फादर्स डे गिफ्ट आयडिया (Gift Ideas For Father's Day)

In This Blog You'll Get Gifting Ideas For Comming Father's Day
फ्रेंडशिप डे, मदर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे असे डेज जितक्या उत्साहात साजरे केले जातात तेवढ्याच उत्साहात फादर्स डे साजरा केला जातो. आपल्या लाडक्या वडलांना काय खास भेट द्यावी हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या लेखात तुम्हाला बरेच पर्याय मिळतील. यातला एक तरी गिफ्टिंग ऑप्शन तुम्हाला आवडेलच. चला तर मग बघूया काय आहेत ते ऑप्शन्स.

सगळ्यात आधी आपण तुम्ही स्वतः काय काय करू शकता हे बघूया. जर कामाच्या व्यापात किंवा वेळेअभावी हे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना काय घेऊन देऊ शकता हे बघू.

१. स्वतः तयार केलेले कार्ड:- कामाच्या गडबडीत किंवा आईसोबत बोलताना जेवढा मोकळेपणा असतो तेवढा नसल्याने कधीकधी भावना पोहोचवणे जमत नाही. तुम्हाला तुमच्या मनातल्या भावना तुमच्या बाबांना कळवण्यासाठी फक्त एक साधं सोपं कार्ड बनवायचं आहे. ज्यात तुमच्या शब्दात त्यांच्यासाठी काहीतरी लिहिलेलं असेल. तुमच्या मनातल्या भावना जाणून त्यांच्यासाठी ते कार्ड अगदी जीव की प्राण असेल.

२. लंच/ डिनर पार्टी:- एकत्र वेळ घालवण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे तुमच्या परिवारातील सगळे एकत्र येऊन एक दिवस छान मजा करू शकता. हा दिवस पूर्ण वर्षभर एक उत्साह देऊन जाईल आणि काहीतरी चेंज मिळाल्यामुळे सगळेच फ्रेश होतील.

३. मेमरी रिक्रियेशन:- तुमच्या बाबांना खास सरप्राइज देण्यासाठी तुम्ही त्यांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत ज्या काही कडू गोड आठवणी असतील त्या रेक्रियेट करू शकता. डान्सच्या रुपात, नाट्य रुपात किंवा बाबांचे फोटो गोळा करून शॉर्ट फिल्मच्या रुपात तुम्ही ते त्यांच्यासमोर सादर करू शकता. जीवनात पुन्हा एकदा मागे वळून पाहताना त्यांनाही आनंद होईल.

एवढंच नव्हे तर तुम्ही लहान असताना तुमचे बाबा तुमच्यासाठी जे करायचे म्हणजेच तुम्हाला बागेत घेऊन जायचे किंवा समुद्र किनारी घेऊन जायचे आणि तिथे तुम्ही काय मजा करायचा हे सुध्दा तुम्ही रीक्रिएट करू शकता. थोडक्यात या ऑप्शन्स मध्ये तुम्ही तुमच्या बाबांसोबत तसेच संपूर्ण कुटुंबासोबत एक क्वालिटी टाइम घालवा.

• तुमच्या वडलांना वाचनाची आवड आहे का? तर हे पर्याय खास तुमच्यासाठी.

१. सबस्क्रिप्शन:- तुमच्या वडलांना आधीच वाचनाची आवड असल्याने जर तुम्ही त्यांना एखाद्या मासिक किंवा ऑनलाईन ॲपचे सबस्क्रिप्शन घेऊन दिले तर एकाचवेळी त्यांना बऱ्याच पुस्तकांची मेजवानी मिळेल आणि त्यांच्यासाठी हे खास गिफ्ट ठरू शकेल.

२. एखाद्या आवडत्या लेखकाचे पुस्तक:- तुमच्या वडलांना कोणता लेखक/ लेखिका आवडतात यानुसार तुम्ही त्यांना त्यांची पुस्तके भेट म्हणून देऊ शकता.

३. बुकमार्क:- पुस्तक प्रेमींना जितके पुस्तक जवळचे असते तितकाच बुकमार्क पण असतो. एखादी आठवण म्हणून खास युनिक बुकमार्क तुम्ही तुमच्या वडलांना देऊ शकता. यातही जर तुम्हाला क्राफ्टींगची आवड असेल तर स्वतःच्या हाताने तुम्ही बुकमार्क बनवून देऊ शकता. तुम्ही स्वतः बुकमार्क बनवला आहे म्हणल्यावर तुमच्या बाबांना तो खूप जास्त आवडेल.

