जेव्हा देव्हाऱ्यातला देव निघून जातो भाग 4

marathi katha marathi story marathi blog marathi rahasya katha

पुढच्या दिवशी :

सकाळचे जवळपास ६:३० वाजले होते,  अक्का आपल्या साखर झोपेतून उठून हातांचं दर्शन घेत श्लोक म्हणत होत्या सूर्याची किरणे खोलीत पडल्यामुळे खोली संपूर्ण उजळून गेली होती. श्लोक संपल्यावर अक्कांना पुन्हा देव्हाऱ्या आणि कळसाची चिंता वाटायला लागली.
आज शांभवी ला जाब विचारणार हे नक्की होतं.

तेवढ्यात अक्कांच्या च्या खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरात ठोठावत होतं. अक्कांना वाटलं एवढ्या सकाळी कोण असेल?

तेवढ्यात बाहेरून आवाज आला,

"अक्का, येऊ का आत ? मी शांभवी.. मला तुम्हाला खूप मह्त्वाची गोष्ट सांगायची आहे. "

अक्का विचारातच पडल्या.

" ये ग शांभवी, काय झालं  सकाळी सकाळी "?

शांभवी अगदी पटकन खोलीत येते, दरवाजाची कडी लावते.

शांभवी घाम-घूम झालेली असते आणि प्रचंड घाबरलेल्या आवाजात अक्कांना म्हणते :

" अक्का ........ अक्का ."

"काय झालं  शांभवी,  एवढी घाबरलेली का "?

"अक्का ........  देव्हारा "!!

" काय झालं  देव्हाऱ्याला "

" अक्का, देव्हार्याचा कळस जागेवर नाहीये "

अक्कांना कळून चुकलं की शांभवीचा कळस चोरण्या मागे काही हेतू नाहीये

" ये बस शांभवी, तुला एक गोष्ट सांगते, पण आधी शांत हो बरं "

शांभवी अक्कांच्या बेड वर येउन बसते.

" मला माहितिये की  कळस देव्हाऱ्यात नाहीये, कोणीतरी चोरला आहे "
परवापासून तो देव्हाऱ्यात नाहीये. काल मी सगळ्यांना सांगायचं ठरवलं, पण अच्युत पडल्या  मुळे मी कोणाला सांगितलं नाही "

" अक्का, आता काय करायचा आपण? कळस कसंकाय शोधायचा ? चोर कसा पकडायचा?"

" हो शांभवी,  कळस शोधणं खूप महत्वाचं आहे, कारण कळसाची जबाबदारी " राजेपाटील" घराण्यावर होती आणि ही गोष्ट " राजेपाटील" घराण्याला शोभा देणारी नाही.


अक्का विचार करत होत्या की आता कळस परत कसा मिळवायचा. अक्का विचार करत करत देव्हाऱ्या जवळ गेल्या, समोर त्यांना गणपतीची मूर्ती दिसली,

" गणराया, तूच वाचव रे आम्हाला या संकटातून""

 असा म्हणत म्हणत अक्का देव्हाऱ्याच्या जवळ गेल्या. ज्या ठिकाणी कळस होता तिथे बघून अक्कांना  रडू आवरला नाही

" संपूर्ण राजेपाटील घराण्याची ५० वर्षां पासून ची परंपरा , माझ्या चुकीमुळे पाण्यात जाणार, गणराया " काय उत्तर देऊ मी माझ्या कुटुंबाला.

अक्कांना "रावसाहेबांची" आठवण झाली,
" रावसाहेब " म्हणजे अक्कांचे पती, रावसाहेबांनी  अक्कांना नेहमी बरोबरीची वागणूक दिली होती.  अक्का आणि रावसाहेब प्रत्येक रविवारी देव्हाऱ्याची साफ-सफाई सोबत  करत असत आणि गणपती च्या दिवसांमध्ये देवघर सजवण्या पर्यंत तर गौरी पूजा संपेर्यत रावसाहेब अक्कांची मदत करायचे," आणि गौरी पूजेच्या नंतर जेव्हा अक्का थकून खोलीत जायच्या तेव्हा रावसाहेब अक्काचे पाय सुद्धा दाबून देत असत. "



 अक्कांना  रावसाहेबांची खूप आठवण येत होती..

