( पूर्वभाग - देव्हाऱ्याच्या कळसाची चोरी - अक्का आणि शांभवी ला अक्षरे सापडली होती -त्या गुप्त अक्षरांचा अर्थ शोधण्यासाठी त्या दोघींचे प्रयत्न चालू होते - पण घरातल्या तिसऱ्या व्यक्ती ला चोरीचा पत्ता लागला होता - पहिला शब्द सापडल्यानंतर , घरात अजून एक वाईट घटना घडली होती - "राजेपाटील " कुटुंब आता महेश च्या ट्रीटमेंट साठी कळसापुर जाणार होते - कळसापूर मध्ये त्यांना देव्हाऱ्यावरील अक्षरांचा उलगडा होईल का?)
हळू हळू कळसापूर जवळ येत होतं...
अर्चना , अक्का आणि शांभवी यांची उत्सुकता वाढत चालली होती. महेश च्या ट्रीटमेंट चे विचार मात्र डोक्यात चालू च होते.
गाडी जस-जशी कळसापुर जवळ जात होती तशीच अक्का,शांभवी आणि अर्चना यांची धक-धक वाढत होती.
संध्याकाळ व्हायला थोडाच उशीर होता. सूर्य मावळायच्या आधीची सूर्याची लाल पिवळी किरणे पसरली होती..
रस्ता तसा कच्चा होता , धुळीची फवारे मागे सोडत , दगडांवर चाकं उधळत त्यांची गाडी कळसापुर जवळ धाव घेत होती.
शेवटी कळसापुर १ km असा दगड त्यांना दिसला आणि त्यांची कळसापुर मध्ये प्रवेश केला. अर्चना गूगलर मॅप वरचा रास्ता बघून गाडी चालवत होती आणि तिचा लक्ष आजूबाजूला पण होतं.
कळसापुर मध्ये प्रवेश करताच अक्कांना आधी तिथे येऊन गेल्याची जाणीव झाली. तिथला वारा अक्कांना ओळखीचा आणि अगदी जवळचा वाटत होता. तिथली माती अगदी आपलाच एक भाग आहे याची जाणीव अक्का जस-जस कळसापूर मध्ये जात होत्या तशी होत होती. आजूबाजूची हिरवी झाडं , कौलारू घरं आणि घरांच्या बाहेर असणाऱ्या त्या गाई, म्हशी .
हळू हळू सूर्याचा प्रकाश कमी होत होता आणि आजूबाजूला दिसणारी दृशे फिकट होऊ लागली.. गाई म्हशी यांचा शेणाच्या वासाने अक्कांना आपल्या लहानपणाची आठवण झाली. अक्कांना कधीच इतका आपलेपणा कोल्हापुरात वाटलं नव्हता तेवढा आपलेपणा ह्या मातीत वाटत होता.
रस्त्यावरून जाताना दूरवर मंदिरात गणपतीची आरती चालू होती.. गावाला प्रदूषण, उंच इमारती नसल्यामुळे दूरवरचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू होते . आरती सोबत घंटेचा तालावर नाद सुद्धा ऐकू येत होता . आवाजाच्या दिशेने अक्कांनी पाहिलं ......मंदिर दगडाचं जरी असलं तरी मावळत्या सूर्याची किरणे पश्चिमेला पडल्यामुळे मंदिराची काली पिवळी छटा उठून दिसत होती. कळस मात्र संपूर्ण पिवळसर छटेने नटला होता.
अक्कांना जगाचा संपूर्णपणे जणू विसर च पडला होता .
मंदिराचा आक्कांनी दुरूनच नमस्कार केला आणि गाडी पुढे निघाली.. अक्का मात्र त्या मातीचा...... मावळणाऱ्या सूर्याचा आणि आजूबाजूला असलेल्या वातावरणात गुंग झाल्या होत्या..
५ मिनिटानंतर अक्कांना पुन्हा आरती चा आवाज आला,. अक्कांनी बघितलं तर तेच दृश्य.. तोच आवाज..तोच कळस आणि तोच रस्ता.
"अर्चना, रस्ता चुकलो का ग आपण"?
"अक्का , मॅप वर तर हाच रास्ता दाखवलाय "
"हो अक्का, आम्ही मॅप बघूनच चालवतोय गाडी"
"बर ठीक आहे.. मला भास झा असेल मग "
पुंन्हा ५ मिनिटांनी तेच दृश्य अक्कांना दिसत होतं. आता मात्र अक्कांची शंका दूर झाली. आणि त्यांना समजला की आपण त्यात रस्त्यावरून जात आहोत.
