गर्ल्स हॉस्टेल.. अंतिम भाग..

अमितच्या बॉडी ची विल्ले वाट लावतात

. भाग -16




रिया रडू लागते. सोनिया तिच्या जवळ जाते, " रडू नकोस रिया, आम्हाला कळतंय तू कोणत्या प्रसंगातून जाते आहेस ते... "


अनामिका, " मी एकदा रियाला आणि अमित ला एका कॉफी शॉप मध्ये पाहिलेलं, तिथे ही ती अमित पासून वैतागलेली.. त्यानंतर मी रिया आणि अमितवर लक्ष ठेऊन होती... "


सोनिया, " पण तू आम्हाला का हे नाही सांगितलं कधी ? "


रिया, " कसं सांगणार एकतर मी डिवोर्स घेतलेला आणि तुम्हाला कळालं असतं तरं तुम्ही माझ्या बद्दल काय विचार केला असता ? "


अनामिका, " त्यानंतर आपण पार्टीला रूम मध्ये बसलेलं असताना अमितचे अनेक कॉल येणे, गाडी घेऊन हॉस्टेल बाहेर उभं राहणं.. सगळंच मला चांगलंच माहित होतं.. "


सोनाली, " आणि ? "


अनामिका, " काही दिवसांनी रियाच्या बलात्काराची खबर आपल्याला कळली, मग मी पूर्ण पणे ठाम होते हा बलात्कार अमितनेच केला आहे करून !"


रिया अनामिकाच्या बोलण्याने रडू लागते. अनामिका तिला जवळ घेते.


अनामिका, " मग मी विचार केला ह्याला असंच नाही सोडायचं.. एका बाईची इज्जत आणि तिचं बरबाद केलेलं आयुष्य ह्याची त्याला चांगलीच अद्दल घडवायची आणि मग पोलिसात द्यायचं.. पण ? "


सोनिया, " पण काय ? "


अनामिका, " जेव्हा तो तिला त्रास देऊ लागला. आणि जेव्हा हा हॉस्टेल मध्ये आला तेव्हा मी त्याला पाहिलं. मग मी त्याच्या पाठी पाठी पळाले. त्याची आणि माझी झटापट ही झाली. आणि तिथे असलेल्या एका लोखंडी सळीवर तो जाऊन पडला.. आणि तिथेच त्याचा मृत्यु झाला. "


सोनाली, " पण हे घडलं कधी ? आणि तुम्हाला कोणीच पाहिलं नाही का ? "


सोनियाच्या लक्षात येत दोन दिवसांपूर्वी अनामिकाला झालेला उशीर आणि धुळीने माखलेलं अंग आणि हाताला खर्चटलेलं, " मला माहित आहे कधी ते!"


अनामिका, " हो बरोबर आहे तुला जे माहित आहे ते सोनिया... "


रिया, " म्हणजे ? "


अनामिका, "सोनिया ने मला दोन दिवसांपूर्वी रात्री लेट आलेलं असताना पकडलेलं. पण मी तेव्हा खोटं बोलली होती. "


सोनाली, " इतकं सगळं झालं आणि ह्यातला आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला जरा तरी कल्पना द्यायला हवी होती. "


अनामिका, " मला माहित आहे मी गुन्हा केला आहे, आणि ह्याची शिक्षा मला भेटलीच पाहिजे... "


सोनिया, " हो खुओ मोठा गुन्हा केला आहेस. तोही आम्हाला काहीही न सांगण्याचा. "


सोनाली, " आणि तू काहीही चुकीचं केलंस नाही, त्याला कधी ना कधी शिक्षा व्हायलाचं हवी होती. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यु झाला. "


रिया, " तू काहीही मुद्दाम केलेलं नाही आहेसं, तुझ्या हातुन तो चुकून मारला गेला. "


सोनिया, " अगदी बरोबर.. "


रिया, " आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. "


सोनाली, " पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, ही डेडबॉडी कुठे आणि कशी लपवायची किंवा काय करायचं ? "


अनामिका, " कशाला लपवायची ? मी पोलीस मध्ये स्वतःला सरेंडर करेल !"


रियाला अनामिकाचं बोलणं ऐकून रडायला येत, "नाही तू असं काही करणार नाही आहेस. मी सुद्धा स्वतःला सरेंडर करेल..!"


