गर्ल्स हॉस्टेल... भाग -14

रिया आज एकटीचं असते रूम मध्ये....

...... भाग -14.


रिया, " बरं मग तू आहेस ना आता ? "


अनामिका, " नाही, म्हणजे आपली संध्याकाळी छोटीशी पार्टी आहे रूमवर, आणि तुलाही जरा बरं वाटेल. आणि तो पर्यँत मी माझं काम उरकून येते. "


रिया, " मी एकटी कशी थांबू ? " ती घाबरत घाबरत बोलते.


अनामिका, " तू एकटी नाही आहेस, सोनाली आहे की तुझ्यासोबत." अनामिका तिला समजावत बोलते.


अनामिका तिला समजावून फ्रेश व्हायला जाते. रिया बेडवरून उठून बाल्कनीत जाते. आराम खुर्चीत जाऊन ती डोळे मिठून बसलेली असते. 


बराच वेळ गेल्यानंतर सोनाली फ्रेश होऊन येते.

सोनाली, " रिया यार तू थांबशील का एकटी, मी जरा माझ्या ऑफिसची मिटिंग आहे ती संपवून येते. "


रिया सोनालीच्या बोलण्याने घाबरते, " अगं पण आज तुला काही काम नव्हतं ना ? मग हे असं अचानक..!"


सोनाली, " अगं मला मगाशी ऑफिस मधून कॉल आला, त्यामुळे.. तू घाबरू नकोस काही असेल तरं कॉल कर... "


रिया, " बरोबर आहे, मला कधी ना कधी ह्यातून बाहेर यावं लागेल ना. तुम्ही तरी मला किती दिवस असं सहन करणार. तू जा मी थांबेन.. " रियाच्या बोलण्याने सोनालीला खूप वाईट वाटतं.


सोनाली रियाला समजावत बोलते, " तू वाईट नको वाटुन घेऊस, आणि प्लीज असं वेड्यासारखं नको बोलूस.. "


रियाच्या डोळयांतून पाणी येत. सोनाली ऑफिससाठी निघून जाते. 

दुपार होते तरी अनामिका चा काही पत्ता नसतो. रिया मोबाईलवर गाणी लावून शांतपणे ऐकत बसलेली असते.


हॉस्टेलची पिकनिक गेल्यामुळे आज हॉस्टेल ला कोणी नसतं. रियाला भूक नसते पण जगण्यासाठी का होईना ती बाहेरूनच ऑर्डर करते आणि जेऊन झोपते. संध्याकाळ होते. हॉस्टेल मध्ये सगळीकडे शांतता असते. सगळ्याच रूम बंद असल्यामुळे फक्त रियाच्या रूमची लाईट चालू असते. 


तितक्यात रूमचा दरवाजा कोणीतरी जोरात वाजवतो. रिया दचकून जागी होते.

रिया स्वतःशीच बोलते, " इतक्या जोरात कोणी वाजवला ? तिघीं पैकी कोणी ही असा दरवाजा वाजवणार नाही. " पुन्हा दरवाजा वाजतो...


रिया घाबरत घाबरत विचारते, " कोण आहे...? कोण आहे...? " जसं जसं ती विचारते तसं तसं दरवाजा वाजवायचा बंद होतो... ती दरवाजा जवळ जाते...


इतक्यातच रूमचा फोन वाजतो. रिया घाबरतच फोन जवळ जाते, पण फोन उचलण्याची तिची हिम्मत नसते. पुन्हा फोन वाजतो. ती कसं बस रडत फोन उचलते.

" हॅल्लो,, कोण बोलतंय.. हॅल्लो,,, " समोरून कोण काहीच बोलत नाही... रिया फोन कट करते...


पुन्हा फोन वाजतो, " हॅल्लो.. काही तरी बोला.. कोण आहे ? हॅल्लो... "


पुन्हा दरवाजा ठोठावतो ती कसं बस दरवाजा उघडते, " समोर कोणीच नसतं. ती पटकन दरवाजा लावते.. ती बाल्कनीतून बाहेर बाकून पाहते. पण वॉचमन नसतो.

