गर्ल्स हॉस्टेल... भाग -12

डिन एकदिवशीय पिकनिक ठरवते...

भाग -12



बराच वेळ होतो अनामिका चा काही पत्ता नसतो. सोनिया न राहुन अनामिकाला कॉल करते, पण अनामिका चा मोबाईल बंद लागत असतो.

सोनिया घड्याळात पाहते, घड्याळात रात्रीचे बारा वाजलेले असतात.

सायली आणि रिया झोपलेले असतात. सोनिया ला तुफान झोप आलेली असते, म्हणून तिही झोपते.


काहीवेळा नंतर सोनिया ला दरवाजा उघडण्याचा आवाज येतो. म्हणून ती उठून पाहते. तरं अनामिका आलेली असते.


तिचे कपडे मळकट दिसतात आणि शर्ट बाजूने फाटलेल दिसतं. हाताला सुद्धा खर्चटलेलं दिसतं. सोनिया अनामिका चा असा अवतार पाहून प्रश्नात पडते.


ती न राहुन अनामिकाला विचारते, " अनु काय गं, काय झालं ? आणि हा असा अवतार का बनवला आहे ? हाताला खर्चटलं कसं ? " सोनियाचा अनामिकावर प्रश्नांचा भडीमार सुरु होतो.


अनामिका सोनियाच्या प्रश्नांनी गोंधळते, " अगं ते, मी.. जरा.. अगं पार्टी होती ना म्हणून "

सोनियाला अनामिकाच्या उत्तरांवर सौंशय येतो. तिच्या मनात वेगळेच विचार चालू होतात.


सोनिया, " अगं तसं नाही तू मारामारी वगरे तरं केली नाही ना ? आणि किती उशीर झाला बघ ? "


अनामिका घड्याळात पाहत बोलते, " अगं हो की, एक वाजला आहे. शी मी पण ना, बरं तू झोप. मी ही झोपते.!" असं बोलून अनामिका झोपायला जाते. आणि सोनिया ही झोपते.


सोनियाला भीती असते की आता अनामिका कडून कसला प्रॉब्लेम होता कामा नये. आणि झाला तरं डिन काही हॉस्टेल मध्ये राहू देणार नाही. 


सकाळ होते.... नेहमी प्रमाणे सोनिया लवकर उठलेली असते.

ती चहा घेत बाल्कनीत उभी असते. आज मुद्दामच सोनियाने ऑफिस ला रजा घेतली होती. तेवढ्यात अनामिका उठून बाल्कनीत येते.


अनामिका, " गुडमॉर्निंग डिअर.. " अनामिका सोनिया ला बोलते..


सोनिया, " लवकर उठलीस ? नाही म्हणजे काल तुला उशीर झाला होता ना ? " सोनिया तिला सौंशयाच्या नजरेने विचारते.


अनामिका, " अगं हो पण आली जाग नेहमी प्रमाणे. बरं रियाची तब्येत कशी आहे आता ? "


सोनिया, " बरी आहे, काल ती घाबरली होती जरा."

सोनिया कालच प्रकरण अनामिका ला सांगते.


अनामिका, " घाबरली होती म्हणजे ? नक्की काय झालेलं ? " अनामिका तिला विचारते.


सोनिया तिला काल जे घडलं ते स्पष्ट भाषेत सांगते.


अनामिका, "हिला असं एकटीला ठेवणं खूप रिस्की आहे तरं ?"


सोनिया, " पण असं किती दिवस तिच्या सोबत कोण राहणार, खरी परिस्थिती जी आहे ती आहे. तिला सुद्धा मुलगी आहे, ती मोठी होणार बिन आईची का ? त्यामुळे तिला बाहेर पडणं गरजेचं आहे. "


अनामिका, " बरोबर आहे तुझं..!"


सोनिया, " तुझ्या हाताला काय झालं ? लागलं कसं ? " सोनिया तिच्या हातावरची जखम बघत बोलते.


अनामिका स्वतःचा हात पाठी खेचत बोलते, " अगं ते काही नाही, काल जरा पाय घसरला आणि पडली पबच्या बाहेर.. " ती गोंधळत उत्तरं देते.


सोनिया तिच्याकडे पाहत बोलते, " नक्की पाय घसरला तरं ठीक आहे... बाकी काही असेल तरं सांग ? "


अनामिका, " नाही गं काही नाही... " तितक्यात रूमचा फोन वाजतो.


समोरून डिन मॅडम असतात. सोनिया फोन घेते.

सोनिया फोन वर डिन मॅडम चा आवाज ऐकून, "हॅल्लो मॅडम सोनिया बोलते आहे. बोला ना!"


डिन मॅडम, " सोनिया सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी आपण बाहेर पिकनिक काढण्याचा निर्णय घेतलाय. सो तुम्ही चौघी ही येणार आहात ना ? "


सोनिया, " ते मी तुम्हाला ह्या तिघींना सुद्धा विचारून कळवते..!"


डिन मॅडम, " बरं बरं ठीक आहे, सांगा मला.. " आणि मॅडम कॉल ठेवून देतात.


गर्ल्स हॉस्टेल ची डिन जरी खडूस असली तरी, हॉस्टेल च्या मुलींना ती वर्षातून एकदा पिकनिक ला घेऊन जायची. 1 दिवशीय पिकनिक असायची. आणि त्यासाठी डिन मॅडम ने विचारण्यासाठी कॉल केलेला.


सोनिया, " डिन बोलतेय पिकनिक जातेय, तुम्ही कोणकोण येणार आहात ? "


अनामिका, " मग तू काय म्हणालीस ? आणि कसं जाणार ना !" पिकनिक म्हटलं की अनामिका पहिली तयार व्हायची कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्या.


सोनाली उठते, " काय कसली मीटिंग चालली आहे दोघींची ? "


सोनिया, " मीटिंग नाही गं, डिन मॅडम चा कॉल आलेला पिकनिक ठरवली आहे त्यासाठी.!"


सोनाली पिकनिक जातेय म्हटल्यावर खुश होते, " ओह्ह्ह ग्रेट यार, चला काहीतरी विरंगुळा आपल्याला..!"


सोनिया, " मग तू आणि अनामिका जा ना, मी थांबते..!"


अनामिका, " अरे मी नाही येऊ शकत, तू नि सोनिया जा ना. "

अनामिका चं असं उत्तरं ऐकून दोघींना ही आश्चर्य वाटतं.


सोनाली, " अनु तू पिकनिक ला नाही म्हणत आहेस ? "


सोनिया, " हो यार मला ही नवलचं वाटलं हीच उत्तरं ऐकून. "


अनामिका, " अगं काही नाही, माझ कॉलेज चं प्रोजेक्ट बाकी आहे सो त्यामुळे... "


सोनाली, " बरं मग तुम्ही कोणीच नाही तरं मी तरी जाऊन काय करू..!"


अनामिका, " बरं मग आपण रूमवरच एन्जॉय करू.. तसं ही हॉस्टेल वर कोणी नसेल. रियाला ही बरं वाटेल.!"


सोनिया, " बरं ठरलं तरं मग, आणि ऑफिस चा दिवस भरून येते. मग करू रात्री पार्टी...!"


अनामिका, " बरं बरं... मी डिन ला सांगते आपल्याला नाही भेटणार यायला... "


तितक्यात रूमची लाईट जाते.

सोनिया, " अरे देवा हे काय मध्येच ? आणि लाईट आता कशी गेली ? "


सोनाली, " चिल यार, तुम्ही थांबा मी पाहते काय झालं ते.. " असं बोलू सोनाली रूम बाहेर पाहते.



..... क्रमश...

🎭 Series Post

View all