जेव्हा देव्हाऱ्यातला देव निघून जातो भाग 2

God

अक्का ह्याच विचारात होत्या की  कळसचोरी करणारा कोणी घरातला व्यक्ती आहे, कारण काल रात्री मी देव दर्शन घेऊन माझ्या खोलीत गेले तेंव्हा कळस त्याच जागी होता आणि त्याआधी घराचे सर्व दरवाजे  बंद झाले होते मग घरातलाच कोणीतरी व्यक्ती असणार ह्याची शंका अक्काना होती पण दुसरीकडे आपल्या घराण्यातला कोणी अशी चूक करेल हे सुद्धा त्यांचा मन ऐकत नव्हतं.आणि घरातल्या व्यक्ती ने जरी चोरी केली असेल तरी कळस अजून सुद्धा घरात च असणार कारण रविवार आहे आणि सकाळी नाश्ता करण्याच्या आधी कोणी घराबाहेर जात नाही.
फक्त अक्कांचा मोठा मुलगा महेश  सकाळी स्विमिन्ग प्रॅक्टिस ला जात असे.

अक्काना चोर तर पकडायचा होता पण घरातल्या कोणत्याही व्यक्ती वर आरोप लावणे हे अक्काना चुकीचे वाटत होते आणि आरोप लावल्यावर ती व्यक्ती चोर नसेल तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात कायमचा अक्का विषयी, संपूर्ण कुटुंबा विषयी अविश्वास निर्माण झाला असता आणि त्याचे परिणाम संपूर्ण "राजेपाटील" घराण्याच्या येण्याऱ्या पिढीला भोगावे लागणार होते. राजेपाटील घराण्याला आणि वारसाला धक्का लागेल असं कोणतंही पाऊल अक्कांना उचलायचं नव्हतं.

अक्का विचार करत करत आपल्या अंगणातील झाडांना पाणी देत होत्या, घरातील  सुना आणि नोकर स्वयंपाकघरात नाष्ट्याची तयारी करत होते. तेवढ्यात अक्काचं लक्ष थोरल्या सुने कडे गेलं  "शांभवी" कडे, शाम्भवी म्हणजे महेश ची बायको, शाम्भवी अगदी पटापट पावले टाकत घराकडे येत होती. आणि तिच्या हातात एक मोठी कापडी पिशवी होती. आक्कांनी तिचा पाठलाच केला आणि विचारलं

"काय ग शांभवी? सकाली सकाळी कसली खरेदी चाललीये"?"

शांभवीने मागे बघितलं आणि ती दचकली,

"काही नाही, अक्का आज दूधवाल्याकडे जरा जास्त दुध मागितलं होतं, तेच घेऊन चाललेय घरात"

"ठीक आहे" सगळयांना नाष्टा करायला बोलावं बरं

"हो अक्का"

असं म्हणत शाम्भवी स्वयंपाक घरात गेली, हळू हळू सगळेजण जेवणाच्या खोलीत आले. "राजेपाटील" घराण्याची जेवणाची खोली म्हणजे एखाद्या राजाच्या दरबाराला सुद्धा लाजवेल. ती इतकी भव्य होती की ३० जण आरामात जेवण करू शकत होते.. मध्ये एक चौरस लाकडी आणि सुरेख कोरलेला पाट. पाणी ठेवण्यासाठी सोय. बसण्यासाठी आरामदायक खुर्ची. सगळे जण नाश्ता करायला बसले, मस्त गरम गरम पोहे सुरेश च्या बायकोने बनवले होते.

" अर्चना , पोहे छान झालेत हं आज"- पुढच्या रविवारी सुरेश बनवणार पोहे- " - महेश म्हणाला

" म्हणजे सोमवारी सगळे आजारी : - सुरेश म्हणाला

सगळे जण हसायला लागले , पण अक्काच्या चेहऱ्यावर मात्र चिंता च दिसत होती. महेश ने ती ओळखली

"अक्का , काय झाला ? सगळं ठीक आहे ना ?