"अर्चना , अगं रस्ता तर पुन्हा तोच आला "
" हो ना शांभवी, मी तर मॅप बघून जातेय तरी सुद्धा रास्ता का चुकतोय'
" एक काम कर, गाडी थांबाव आणि गावातल्या कोणालातरी विचार"
अर्चना ने रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली, सूर्य आता संपून मावळला होता गावात वीज नसली तरी घरातल्या दिव्यांनी मंद प्रकाश पसरला होता. सर्व जण विश्रांती म्हणून गाडीतून उतरले.
अच्युत आणि पार्थ ला गावातलं ते दृश्य बघून नाचायला लागले. शांभवी महेश च्या विचारात मग्न होती. अर्चना आणि अक्का मात्र देव्हार्याची चोरी - आणि त्यावर लिहिलेली गुप्त अक्षरे आणि त्या मागचा अर्थ ह्याचाच विचार करत होती.
"अहिल्याबाई राजेपाटील " म्हणजे ५० वर्षांपूर्वी "राजेपाटील " घराण्याची सून, आणि पुढचा शब्द होता "कळसापूर" ह्या २ शब्दांचा अर्थ अक्कांना समजला होता पण त्यामागचं कारण आणि त्याचा आणि देव्हाऱ्याच्या चोरीचा काय संबंध आहे हेच त्यांना समजत नव्हतं .
पुढचा शब्द होता "उत्तर"
" कदाचित, कळसापुर मध्ये आपल्याला ह्याचं उत्तर सापडेल " ह्याचा अर्थ असा असू शकतो का?
" गावाच्या नावातच कळस आहे , आणि उत्तर" म्हणजे हो.. देव्हार्याच्या कळसाची चोरी "
अक्कांना समजला होतं कि त्यांच्या प्रश्नाचा उत्तर त्यांना कुठे मिळणार होतं. पण नेमकं उत्तर काय आहे ??
अक्का विचार करत गावातल दृश्य बघत होत्या. अर्चना गाडीचं एंजिन बघत होती.. अच्युत आणि पार्थ काका सोबत गावातली गाई म्हशी बघत होते.
अक्का चालत चालत... एका उंच पिंपळाच्या झाडाजवळ येऊन उभ्या राहिल्या ..
पलिकडे कोणीतरी एक व्यक्ती बसली आहे आक्कांनी बघितलं . झाडाला प्रदक्षिणा घालून अक्का त्या व्यक्तीच्या जवळ गेल्या..
ती व्यक्ती पाठमोरी बसल्यामुळे अक्कांना चेहरा नीट दिसत नव्हता.. पण ती व्यक्ती हिरवे रंगाचे कपडे घातलेली. भल्या मोठ्या जटा आणि हातात रुद्राक्षांच्या माळा ..
"भाऊ. रामपूर कडे जाण्याचा रस्ता कोणता आहे"? अक्क्कांनी विचारला
" ती व्यक्ती तरीसुद्धा पाठमोरी च होती"
" कळसापुरात आलेला व्यक्ती कधी गावाबाहेर जातच नाही अक्का "
" अक्कांना आवाज खूप ओळखीचा वाटला.
"अक्का... अक्का... अच्युत आणि पार्थ पळत पळत अक्कांकडे आले आणि त्यांचा हाथ पकडून गाडीजवळ घेऊन जात होते.
अक्कांना त्या व्यक्तीचा आवाज विचित्र वाटला .. आक्कांनी मागे वळून बघितलं तर ती व्यक्ती तिथे नव्हती..
अक्का गाडी जवळ पोहोचल्या..
"अक्का, चला आता विचारला आहे रस्ता .. आता आपण १ तासात रामपुरात पोहोचू"
सर्व जण पुन्हा गाडीत बसले. अर्चना ने सीट बेल्ट लावला आणि गाडी सुरु केली..
गाडी सुरु करताच मोठा आवाज आला आणि गाडी बंद पडली. अर्चना ने पुन्हा चावी फिरवून गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी मात्र काही चालू होईना.
" २-३ वेळा प्रयत्न केल्यावर अर्चना गाडीतून उतरली आणि इंजिन तपासायला गाडीच्या पुढे गेली "
पुन्हा सर्व जण गाडीतून उतरले. संध्याकाळचे जवळपास ७ वाजले होते. नाजूक वाऱ्याची संथ लहर गावातून जात होती.
अक्का गावातल्या मातीचा , वाऱ्याचा आणि गावातल्या प्रत्येक लहान वस्तूचा आढावा घेत होत्या. पुन्हा दूरच्या मंदिरात आरती सुरु झाली आणि घंटेचा नाद गावभर ऐकू जात होता.
