Jan 28, 2022
नारीवादी

गीता नावाचे गारुड

Read Later
गीता नावाचे गारुड

गीता नावाचे गारुड

  कोकणात फेरफटका मारण्यासाठी सहज गेलो होतो.म्हटले कोकणातील हिरवळीचा आनंद तरी मनसोक्त  घ्यावा.अंबोलीपासून  ते सिंधूदुर्गपर्यंत निसर्गदत्त सौंदर्य पाहून मन अचंबित झाले . घाटातून प्रवास सुरु झाला.पहाटेचे धुके सर्वत्र अच्छादलेले होते त्याचे घरंगळणारे थेंब टपटप पडत होते.झाडांची दाटी वेड लावित होती. कौलारु घरे पाहुणचारासाठी आतुरलेली होती.घरासमोरील अंगण सडासारवनाने सजलेले होते.पारिजातकाचा सडा रेखाटलेल्या रांगोळीवर  टपकत होता.तुलशीवृंदावन  नित्यपुजेने तजलेदार झाले होते.माडाची झाडे उंच गगनभरारी घेत होती.कांही झाडे डोकावून पहात होती.सुपारीचे लगडलेले छोटे घस नारळीच्या बागेत उठावदार दिसत होते. फणस ,  आंबा यांच्या बागा लक्ष वेधत होत्या. दालचिनी , मिरी ही मसालेदार झाडे व वेल  कोकणची नवलाई दाखवत होते.ज्या पावसाने कोकणचे सौंदर्यात भर पडते व सारी सृष्टी हिरवीगार होते ते धबधबे कोसळून शांत झाले होते. कोकणाचे हे विलोभनिय अरस्पानी रुप लिहताना मनाला आलेला बहर वेगळाच वाटत होता.

   कोकणचे हे सौंदर्य मनाला वेड लावते.अथांग सागर , नारळी पोफळीच्या बागा ,  स्वच्छ किनारा , ताजी हवा , हिरवागार निसर्ग , लज्जतदार जेवण , रम्य खाडीसफर , मजेदार वाटरस्पोर्टस , पाण्याखालचे अद्दभूत जग ,  मासेमारी , लोककला , दशावतार , किल्लेभ्रमंती , गजबजाट , आरामदायक रिसॉर्ट आणि प्रेमळ माणसांची सोबत अशा कोकणातील भुरळ पाडणा-या गोष्टी नजरेसमोर खेळतात तेंव्हा मला आदरणीय लेखिका  गीता गजानन गरुड यांची आठवण आली.हिरव्यागार निसर्गामुळे त्यांंचे लेखन संस्मरणीय होते याची प्रचिती आली.

    कोकणी माणसातील त्यांंच्यातिल  सभ्यपणा मला भावला.ईरा व्यासपीठावरील त्यांचे मुद्रीत लेख पाहिले तेंव्हा त्यांंच्या लेखणातील ताकद समजली.पटपट दररोज येणारे लेख म्हणजे  त्यांंच्यातील  प्रतिभा किती तजेलदार असेल याची  जाणिव झाली.आदरातिथ्य स्वभाव ,
सहजसुंदर लिखाण , ओघवती भाषा , दैनंदिन जीवनातील विषयांना शब्दांची ताजी फोडणी , कथेत ओतलेली समरसता , विविध विषयांना कथेत गुंफण्याची कला , प्रेमळ वागणे  आणि साहित्यक्षेत्रात मदत करण्याची भावना यामुळे गीताताईंनी लेखनकलेत यशस्वी भरारी घेतली आहे. मॉम्सप्रेसो  व ईरा व्यासपीठावर त्यांंचे लेखन बहरले आहे.त्यांंच्या कथा कविता हा लेखनाचा गाभा आहे. कोकणी भाषेतील माधुर्य हे त्यांंच्या बोलण्यातून व कृतीतुन जाणवते.

        आपल्या लेखनशैलीवर  अफाट प्रेम आसणा-या या लेखिका कविता सहज करतात.कवितेतील त्यांंचे  भाव तरल व उत्कट असतात.त्यांंचा लेखनप्रवास बहरताना अनेक लेखिका मैत्रिणींचा सहवास त्यांना हावाहवासा वाटतो ...तो निरंतर जपताना निखळ मैत्री कोकणातील हिरवाईसारखी भरलेली आहे.

    कोकणची ही कर्मभूमी अनेक लेखकांची खाण आहे हे मला या कोकण सफरीवर असताना मनोमन जाणवले व आदरणीय गीताताईंची आठवण आली व त्यांंच्याबद्दल लिहण्याची अनेक दिवसाची ईच्छा पूर्ण झाली.ज्यावेळी कोकणात जाऊ त्यावेळी ही संस्मरणीय आठवण येतच राहील ...!! आदरणीय गीताताईंना नववर्षाच्या शुभेच्छा ... ! त्यांंची लेखणी सतत तळपत रहावी व वाचकांना नेहमी चांगल्या लिखाणाची  मेजवानी मिळावी ..! शब्दांची ही छोटी भेट अत्यानंद देईल हीच अपेक्षा...!!

   बहरावे लेखन असे
  कोकणाचे निसर्गसौंदर्य खुलते तसे
  गीताने बरसावे असे
  वाचकांच्या मनात रहावे लेखणीचे ठसे

         ©®नामदेवपाटील

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now