतं, मी बोलण्याचा प्रयत्न केला पण शब्दच आले नाही.. आणि सगळं समजायच्या  आत ते निघून गेले "


" पण अक्का, त्या देव्हाऱ्यात लिहिलेल्या अक्षरांचा आणि त्या योगी पुरुषाने सांगितलेल्या गोष्टींचा नक्कीच काहीतरी संबंध आहे.

" हो, शाम्भवी. " मला एक गोष्ट पक्की आठवते त्यांनी सांगितलेली

पर एक बात जरूर तुम याद रखना, सवालोके जवाब तुम इतिहास मे ढुंढना "

"इतिहास मे ढुंढना " - म्हणजे कदाचित त्या अक्षरांचा अर्थ आपल्याला इतिहासात मिळेल.

बरोबर अक्का.

" हो शाम्भवी तुझ अगदी बरोबर आहे, पण अहिल्याबाई राजेपाटील हा इतिहास नाही ना, हा भूतकाळ किंवा भविष्य काळ नाही "

त्यातील अक्षरांचा पहिलाच शब्द आपण सोडवू शकत नाही आहोत,  कसाकाय होणार भगवंता !

"अक्का, शांग ना ग रामायणाची गोष्ट" किती वेळ झाला तू सुरवात च नाही केली " - अच्युत  म्हणाला.

हो चला ...

एकेकाळी दशरथ राजाचा राज्य होतं. " दशरथ म्हणजे कोण सांगा बरं "???

" दशरथ म्हणजे रामाचे डॅड " - हो कि नाही अक्का - अच्युत  म्हणाला

"अगदी बरोबर "

"मग दशरथांच्या डॅड चा नाव काय होतं अक्का"?

" दशरथाच्या वडिलांचा नाव होतं , " अज"

"आणि त्यांच्या डॅड च ?" - पार्थ विचारतो

"रघु राजा "

परत पार्थ विचारतो आणि त्यांच्या डॅड चं ?

आणि पार्थ आणि अच्युत हसायला लागतात..


शांभवी  काकू मागून सगळं ऐकत असते

"तुम्हाला रामाची गोष्ट ऐकायची आहे की रामाच्या इतिहासाची"?

दोघ  जण पुन्हा हसायला लागतात.

अक्का शांभवी कडे आश्चर्याने बघतात,.
"अक्का, काय झालं, काही चुकीचं बोलले का "?

अग रामाचा इतिहास म्हणजे, " रामाचे वंशज"


"चल पटकन , आपल्याला अडगळीच्या खोलीत वंशावळ शोधायची आहे.

"दोघींनाही जणू पहिल्या अक्षराचा उलगडा होणार होता "

दोघी जणी पळत पळत अडगळीच्या खोलीत गेल्या,.....क्रमश
 


 

🎭 Series Post

View all