अक्का हळू हळू मंदिराच्या दिशेने जाउ लागल्या. जस-जसा अक्का जवळ जात होत्या घंटेचा नाद स्पष्टपणे ऐकू येत होता. रस्त्यावरचे दिवे बंद असले तरी घरातल्या दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर उजळत होता. सर्व जण आरती अगदी सुरात आणि कोरस मध्ये म्हणत होते.
चालत चालत अक्का मंदिराच्या जवळ पोहोचल्या. कळस जवळून बघितल्यावर त्यांना घरातल्या देव्हार्याची आठवण झाली.. देव्हार्याचा कळस अगदी असाच होता. अक्का मंदिराच्या आत जाऊ लागल्या.. आरती संपल्यामुळे सर्व जण मूर्ती च दर्शन घेऊन घरी जायला निघाले होते.
अक्कांनी मंदिरात प्रवेश केला. सासरी गेलेली सून ज्याप्रमाणे घरी आल्यावर आनंदित होते त्याचप्रमाणे अक्कांना आपल्या घरी आल्याची अनुभूती होत होती.. मंदिरातली वर्दळ आता बरीच कमीझाली होती.
मंदिर भव्य नसले तरी भगवंताच्या उपस्थितीची जाणीव त्या भिंतीमधून होत होती. भजन करण्यासाठी मोठा व्हरांडा आणि आत गणपतीची मूर्ती.. मूर्ती पर्यंत जाण्यासाठी एक लहान दगडी दरवाजा . दरवाजाच्या वर
" विघ्नहर्ता गणेश मंदिर" कोरलेलं अक्कांना दिसलं .....
अक्कांना आता खात्री झाली होती कि आपल्याला उत्तर आता ह्याच ठिकाणी मिळणार. अक्का आत दर्शन घ्यायला गेल्या.. समोर गणपतीची मूर्ती बघून डोळे बंद केले
" हे विघ्नहर्ता, आज 'राजेपाटील " घराण्यावर जे विघ्न आल आहे.. ते दूर कर. राजेपत्तील घराण्यावर कसल्या संकटाची सावली पडली आहे ती दूर कर. आपल्या कुटुंबाला असं संकटात आणि दुखी बघावलं जात नाही विघ्नहर्ता .. वाचवं रे आम्हाला...
अक्कांनी असं म्ह्णून डोळे उघडले, पुन्हा गणपतीचं दर्शन घेतल आणि बाहेर निघाल्या.
क्कांनी आपली पाठ फिरवली आणि मूर्तीच्या मागून काहीतरी पडल्या चा आवाज आला. आक्कांनी मागे बघितलं तर उंदीर होता. आणि उंदराच्या जवळ एक लाकडी फळी अक्कांना दिसली.. अक्का मूर्ती च्या मागच्या बाजूला जाऊन .. लाकडाची फळी बाजूला करण्यासाठी गेल्या.. तिथे एक छोटी फट आणि पलीकडून एक मंद प्रकाश अंकांना दिसला..
लाकडी फळी अक्कांनी बाजूला केली.. तिथे अजून रुंद आणि लहान भुयारी मार्ग अक्कांना दिसला..आक्कांनी त्या भुयारात प्रवेश केला.. भुयारात अगदी काळोख असला तरी दुरून मंद प्रकाशाचा एक किरण दिसत होता. अक्का प्रकाशाच्या दिशेने चालत होत्या... शेवटी तत्यांची प्रतीक्षा संपली आणि प्रकाश म्हणजे एक मोठा दगडी दिवा जळत होता.. पण दिव्यापर्यंत पोहाचायला सरळ मार्ग नव्हता.. रस्ता संपला तिथे २ वाटा होत्या..
अक्का रस्त्याच्या शेवटपर्यंत गेल्या आणि त्यांना दोन रस्ते दिसत होते.. एक उजवीकडे आणि एक डावीकडे.."संपूर्ण " राजेपाटील " घराण्याचा भविष्य अक्कांच्या एका निर्णयावर अवलंबून होतं.
अक्का विचारात पडल्या.. एल चुकीच पाऊल आणि भविष्यचा अंत.
अक्का रस्त्याच्या मधोमध उभ्या राहिल्या आणि देवस्मरण केलं. डोळे उघडताच दिव्याचा प्रकाश लक्ख झाला होता आणि समोर एक दिशादर्शक दिसलं त्यात चार दिशा आणि समोर बाण.
परंतु अक्कांना ह्यावेळी ठामपणे माहित होतं .. देव्हाऱ्यावरच्या शबदांमधला एक शब्द होता "उत्तर"
आणि अक्कांना आता उत्तर मिळालं होतं. अक्का उत्तर दिशेच्या मार्गाने निघाल्या.......
क्रमश