सोनिया, " तुम्ही दोघी वेड्या आहात, काहीच विचार न करता तू असं पाऊल उचलू नका ... "


काही वेळ रूममध्ये शांतता पसरलेली असते... सोनिया बाल्कनीत जाते. बाहेर वाकून पाहते.


अनामिका सोनियाला बोलते, " काय झालं ? तू असं बाल्कनीतून वाकून काय पाहतेस ? "


सोनिया, " हे बघा, आता खाली वॉचमेन काका नाही आहेत, सो आपण डेडबॉडीची योग्य ती जागा निवडून देऊ. "


रिया, " काहीही काय बोलतेस ? सोनिया. कसं शक्य आहे. "


सोनाली, " का शक्य नाही, हा एकच ऑपशन आपल्याकडे आहे. नाही तरं ? "


सोनिया, " तुम्ही दोघी बोलतात ते तरी कसं शक्य आहे, रिया तुला मुलगी आहे आणि अनामिका तुझं पूर्ण आयुष्य तुझ्या समोर पडलय. नका करू असं काही..!"


सोनिया चं उत्तरं ऐकून त्या तिघी एकमेकींकडे पाहतात.


काही वेळ गेल्या नंतर, रिया घड्याळात पाहते., " आता वाजले आहेत अकरा जे करायचं आहे ते लवकर करूया!"


अनामिका, " चला तरं मग.. " अनामिका रियाला घट्ट मिठी मारते. आणि रडू लागते.


रिया, " थँक्स.. " रिया तिचे आभार मानते.


त्या चौघी ही रूम मधून बाहेर येतात. जिथे अमितची डेडबॉडी ठेवली होती त्या रूम जवळ जातात.

सोनाली घाबरत घाबरत, " यार मी नाही आधी आत जात तुम्ही कोणी तरी जा आत, मग मी येते पाठून...!"


अनामिका, " तू जर अशी घाबरलीस तरं कसं चालेल, आपला ह्यातच अर्धा वेळ निघून जाईल...!"


रिया आजूबाजूला पाहत, " लवकर चला इथे जर कोणी आलं तरं प्रॉब्लेम होईल... "


अनामिका त्या तिघींच्या आधी आत जाते. रूमच्या लाईट च बटण शोधते. आणि ती रूमची लाईट चालू करते. त्या प्रकाशात त्याची बॉडी अत्यंत विद्रुप अशी दिसतं होती. त्याला मरून दोन दिवस उलटून गेले होते.

त्यातून येणार वास अत्यंत घाण होता.


रिया, " ह्याला इथे कुजत ठेवलास ? तरी डिन ला कळालं नाही ? "


अनामिका, " इथे येत तरी कोण ? आणि वास येऊ नये म्हणून मी इंतजाम ही तसा केला होता...!"


सोनिया, " हुशार आहेस तू...? "


सोनाली, " कोणी तरी येईल लवकर...!" त्या चौघी ही अमितची बॉडी एका गोणीत टाकतात. बाजूला असलेल्या एका ट्रॉली मध्ये ती गोणी ठेवतात.. आणि कसं बस तिथून निघतात....


सोनिया आजूबाजूला पाहते, " ओके आहे सगळं... " आणि त्या हॉस्टेलच्या गेट मधून बाहेर येतात.


अनामिका, " एक मिनिट, माझ्याकडे अमित च्या गाडीची चावी आहे...!" ती चावी घेऊन गाडीची डिक्की खोलते. आणि त्यात अमितची बॉडी ठेवतात... आणि अनामिका गाडी सुरु करते...


रिया, " तुझ्याकडे कशी आली चावी ? "


अनामिका, " दोन दिवस झाले माझ्याकडेच आहे.." अनामिका गाडी एका सुमसाम जागेवर थांबवते. हॉस्टेल पासून किती तरी अंतर दूर.. गाडी येऊन थांबते.

तिथे खोल खाई असते... घनदाट जंगल आजूबाजूला असतं... त्या चौघी पण गाडीतून उतरतात आणि गाडीला त्या खाईत ढकलून देतात...


अनामिका रिया ला समजावत बोलते, "आपण एखाद वाईट स्वप्न पाहतो, तसंच काहीस समज आणि त्यातून जागी हो,,, आणि उजेडणारी सकाळ नव्याने सुरु कर...!"


आणि त्या तिथून हॉस्टेल च्या वाटेने चालू लागतात....


खरचं मैत्री ही अशी असावी की आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात साथ द्यावी...


... समाप्त...



🎭 Series Post

View all