जेंव्हा देव्हाऱ्यातला देव निघून जातो भाग - ६

rahasya katha marathi marathi stoty aesthist marathi marathi katha marathi rahasya dev devhara jenva dev dewharyatun nighun jato rahasya katha marathi cinema marathi movie marathi cinema thriller

अक्का आणि शांभवी पळत पळत अडगळीच्या खोलीत पोहोचतात. तिथे  मोठ्या मोठ्या लाकडाच्या पेट्या  धुळीने अगदी खच्च भरलेल्या त्यात कोळी किड्याची कलाकुसर सगळ्या खोलीत उतरलेली असते. 

अक्का आपला पदर नाकावर ठेऊन "राजेपाटील घराण्याची वंशावळ शोधण्याच्या मागे लागतात. एक एक पेटी  उघडून त्यात काय आहे अक्का आणि शांभवी बघत होत्या. ४-५ पेटी खोलून झाल्यावर शाम्भवी म्हणते 

" अक्का, इकडे मिळेल ना वंशावळ "?

"भगवंताची इच्छा असेल तर सापडेल".

दोघी जणी पुन्हा ऐकन- एक पेटी उघडून अगदी डोळ्यात तेल घालून बघत असतात, 

आता मात्र शेवटची पेटी बाकी असते, दोघींच्या प्रतिक्षेचा आता अंत होणार असतो.

"भगवंता,  का परीक्षा घेतोयस रे "?

शांभवी अक्का कडे बघून पेटी  उघडते, अक्का  पेटी कडे बघतात.. पण पेटीत फक्त जुने कपडे च दिसतात..

अक्कांच्या चेहऱ्यावर नाराजीची लाट अगदी स्पष्टपणे दिसत होती. अक्का डोक्याला हात लावून बसून होत्या..शांभवी ने सुद्धा आता आशा सोडून दिलेली.

"घरात अजून एखादी वाईट घटना घडण्याच्या आधी त्या गुप्त शब्दांचा अर्थ शोधणे खु[प गरजेचं आहे अक्का"

अक्का उदास झालेल्या चेहऱ्याने उठतात, शांभवी  सुद्धा त्यांच्यामागे जाते, दरवाजापर्यंत पोहोचतात आणि पुन्हा एकदा खोलीत काही तपासायचं  राहीलं तर नाही ना .

 खोलीतून निघतांना त्यांचं लक्ष एका पेन्टिंग कडे जातं. 

"अक्का, ते पेन्टिंग कसला आहे हो "?

चल बघुयात ,

अक्का आणि शांभवी दोघी जणी त्या पेंटिंग समोर जाऊन उभ्या राहतात. 

"अक्का, काहीतरी चुकीचं आहे ना पैंटिंग मध्ये"

"हो,

 अक्कांना समजलं होतं "

अंकांना धक्का बसतो आणि अक्का खाली बसतात. अक्का घामाघूम होऊन एकटक पैंटिंग कडेच बघतात.

"अक्का, काय झालं "?

" शांभवी, मला असा भास झाला कि मीच मला ह्याच पेंटिंग मधून बघतेय, जणू हे पेंटिंग म्हणजे आरसा आहे " 

" मला हि घटना आधी घडून गेलीये असा भास झाला "

"शांभवी, पैंटिंग च्या मागच्या बाजूला काय आहे बघ जरा"

शाम्भवी पैंटिंग काढायला खुर्चीवर चढते..

'अक्का , खूप जड आहे हो"

अक्का पेंटिंग चा मागे बघतात तर तर त्यांना एक भला- मोठा कागद सापडतो. 

त्यावर वंशावळ सापडते . अक्का खूप खुश होतात,,

आणि रावसाहेब (म्हणजे अक्कांचे पती) ह्याचा पासून आधीच्या पिढीची नाव बघतात,..

वंशावळचा कागद अगदी  झिजलेला, त्यावर धूळ सुद्धा साचली होती.. अक्का आपल्या कमकुवत नजरेने नाव शोधण्याचा प्रयत्न करत होत्या..

"अहिल्याबाई राजेपाटील "- चिंतामणराव राजेपाटील ह्याच्या सौभाग्यवती.

"अक्कांना पहिल्या शब्दाचा उलगडा झाला होता. 

ते वर्ष होतं १९६८. म्हणजे जवळपास १९६८ मध्ये अहिल्याबाई राजेपाटील घराण्यांत सून म्हणून आल्या होत्या..

दोघींना पहिल्या शब्दाचा उलगडा मात्र झाला पण, नेमका ह्याचा आणि देव्हार्याचा काय संबन्ध हा प्रश्न त्यांना  सतावत होता .

तेवढयात शांभवी चा फोन वाजतो, 

" काय? कुठे ? कसाकाय"? आम्ही लगेच पोहोचतो ?

शांभवी खूप घाबरलेली दिसते.

" काय झालं शांभवी ?

अक्का ...... अक्का... म्हणत ती रडायला लागते.

शांभवी काय झालं सांगतेस का?

अक्का.. महेश ला ACCIDENT  झाला , तो ICU मध्ये आहे.

हे ऐकून अक्काना  देव्हार्याची आठवण होते.

शांभवी पळत पळत घरातल्या सगळ्यांना सांगायला जाते.. 

अक्का मात्र पेंटिंग कडे हतबल होऊन बघत असतात. अजून घरात वाईट घटना,घडण्या आधी वाचव रे भगवंता..

सर्व जण महेश ला बघायला दवाखान्यात जातात. अक्का मात्र त्या पैंटिंग च्याच विचारात असतात.

अक्का मात्र आपल्याच विचारात - १९६८ म्हणजे बरोबर ५० वर्षांपूर्वी. 

आणि देव्हाऱ्याचं पुनःस्थापन झालं ते सुद्धा १९६८ मध्ये.

म्हणजे ह्या अहिल्याबाई आणि देव्हारा :-  काहीतरी संबंध असणार. 

सर्व जण दवाखान्यात पोहोचल्यावर शांभवी महेशला बघूनच रडायला लागते. आणि अक्कांना गळ्यात पडते.. अक्का आपला आवंढा गिळत तिचा सांत्वन करत असतात..

थोड्यावेळ्या सुरेश डॉक्टरांना भेटून बाहेर येतो, 

" अक्का, डॉक्टर म्हणताय इथे ट्रीटमेंट करणं  जास्त दिवस शक्य नाही"

डॉक्टर म्हणाले महेश च्या मेंदूला थोडी जखम झाली आहे. ती बरी व्हायला  वेळ लागेल. पण जर 

इथून २०० किलोमीटर वर " रामपूर नावाच गाव आहे.. 

तिथे एक ट्रीटमेंट मिळेल. ती घेतली तर महेश लवकर बरं होण्याचे चान्स आहे"

शांभवीला मात्र आपलं रडू आवरत नव्हतं.

अक्का शाम्भवी च्या डोळ्यात डोळे घालून बघतात आणि म्हणतात " शांभवी, देव आपल्या सोबत आहे"

तो आपल्या महेश ला काहीच होऊ देणार नाही..

रमेश आणि सुरेश "रामपूर" ला जायची तयारी करत असतात...

दुसऱ्या शब्दाचा अर्थ कदाचित आपल्याला रामपुरात च मिळेल कि काय- ह्या विचारने अक्का झोपून जातात.

🎭 Series Post

View all