Feb 23, 2024
माहितीपूर्ण

जागतिक तापमान वाढ

Read Later
जागतिक तापमान वाढ

         आधुनिकीकरण व औद्योगीकरण यांचा वेग वाढत असून , विश्वातील पर्यावरणात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे . त्यात मानव जंगलाची बेसुमार तोड करीत आहे,  त्यामुळे ज्या काही पर्यावरणविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यात ग्लोबल वॉर्मिंग ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे.

        ग्लोबल वॉर्मिंग चा अर्थ जगाच्या सरासरी तापमानात वाढ होणे होय. परंतु ग्लोबल वॉर्मिंग हा संकुचित अर्थ येथे अभिप्रेत नसून पृथ्वी भोवताली असलेल्या वातावरणातील उष्णतेत वाढ होणे हा होय.

                ग्लोबल वॉर्मिंग समस्येचे स्वरूप समजण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आयपीसीसी च्या अहवालावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत जरुरीचे आहे.

                    संयुक्त राष्ट्राच्या आयपीसीसी म्हणजेच (इंटर गव्हर्मेंट पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज) या संस्थेच्या अध्यक्षांनी दोन फेब्रुवारी 2007 रोजी पॅरिसमध्ये त्या संस्थेचा चौथा अहवाल सादर केला यावेळी 130 देशातील 2500 शास्त्रज्ञ उपस्थित होते. वातावरणातील विनाशकारी बदलाकडे सर्व जगाचे लक्ष वेधण्यासाठी 1 आणि 2 फेब्रुवारी 2007 रोजी पॅरिस शहरातील संपूर्ण विद्युतपुरवठा मध्यरात्री पाच मिनिटांसाठी बंद करण्यात आला होता.

       अ.   ग्लोबल वॉर्मिंग ची कारणे

  १. हरितगृह परिणाम (ग्रीन हाऊस इफेक्ट )

              पृथ्वीचे तापमान ज्यामुळे उष्ण बनते त्याला ग्रींहाऊस इफेक्ट किंवा \"हरितगृह परिणाम\" असे म्हणतात. सूर्यापासून आलेले अतिनील किरण वातावरणात तसेच पृथ्वीकडून शोषून घेतले जातात. ही शोषून घेतलेली ऊर्जा परत वातावरणात अवरक्त तरंगांच्या स्वरूपात फेकली जाते .  पृथ्वीचे वातावरण यातील काही तरंगांचे शोषण करते,  त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. ज्या वायू कडून हे किरण शोषले जातात त्या वायूस \"हरितगृह वायू\" असे म्हणतात या वायु नऱ्हे १). कार्बन-डाय-ऑक्‍साईड

२.) नायट्रस ऑक्साईड

३).मिथेन व

४). क्लोरो फ्लोरो कार्बन यांचा समावेश होतो.

        ब. ओझोन थराचा क्षय

       वातावरणाचे प्रामुख्याने चार थर आढळून येतात

१.) तपांबर

२.) स्थितांबर

३.) दलांबर

४.) बाह्यावरण

               सर्वसाधारणतः स्थितांबर या थरात ओझोन (. O3)  वायू आढळून येतो हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरण शोषून घेतो त्यामुळे हे किरण पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत हे किरण अतिशय घातक असल्यामुळे व ते ओझोन वायू ने शोषणामुळे या थराला संरक्षक कवच असे म्हणतात.

               पण हल्लीच्या काळात क्लोरो फ्लोरो कार्बन,  कार्बन टेट्राक्लोराइड,  व नायट्रोजन युक्त खतांचा वापर वाढल्यामुळे ओझोन थराचा ऱ्हास होऊन तापमान वाढत चालले आहे.

         ३.) कार्बन डाय ऑक्‍साईडचे वाढते प्रमाण

             आयपीसीसी च्या 2007 च्या अहवालानुसार एकूण जागतिक तापमान वाढी मध्ये कार्बन डाय ऑक्साइड चा वाटा (72 टक्के) आहे हा वायू मानवी व्यवहारातून निर्माण होतो.  कार्बन डाय-ऑक्साइड वायू निर्माण झाल्यावर पृथ्वीच्या वातावरणात ५०० वर्ष टिकतो . कार्बन-डाय ऑक्‍साईडच्या वातावरणातील वाढीचे विविध कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील,

१.. औष्णिक वीज निर्मिती केंद्र

२... स्वयंचलित वाहनातील इंधन

३... कारखाने

४... इतर कारणे

      ग्लोबल वॉर्मिंग चे परिणाम

         ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हिमशिखरे , बर्फ पाऊस , पर्जन्य व सागरी पर्यावरणावर पडतो.

१.) ग्लोबल वॉर्मिंगचा संपूर्ण पर्यावरणावर अनिष्ट परिणाम पडतो . कुठे दुष्काळ तर कुठे महापूर येण्याची वारंवारिता वाढल्याने भविष्यकाळात हिमाच्छादित शिखरे आणि बर्फाचे आवरण कमी होण्याची शक्यता आहे.

२.) 1993 ते 2003 या काळात ग्रीन लंड व अंटार्टिका येथील बर्फ वितळल्याने सागरी जलाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

३.) समुद्र सपाटी ची उंची दरवर्षी  ३.१ मीली मीटरने वाढत आहे.

४.) उत्तर अटलांटिक महासागरात 1970 पासून हरिकेन व कॅटरिना वादळाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे.

५.) भूमध्य सागराच्या जलाशयात क्षाराचे प्रमाण वाढलेले आहे.

६.) कमाल आणि किमान तापमानातील तफावत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

   भारताच्या दृष्टीकोनातून ग्लोबल वार्मिंग चे परिणाम

१.) भारतातील पर्जन्यमान सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगमुळे बदलत आहे. पूर्व आशियात दुष्काळ व महापूरची वारंवारिता वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

२.) महापुर व दुष्काळ यामुळे पर्जन्यमान बदलामुळे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात उपासमारी व कुपोषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

३.) अंदमान आणि निकोबार त्याचप्रमाणे लक्षद्वीप सारख्या बेटांना सागरिये जलपातळी वाढल्याने सतत अस्तित्वाचा धोका संभवत आहे.

४.) हवामानाच्या पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे वनस्पती , प्राणी यांच्यावर परिणाम होईल आणि पीक आकृतिबंधात ही बदल होईल.

५.) ओझोन वायूच्या ऱ्हास झाल्याने मानवी आरोग्य धोक्यात येऊन, मानवाला मोतीबिंदू , डोळ्यांचे विकार,  कर्करोग , लवकर  वार्धक्य,  केस गळती हायपर टेन्शन , दम्याचे विकार याप्रमाणे विविध रोग, विकार येतील.

६.) अतिनील किरणे समुद्रात खोलवर गेल्यामुळे सूक्ष्म जिवाणूंची वाढ कमी होईल, प्लवंगांचा नाश होईल, परिणामत: मत्स्य उत्पादनावर अनिष्ट परिणाम घडून येईल व जल साखळी ही भंग होण्याचा संभव आहे.

              उपाय योजना

१.) मंत्रालयात कार्यरत असलेले पर्यावरण नियोजन व संरक्षण विभागाचा विस्तार करून,  पर्यावरण विषयक कायदे संमत करणे.

२.) शिक्षणाच्या माध्यमातून सर्व लोकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करणे.

३.) वृक्षारोपण व वनसंवर्धन कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढविणे.

४.) वृक्षारोपण व इतर पर्यावरण संवर्धक कार्यक्रमात वैयक्तिक सहभागाला प्रोत्साहन देणे.


 संदर्भ, 

१.    पर्यावरण शिक्षा के मूलतत्व , साहित्य प्रकाशन,  आग्रा, 1998 लेखक -आर. एक.   चौरसिया

२.  स्पर्धा परीक्षा स्टडी सर्कल द्वारा प्रकाशित एप्रिल 2007 मध्ये डॉक्टर आनंद पाटील यांचे मासिक.

३. द हितवाद (ट्विंकल स्टार) इन्स्पायरिंग ह्युमॅनिटी टू प्रोटेक्ट अर्थ. (  २२.९.२००७)

(मंडळी तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा आणि आपले मत आणि अभिप्राय नक्की नोंदवा तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत........)


 (सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//