गर्ल्स हॉस्टेल.. भाग - नऊवा...

त्या तिघींना सुद्धा कळतं की बलात्कार झालं आहे करून..

.... भाग -9....


सायली, " आम्ही काही लपवत नाही आहे मॅडम..!"


सोनिया, " हो मॅडम विश्वास ठेवा आमच्यावर, आम्हाला काहीच माहित नाही आहे. "


अनामिका, " हो आणि आम्ही का काही लपवू तुमच्यापासून..? "


डिन मॅडम, " तू तरं काहीच बोलू नकोस अनामिका, कारण तु काय करतेस काय नाही हे सगळं चांगलंच माहित आहे मला !"


अनामिका, " अहो मॅडम तुम्ही का विश्वास ठेवत नाही ?"


डिन मॅडम, " कसं विश्वास ठेवू..आणि का ठेवायचा ?मला खरं काय ते सांगा ? "


अनामिका, " मॅडम आम्ही खरं बोलत आहोत.!"


सोनिया आणि सायली, " हो मॅडम. " तिघी सुद्धा डिन ला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात.


डिन मॅडम, " मी डॉक्टर ला पाठवून देते, ते येऊन पाहतील काय ते..मग आपण बोलू..!" आणि डिन मॅडम तिथून निघून जाते.


अनामिका, " काय करायचं, ह्या हिटलर ला कसं समजवायचं..? "


सोनिया, " ती तरं आपल्याला व्हाय्यात समजत आहे. तिला आपल्यावर विश्वास बसणं खूप कठीण दिसतंय.."


सोनाली, " नक्की काय झालं आहे, हे आपल्याला रिया कडूनच कळेल इतकंच मला कळतंय..!"


अनामिका आणि सोनिया, " बरोबर बोलतेय.!"


अनामिका, " थांब मी रिया ला उठवायचा प्रयत्न करते.. तिलाच विचारूया आपण! "


अनामिका रिया ला उठवण्याचा प्रयत्न करते, " रिया.. यार उठ ना... रिया.. " अनामिका तिला आवाज देते.


रिया हळूच डोळे उघडते. पण तिच्या पुढ्यात फक्त जखमी अमितच दिसतं असतो. तिचे ओठ सुकलेले असतात. घशाला कोरड पडलेली असते. ती हळूच हात उचलते.. आणि अनामिका ला स्पर्श करते. काहीतरी सांगण्याचा ती प्रयत्न करते.


अनामिका, " रिया.. बोल ना काय झालं..? प्लीज.. "


सोनिया, " यार ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आहे..? "


अनामिका, " हो यार,,!"


रिया पुन्हा बेशुद्ध होते. तितक्यात डॉक्टर रूम मध्ये येतात.


डॉक्टर, " किती दिवस झाले ताप आहे ? "

डॉक्टर त्या तिघींना विचारतात.


अनामिका, " आज सकाळ पासून आहे..? म्हणजे आम्हाला ही आजच सकाळी कळालं. "


सोनिया, " म्हणून तिला गोळी ही दिली आणि थंडपाण्याची घडी सुद्धा ठेवली..!"


डॉक्टर तिच्या हाताची नाडी बघतात , " बरं.. मला हिचा थोडा चेकअप करावा लागेल. सो तुम्ही तिघी जरा बाहेर थांबा..!"


त्या तिघी सुद्धा रूमच्या बाहेर थांबतात. डॉक्टर तिचा चेकअप करतात. तिघींच्या पण चेहऱ्यावर टेन्शन असतं. की डॉक्टर मॅडम ने बाहेर का थांबायला सांगितलं ? नुसता ताप तरं आहे..? मग अजून काय कारण असेल..?


काही वेळानंतर डॉक्टर त्या तिघींना सुद्धा आत बोलवतात. काही मिनिट रूम मध्ये शांतता असते. डॉक्टर काही वेळ काहीच बोलत नाही.