सगळ्यांची नजर अक्का कडे गेली, अक्का मात्र ह्याच विचारात होत्या कि चोरी बद्दल सांगायचं की नाही.

" अक्का "??

अक्का ला राहवलं नाही गेलं, " मला आज एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे "

सगळे जण आश्र्चर्याने अक्का कडे बघतात, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं प्रश्न चिन्ह उभं राहतं.

" आज संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे,  आपण सगळे आता संध्याकाळी ७ वाजता भेटू"

असा म्हणत आक्कांनी ताटाचा नमस्कार केला आणि तिथून निघून गेल्या.

सर्व मंडळी मात्र आता चिंतेत दिसायला लागली आणि एकमेकांकडे बघायला लागली.

संध्याकाळचे ७ वाजले, अक्का मात्र देव्हाऱ्या जवळच उभ्या होत्या,

सगळे जण अक्काच्या बोलण्याची वाट बघत  होते, कारण काही कठोर कारण असल्याशिवाय अक्का असा बोलावणार नाही हे सगल्यांना ठाऊक होतं. अक्कानी  सर्व कुटुंबाकडे बघितलं तर शांभवी उपस्थित नव्हती, अक्का ने महेश ला विचारला,

" शांभवी कुठे आहे "?

"हो अक्का , ती येतच असेल- सगळ्या छोटया राजेपाटील यांना पूजेसाठी तयार करत आहे ती

तेवढ्यात रमेश आणि सुरेशची मुले "पार्थ" आणि " अच्युत" नाचत नाचत अक्का कडे आले.

काल प्रमाणे अक्का देव्हाऱ्याचा समोर उभ्या राहिल्या, सारी मंडळी मागे गेली. आणि आरती ला सुरवात झाली.. सगळेजण आरती मध्ये गुंग झाले..

अक्काने पूजेचं ताट सगळ्या कुटुंबाकडे वळवलं आणि बोलायला लागल्या..

"आज मी सगळ्यांना ह्या साठी बोलावलं की , " राजेपाटील " घराण्याची एक मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे

आक्कांनी बोलायला सुरवात केली -

" काल पूजेनंतर .......

अक्का पूर्ण बोलायचं आत , " घराच्या वरच्या मजल्या वरून काहीतरी जोरात पडल्या चा आवाज आला "
आवाज इतका मोठा होता कि काहीतरी मोठी वस्तू पडली असा आवाज आला;


 सर्व जण आवाजाच्या दिशेने धावू लागले आणि समोर बघता तर काय.. " अच्युत " वरच्या मजल्या वरून पडला होता.. अच्युत ची आई सविता त्याला मांडीवर घेऊन बोलायला लागली

" अच्युत, उठ बाळा, उठ "

महेश पटकन पाणी घेऊन आला ,  पाणी शिंपडलं तरी शुद्ध अच्युत बेशुद्धच

सर्व जण आटोकाट प्रयत्न करत होते अच्युतला उठवायचा पण तो मात्र बेशुद्धच..

शांभवी ने पटकन ऍम्ब्युलन्स ला कॉल केला, २० मिनिटात ऍम्ब्युलन्स घरी आली.
अचूयत सोबत त्याचे आई वडील म्हणजे  रमेश आणि सविता  आणि सोबत शांभवी, महेश निघाले..

"डॉक्टर काय म्हणतात सांगा लवकर, आम्ही येतोच मागून"

आता घरी फक्त अक्का सुरेश, अर्चना आणि पार्थ असतात.

" अक्का मी गाडी काढतो, चला तुम्ही"

अक्का गाडी मध्ये बसतात हॉस्पिटल चा दिशेने जात असतांना , अक्कांच्या मनात प्रचंड विचारांचा काहूर माजलेला असतो.

घरात वाईट घटना कळसाच्या जाण्याने तर झाली नसेल ना ?
कि चोराने मुद्दामुन सगळयांना समजू नये म्ह्णून हे केला असेल?

असा विचार करत गाडी हॉस्पिटल पर्यंत पोहचते........

पुढील भागात उर्वरित...

🎭 Series Post

View all