रिया, " हे काय, काका कुठे गेले ? ते तरं जाणार नव्हते."


समोरच तिला अमितची गाडी दिसते ती गाडी पाहून दचकते, " हे काय अमितची गाडी इथे कशी ? " तीचं लक्ष जातं काही रस्त्यावरची कुत्री अमितच्या गाडीच्या दिशेने भोकत आहे...


ती आत येते, मोबाईल घेते. कसबस सोनिया ला फोन लावते. पण सोनियाचा फोन लागत नसतो.

" कोणाला लावु ? सोनियाचा कॉल काही लागत नाही.. खूप भीती वाटतेय.. एक काम करते अनामिका ला कॉल करते.. " म्हणून ती अनामिका ला कॉल लावते..

पण अनामिकाचा कॉल हा सतत रिंगिंग जात होता.


तिला पूर्ण घाम फुटला होता. हातपाय गळायला लागले होते.

रूमची लाईट येत जात होती. रूमचा दरवाजा पुन्हा ठोठावतो. 


ती दरवाजा खोलते, दारात अनामिका असते. रिया अनामिकाला घट्ट मिठी मारते. आणि रडू लागते.

रिया मिठी मारत, " का मला एकटीला सोडून गेलात ? किती घाबरली होती मी. तो आला आहे परत, त्याची गाडी उभी आहे बाहेर...!" अनामिका वेड्या सारखं वागत आणि बोलत होती.


अनामिका तिला शांत करत बोलते, " तू शांत हो आधी, आणि कोण तो ? कोणाबद्दल बोलत आहेस तू ? कोण उभं आहे ? तू शांत हो कोणी नाही आहे. "


रिया, " तो, मला सोडणार नाही तू दरवाजा लावून घे आधी..!" रिया वेडीपीशी होतं होती.


अनामिका आत येते दरवाजा लावून घेते. रिया तिला बाल्कनीत घेऊन जाते. आणि अमित ची गाडी दाखवत बोलते, " ती बघ तिथे गाडी उभी आहे. "


अनामिकाला दूर दूर पर्यंत रस्त्यावर कोणतीच गाडी उभी दिसतं नाही. साधं कुत्र ही नव्हतं रस्त्यावर., " कुठे आहे गाडी ? इथे गाडी नाही आहे कोणाचीच. तू स्ट्रेस मध्ये आहेस तू ये इथे झोप बरं आधी. " अनामिका तिला आत रूममध्ये न्हेत बोलते."


रियाला ती झोपवण्याचा प्रयत्न करते. पण रिया तिचं काही ऐकायला तयारचं नाही.

ती पुन्हा उठते, पुन्हा इथे तिथे पळायला लागते. अनामिका मोबाईलवरून सोनियाला कॉल लावते. पण सोनियाचा कॉल काही लागत नाही.


अनामिकाच दुर्लक्ष होताच रिया रूमचा दरवाजा खोलून बाहेर पळते.

अनामिका तिच्या पाठी पाठी जाते. तितक्यात अनामिकाच्या समोर सोनिया आणि सायली येतात.


अनामिका, " अरे यार मोबाईल वर किती कॉल केले तुम्हाला ? दोघींचे ही फोन लागत नाही.. " अनामिका खूप घाबरलेली असते.


सोनिया, " काय झालं काय ? आणि अशी पळत का आलीस ? " 


अनामिका, " यार रिया खूप वेड्या सारखं वागत आहे, तिला स्वतःलाच कळतं नाही की ती अशी का करते आहे ? "


सोनाली, " ती गेली कुठे पण ? आणि तू तिला एकटं सोडल कसं ? "


अनामिका, " मी एकटं सोडल नाही ती माझ्या सोबत रूम मध्येच होती, जेव्हा मी तुम्हाला कॉल लावायला आणि ती तिथून निघायला ? "


सोनिया चिडते, " ही वेळ नाही हे सगळं विचारायची, तिला शोधन हे महत्वाचं आहे आता. " आणि त्या तिघी सुद्धा तिला शोधायला हॉस्टेलभर फिरतात.



..... क्रमश....


🎭 Series Post

View all