देवघर बघून अक्कांच्या  आठवणी जाग्या झाल्या होत्या.
अक्का एकटक देव्हार्याकडे बघून रडत होत्या आणि देवघरात फिरत होत्या...
फिरता  फिरता हक्कांचा लक्ष देव्हाऱ्याच्या वरच्या बाजूला गेलं, तिथे कळस आणि देव्हाऱ्याच्या वरचा भाग जोडला जातो तिथे...

रडून अक्कांचे डोळे पाणावले होते म्हणून अक्कांना  नीट दिसला नाही, अक्कांनी डोळे पुसले. देव्हारा सोन्याचा जरी असला तरी त्यावर थोडी धूळ साचलेली होती,  
अक्कांनी आपल्या साडीच्या पदराने ती जागा पुसली.. आणि त्याना पुसट  अक्षरात काहीतरी लिहिल्या सारखं दिसलं... अक्कांनी  बघण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा काही दिसत नव्हतं. वयानुसार अक्कांची नजर सुद्धा कमकुवत झाली होती.

आणि शांभवी सोडून घरात कोणालाही कळस चोरी बद्दल माहित नव्हती.. अंक्कांनी शांभवी ला बोलावलं
" शांभवी, इकडे ये ग बेटा"

" हो अक्का आलेच"

शांभवी देवघरात पोहचते,

" शांभवी, ह्या कळसाच्या खाली काहीतरी लिहिलेला दिसतंय, पण मला काही नीट नाहीये, बघ बरं तुला दिसतय का "?

शांभवी कळस ज्या ठिकाणी होता, तिथे जाते.

" अक्का  ह्यावर धूळ साचली आहे  आणि थोडे डाग सुध्दा आहेत"

थोडा अमोनिया टाकला तर दिसेल नीट.

शांभवी पळत जाऊन अमोनिया आणि स्पॉंज घेऊन येते.

पुसत असतांना तिला हळू हळू अक्षरे दिसायला लागतात.  ती अजून गतीने पुसायला लागते..

आणि शेवटी अक्षरे नीट दिसायला लागतात.
अक्का आणि शांभवी ती अक्षरे वाचायचा  प्रयत्न करतात.
ती अक्षरे खालील प्रमाणे असतात.


" अहिल्याबाई राजेपाटील  " - "  कळसापूर " - "उत्तर"- " विघ्नहर्ता " - " आत्मभैरव"


अक्का अक्षरे वाचून आश्चर्यचकित होतात.  स्वतःच नाव वाचून त्यांना काही कळेनासा होतं. ह्या देव्हार्याची परंपरा ५० वर्ष पूर्वी ची आहे. माझा नाव ह्यावर असणं कसा शक्य आहे "

शांभवी सुद्धा हे वाचून आश्चर्यचकित होते..   पण सगळ्यात महत्वाचा धक्का म्हणजे अक्कांचा नाव देव्हाऱ्यावर कसा शक्य आहे.

तेवढ्यात अर्चनाचा आवाज येतो, " अक्का... शांभवी..... चला नाश्ता करायला "

शांभवी ही अक्षरे लक्षात ठेव. आपण ह्यामागे काय रहस्य आहे हे शोधण्याचा प्रयत्न  करू"

" हो अक्का , " शांभवी त्या अक्षरांचा फोटो काढते "

" पण अक्का, ह्या मागे नक्कीच काहीतरी संकेत आहे, कदाचित चोराने ही अक्षरे दिसावीत म्हणून कळस चोरला असेल.  
अक्का ही  अक्षरे आणि त्यामागचं  कारण शोधणं खूप महत्वाचं  आहे.
" राजेपाटील " घराण्याला आपली परंपरा पुढे चालू ठेवायची असेल तर हा हा संकेत आपल्या साठी खूप महत्वाचा ठरेल."

पण कळस चोरीला गेलाय हे आपल्या दोघीं शिवाय कोणालाही कळता कामा  नये"

दोघीजणी देवाचा नमस्कार करून नाश्ता करायला जातात... पण मनात मात्र ती अक्षरे आणि त्या मागचा नेमका काय संकेत असेल ह्याचाच विचार चालू असतो.




क्रमश

🎭 Series Post

View all