देवी आणि माता..

Why We Ingnored This..

सगळीकडेच नवरात्रौत्सवाची धामधूम चालू होती. देवीमातेला फळे, नारळ, तेल तसेच ओटी, विविध अलंकार अर्पण केले जात होते. भजन, कीर्तन, प्रवचन देवीमातेच्या भक्तीत सारेच अगदी तल्लीन झाले होते अन् देवळाच्या आवारातच देवीमातेच्या दर्शनासाठी तर लांबच-लांब रंगा लागले होत्या, कोणी कोणी वशिलेबाजी करत पैसे देऊनही देवीच्या दर्शनासाठी प्रयत्न करत होते. पण या सगळ्या धामधुमीत ती माता मात्र आपल्या अंगावरील टिचभर कपड्यांनी आपले अंग झाकत झाकत काखेत भुकेने विव्हळणाऱ्या आपल्या तान्ह्या लेकराच्या दुधासाठी मंदिर बाहेरील रांगेतील लोकांना पोटतिडकीने मदतीची याचना करत फिरत होती..

#vishuzpoetry
- विशाल पाटील "Vishu.." कोल्हापूर