न राहुन अनामिका डॉक्टरांना विचारते, " काय झालं आहे डॉक्टर ? "


डॉक्टर, " ह्यांच लग्न झालं आहे का..? "


सोनिया, " हो झालं आहे, पण तिचा डिवोर्स झाला आहे.आणि गेले वर्ष झालं आम्ही एकत्र राहतो आहे. "


डॉक्टर, " बरं मग हिला मुल वगरे, आणि कामाला कुठे ह्या ? "


सायली, " हिला एक मुलगी आहे, आणि कामाला ती एका कॉलसेंटर मध्ये आहे. "


डॉक्टर, " बरं ह्यांनी तुम्हाला काही सांगितलं वगरे का की काय झालं आहे ते.? "


त्या तिघी सुद्धा डॉक्टरांच्या प्रश्नांनी घाबरतात. मनात अनेक प्रश्नांचा घोळ असतो.


अनामिका, " डॉक्टर पण तुम्ही हे असं का विचारत आहात.. नेमकं काय झालं आहे ? "


डॉक्टर काही वेळ गप्प बसतात आणि मग बोलतात, " हिच्यावर बलात्कार झाला आहे ? "


अनामिका, " काय बोलतायत डॉक्टर? कधी शक्य आहे ? " अनामिका ला डॉक्टरांच्या बोलण्याचा शोक लागतो.


सोनाली, " कसं शक्य आहे..? तुम्हाला काही तरी गैरसमज झाला असेल..!"


सोनिया, "मॅडम तुम्ही पुन्हा चेकअप करा, असं शक्य नाही आहे. फक्त ताप आला आहे.. आणि त्याला तुम्ही बलात्कार बोलतात..."

त्या तिघी पण रडायला लागतात.


डॉक्टर, " मला माहित आहे. पण हेच खरं आहे. तिच्यावर बलात्कार झाला आहे.. आणि बलात्कार होऊन काही सात ते आठ तासचं झाले असतील.. "


अनामिका, " मॅडम तुम्ही ही गोष्ट प्लीज आमच्या डिन पर्यँत जाऊ देऊ नका .. " ती डॉक्टरांच्या पाया पडते खूप गयावया करते.


त्या तिघी पण डॉक्टरांना समजावतात.


डॉक्टर, " ठीक आहे पण, तुमच्या डिन मला तरं विचारणारच.. की नक्की काय झालं आहे तरं..? "


अनामिका, " तरं काही पण सांगा हवं तरं नुसता ताप आहे असं हवं तरं सांगा. पण तिच्यावर बलात्कार झालं आहे हे नका सांगू...!"


डॉक्टर विचारात पडतात, " पण हे कसं शक्य आहे ? आणि मी त्यांच्याशी खोटं कसं बोलू ? "


सोनिया, " अहो मॅडम तुम्ही जर खरं बोललात तरं ह्या डिन मॅडम, तिला कायमचं हॉस्टेल मधून काढून टाकतील." सोनिया रडत रडत सांगते.


सायली, " आणि जर तिला काढल तरं तिची लहान मुलगी आहे तिचं काय होईल ?" सायली विनवणी करत बोलते.


डॉक्टर तिघींचं बोलणं ऐकून काही वेळ शांत बसतात. तितक्यात डिन हिटलर तिकडे येते.


डिन, " काय झालं डॉक्टर, कशी आहे रिया आता ? "

ती डॉक्टर ला प्रश्न करते.

तितक्यात तिचं लक्ष जातं, " हे काय, तुम्ही तिघी का रडत आहात ? " तिला सौंशय येतो.


अनामिका, " काही नाही ते, रिया अशी आजारी पडली ना म्हणून !"


डिन पुन्हा डॉक्टर ला विचारते, " हे काय डॉक्टर सांगितलात नाही काय झालं आहे ते.? "


डॉक्टर डिन मॅडमला बोलतात, " ते.. ते...काही नाही ताप आहे, जर बरं नाही वाटलं तरं ऍडमिट करावं लागेल..!"



... क्रमश....

🎭 Series Post

View all