अक्कासोबत सर्व जण दवाखान्यात पोहोचले,
महेश, शाम्भवी आणि अच्युतचे आई बाबा चिंताग्रस्त चेहऱ्याने डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघत होते. अक्कानी काचेच्या खिडकीतून अच्युतला बघितलं आणि त्यांना रडू आवरेना झालं. पण आपणच कोसळलो तर बाकीच्यांना धीर कोण देणार? असं म्हणत अक्का अच्युतच्या आई वडिलांकडे गेल्या
आणि पाठीवर हात ठेऊन म्हणाल्या " भगवंतची कृपा आहे आपल्यावर, अच्युतला काहीच होणार नाही"
तेवढयात डॉक्टर बाहेर येतात, सगळयांचे चिंताग्रस्त चेहरे बघून म्हणतात..
" काळजी करण्याचं काही कारण नाही, अच्युत थोडा वेळात शुद्धीवर येईल.
डोक्याला थोडी जखम झाली आहे, एक आठवडा काळजी घ्यावी लागेल"
हे ऐकून सगळ्यांना दिलासा मिळाला पण शुद्धीवर येईपर्यंत कोणालाच शांतता मिळणार नव्हती.
दवाखान्यात असलेल्या गणपतीच्या मूर्ती ला बघून अक्का नमस्कार करतात, आणि त्यांना अचानक घरी असलेला देव्हारा आणि चोरी गेलेला कळस याची आठवण होते.
आणि पुन्हा त्यांच्या मनात प्रश्नाचं काहूर माजतं..
" कदाचित चोर घरात असेल तर त्याने मुद्दामून अच्युतला वरच्या मजल्यावर ढकललं असेल जेणेकरून मी सगळ्यांना कळस चोरी बद्दल सांगू शकणार नाही "
पण घरातला कोणी व्यक्ती हे असं करेल हे अशक्य होतं.. राजेपाटील घराण्यातलं कोणी असं काम असेल ह्यावर अक्काचा अजिबात विश्वास बसत नव्हता,
पण बघितलं तर फक्त घरातल्या लोकांनाच मी पूजेसाठी बोलवलं होतं, बाकी कोणाला मी काय सांगणार याची कल्पना नव्हतीच.
असे अनेक विचित्र विचार अक्काच्या मनात यायला लागले. अक्कांना ह्या घटनेनंतर कुटुंबाचीही अजूनच चिंता वाटायला लागली. सगळं सुखी चालणारं कुटुंब, कोणाची तरी नजर लागली असणार नक्की.
अक्कांना आता अचानक देव्हाऱ्याची आठवण झाली, आणि घरी कोणी नसतांना आधीच कळस चोरीला गेलाय आता अक्कांना आपल्या कुटुंबाला सगळं सांगून अजून संकटात बघायचं नव्हतं..
आता संपूर्ण देव्हाराच चोरीला गेला तर कसा होणार..
तेवढयात डॉक्टर पुन्हा बाहेर येतात आणि सांगतात
" अच्युत शुद्धीवर आला!!!"
सगळ्यांना खूप आनंद होतो आणि अक्का पुन्हा गणपतीला नमस्कार करतात.
" महेश , मला घरी सोडतो का रे बाळा"? अक्का महेशला बोलवून सांगतात.."
"हो अक्का, बराच उशीर झाला आहे , तुम्ही व्हा पुढे."
"मी आणि सविता बिल करून अच्युतला सोबत घेऊन येतो घरी."
अक्का, महेश, शांभवी आणि पार्थ गाडीत बसतात आणि गाडी सुरु होते.
निरागसपणे पार्थ अक्का च्या मांडीवर जाऊन आपल्या बोबड्या भाषेत म्हणतो
" अक्का, अच्युत दादाला काय झालं?"
अच्युत दादा निष्काळजीपणे उड्या मारतो, खेळतो ना म्हणून तो पडला, पण डॉक्टर काकांनी त्याला लगेच बरं केलं,
तूपण वरच्या मजल्यावर एकटं जायचं नाही हं बाळा "
" पण आम्ही तर पूजा करत होतो, काल शांभवी काकू ने आम्हाला छान तयार करून दिली होती की नाही !
मग अचुत दादा वर कसा काय गेला?"
अक्का च्या मनात एकदम धस्स झालं, आणि काल झालेल्या सगळ्या गोष्टी अक्काला समोर दिसु लागल्या.
सकाळी शांभवी मोठी कापडी पिशवी घेऊन जाताना दिसली होती.
पूजा करण्या वेळी पण ती उशिरा आली होती..
आणि पूजा करण्या आधी पर्यंत अच्युत आणि पार्थ तिच्या कडे होते.
अक्कांना अजून च भीती वाटायला लागली. कारण शांभवी म्हणजे घरातली मोठी सून.
ती समजूतदार, जबाबदार आणि अगदी प्रेमळ असं संपूर्ण चौकशी करूनच अक्कांनी महेश आणि शांभवीच्या लग्नाला संमती दिली होती. आणि शांभवी सुद्धा आगळी मिळून-मिसळून राहणार. दोघी ही सुनेशी तिचा खूप जमायचं.. तिने अगदी मोठ्या बहिणीसारखं नवीन आलेल्या सुनांना जवळ केलं होतं.
आणि पार्थ आणि अच्युत ची पण ती फेव्हरेट काकू होती. मग फक्त मूल होत नाही, म्हणून ती च्या थरापर्यंत पोहोचेल असा वाटलं नव्हतं.
गाडी घरापर्यंत पोहोचली, अक्का आणि पार्थ उतरले आणि अक्का पहिले देव्हाऱ्याजवळ गेल्या.
कळस सोडला तर देव्हारा तसाच होता. पण कळस गेल्या पासून घरात विचित्र वातावरण होतं.
कळस असलेला देव्हारा अगदी ओशाळलेल्या बागे सारखा दिसत होता. जणू देवाचं अस्तित्व तिथून निघून गेलंय.
तेवढ्यात शांभवी मागून आली, तिने अक्काना विचारलं..
" अक्का, काय विचारात आहेत ? सगळं ठीक आहे ना ?
अक्का काही न बोलता तिथून निघून गेल्या..
आक्कांनी आता ठरवलं उद्या सकाळी शांभवीला जाब विचारायचा.
देव्हारा आणि कुटुंब ह्याचा विचार करत करत अक्का झोपी गेल्या.......
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा