जागतिक तापमान वाढ भाग 2

Reasons Behind Ozone Depletion

        ओझोनची संरचना बदलणारे घटक म्हणजेच क्लोरो फ्ल्युओरो कार्बन 1930 ते 1970 या कालावधीत पृथ्वीवर फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालं. खूप मोठ्या प्रमाणात हवेत सी. एफ. सी. सोडले जाऊ लागले 1978 मध्ये शास्त्रज्ञांनी सी.एफ.सी. ,कार्बन टेट्राक्लोराइड अशा प्रदूषकांवर बंदी घातली.

        साधारणतः 1985 मध्ये अंटार्टिकावर पहिलं ओझोनचं भगदाड सापडलं . ही अतिशय धक्कादायक बाब होती . म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघटनेने मॉन्ट्रियल करार करून ओझोन विषयी मोठ्या प्रमाणात प्रसार,  प्रचार आणि जागृती करण्याचं काम हाती घेतलं.

       पृथ्वीवरील हवेच्या प्रदूषणामुळे ओझोन ची जी हानी झालेली आहे, ती 2050 सालापर्यंत भरून काढणे सुद्धा अत्यंत अवघड बाब आहे असं शास्त्रज्ञ सांगतात. त्याच वेळी हवेतील प्रदूषक जी अजून ओझोन पर्यंत पोहोचलेली नाहीत ,त्यांचा ओझोनच्या कवच्या वर काय परिणाम होईल हे शास्त्रज्ञांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.

     सी.एफ.सी. मुळे होणारे ओझोनचं डिप्लीशन ही इतकी गंभीर पर्यावरणीय समस्या आहे की , एक सीएफसी चा रेणु 1 लाख ओझोन च्या रेणू वर प्रक्रिया करून त्यांना नष्ट करतो , म्हणूनच सी. एफ. सी. कार्बन टेट्राक्लोराइड, काही हायड्रोकार्बन्स यांच्या मुळे होणारे प्रदूषण रोखणे अत्यंत गरजेचे आहे.

          प्रदूषकांमुळे ओझोनच्या कवचाची जाडी कमी झाल्याने विविध स्तरावर त्याचे परिणाम दिसतात. सूर्याच्या  अतिनील किरणांमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते , त्वचेच्या कर्करोगाची संभावना वाढते ,डोळ्यांचे विकार ही झपाट्याने वाढतात, पाच वर्षाखालील व साठी ओलांडलेल्या अशा वयोगटातील व्यक्तींना या सूर्यकिरणांचा खूपच त्रास होतो. त्यामुळे पेशींमध्ये उत्परिवर्तन होऊन काही अगम्य आजार - विकार होण्याची शक्यता बळावते व अशा प्रकारच्या अनेक समस्या सध्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जगासमोर येऊ लागल्या आहेत.

             ओझोन ची जाडी कमी झाल्याने नकळतपणे जागतिक तापमान वृद्धीतही हातभार लागतो. सूर्याची अतिनील किरणं प्राण्यांवरही विपरीत परिणाम करतात. त्यांची ही रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन मृत्यू दर वाढतो, पिकांची उत्पादकता कमी होते, जलचरांवर गंभीर समस्या उढावतात, पृथ्वीवर जीवसृष्टी नांदण्यासाठी ओझोन रुपी पृथ्वीच संनस्क्रीम हवच आहे.

          एवढं करता येईल का?

  ओझोनचे गुन्हेगार म्हणजे क्लोरो फ्लोरो कार्बन, कार्बन टेट्राक्लोराइड ,आणि काही विशिष्ट हायड्रोकार्बन्स व हॅलॉन्स.

         अस्थम्या चे स्प्रे, परफ्युम्स ,रूम फ्रेशनर्स ,यांच्यात प्रोपलंट सी . एफ. सी .ज  वापरले जातात, त्यामुळेच अपेक्षित असणारा फ्लो मिळत असतो.

    ए. सी. फ्रीजमध्येही कुलिंग एजंट म्हणून सी. एफ. सी. ज वापरतात. म्हणूनच जिथे जिथे सी. एफ. सी.ज वापरतात ती उत्पादनं टाळलेली बरी.

१. परफ्युम्स ऐवजी साधी अत्तरं, फुलझाडे लावून प्रत्यक्ष फुलं आपण वापरू शकतो.

२. रूम मध्ये रूम फ्रेशनर्स टाळणं, आणि त्याऐवजी सुगंधी फुलझाडं ठेवणं उत्तम!

३. ए.सी.,  फ्रिज विकत घेताना ओझोन फ्रेंडली असं लेबल असलेली उत्पादनं विकत घेणे श्रेयस्कर.

४. दम्याच्या औषधांमध्ये स्प्रे ऐवजी काही कंपन्यांनी ड्राय पावडर फॉर्ममध्ये तितकच प्रभावी औषध बाजारात आणला आहे आपण तेही वापरू शकतो.

५. इतरही अनेक उत्पादनांवर सी .एफ.सी. फ्री, ओझोन फ्रेंडली असं लेबल आढळतं, सी .एफ.सी मुळे होणाऱ्या हानी पेक्षा  ओझोन फ्रेंडली उत्पादनांमुळे होणारी हानी कित्येक पट कमी असते . पण तरीही ही उत्पादन इको फ्रेंडली नाहीतच . पण मोठ्या राक्षसा पेक्षा छोटा राक्षस बरा!

 ६. सौंदर्यप्रसाधनं ओझोनची जाडी कमी करण्यात 15% हातभार लावतात. सौंदर्यप्रसाधन आरोग्याच्या दृष्टीने हे फारशी चांगली नसतात . ती आपण वापरणं बंद केलं तर ?किंवा त्यांना नवीन पर्याय शोधले तर? सुंदर दिसणं महत्त्वाचं की सशक्त जगणं महत्त्वाचं? हे आता आपणच ठरवायचं आहे.

७. चेहऱ्याला उगाच भरमसाठ क्रीम लावण्यापेक्षा आपण स सकस आणि स्वस्थ आहार घेणं महत्त्वाचं.

     चेहऱ्याला वेगवेगळे क्रिम्स लावण्या ऐवजी फळ खाऊन झाल्यावर त्याच्या साली चेहऱ्याला  चोळता येतील.

          हिवाळ्याचा दिवसांमध्ये उटणे, तिळाचं तेल, बदामाचं तेल, यांचा सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर करता येईल.

         याशिवाय इतरही अनेक उपाय करता येतील.





फोटो- साभार गुगल


(सदर लिखाण हे मोबाईल मधून न केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)

   





(वाचक मंडळी तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा . तुमची मतं आणि अभिप्राय नक्की नोंदवा ,तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत..........)

         

🎭 Series Post

View all