४. टेबल लॅम्प:- वाचनाची आवड असलेले लोक नेहमी रात्री उशीरपर्यंत जागून वाचन करतात. तुमच्या बाबांनाही ही सवय असेल तर युनिक शेपमध्ये मिळणारे तसेच व्यवस्थित उजेड देणारे टेबल लॅम्प तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता.

• तुमच्या बाबांना टेक्नॉलॉजी आवडते का? मग हे पर्याय खास तुमच्यासाठी.

१. स्मार्ट वॉच:- तुमच्या टेक्नॉसर्वी बाबांसाठी हे एक छान गिफ्ट ठरू शकते. तुमच्या बजेटनुसार तुम्ही कोणत्या प्रकारचे वॉच घ्यायचे हे ठरवू शकता.

२. वायरलेस इअर फोन्स:- तुमच्या बाबांना हे गिफ्ट देखील खूप आवडेल. शिवाय हे घेण्यासाठी जास्त बजेट असणं देखील गरजेचं नाही.

३. की फाइंडर:- रिमोटने ऑपरेट होणारे हे एक डिव्हाईस आहे. यामुळे कार, स्कूटर तसेच घराची किंवा इतर कोणतीही चावी शोधण्यास मदत होते.

• तुमच्या बाबांना संगीत प्रिय आहे का? मग हे पर्याय खास तुमच्यासाठी.

१. वायरलेस ब्ल्यूटूथ स्पीकर:- संगीत प्रिय असल्याने तुमच्या बाबांना तुमचे हे गिफ्ट खूप आवडेल यात काही शंका नाही.

२. वायरलेस हेडफोन्स:- प्रवासात गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.

३. एखादे आवडते वाद्य:- तुमच्या बाबांना आवडत असलेले एखादे संगीत वाद्य त्यांना भेट देऊन तुम्ही त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.

४. रेडिओ:- खास बाबांना, बाबांच्या जमान्यातील गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी हा पर्याय उत्तम असेल. संगीत प्रेमींना रेडीओवर गाणी ऐकायला मिळत असतील तर त्यांच्या आनंदाला चार चाँद लागतात.

• तुमच्या बाबांना काळाबरोबर राहायला आवडते का? मग हे खास फॅशन पर्याय तुमच्यासाठी.

१. सनग्लासेस:- आजच्या फॅशनच्या युगात मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे आणि लेटेस्ट फॅशनचे सन ग्लासेस सहज उपलब्ध आहेत. तुमच्या हँडसम बाबांना हे देऊन तुम्ही त्यांना चांगलेच खुश करू शकता.

२. टी शर्ट:- आजकाल पर्सनलाईझ्ड टी शर्ट सहज मिळतात शिवाय ते बजेट फ्रेंडली देखील आहेत. असे टी शर्ट देऊन तुम्ही तुमच्या हँडसम बाबांचा लूक अजूनच स्मार्ट करू शकता.

३. शेविंग किट:- फॅशन वर्ल्ड बरोबर चालताना अनेकवेळा हेअर स्टाईल आणि बिअर्ड स्टाईल बदलत असते त्यामुळे हा देखील एक उत्तम पर्याय तुमच्या समोर आहे.

• तुमच्या बाबांना फिरण्याचा छंद आहे का? मग हे खास पर्याय तुमच्यासाठी.

१. ट्रायव्हल बॅग:- तुमच्या बाबांना फिरण्याचा छंद असल्याने तुम्ही त्यांना लेटेस्ट कमी वजनाची पण भरपूर सामान मावेल अशी बॅग गिफ्ट करू शकता.

२. पॉवर बँक:- प्रवासात सतत मोबाईल चार्ज करायला मिळेल किंवा नाही याची शाश्वती नसते म्हणून त्यांना पॉवर बँक देऊन तुम्ही तुमच्या बाबांची काळजी मिटवू शकता.

३. सेल्फी स्टिक:- विविध स्थळांना भेट देताना त्या आठवणी तुमच्या बाबांच्या कायम स्मरणात राहतील अशी व्यवस्था करण्यासाठी त्यांना सेल्फी स्टिक देणे योग्य ठरेल. पुढच्यावेळी ते कुठे गेले की त्या क्षणांना ते कॅमेऱ्यात कैद करून ठेवतील.

४. की चेन:- युनिक की चेन आजकाल बाजारात सहज मिळतात. तुमच्या बाबांना असे की चेन देऊन तुम्ही त्यांना नक्कीच खुश करू शकता.

५. सोलर पॉवरवर चालणारे लँप:- जर तुमचे बाबा ट्रेकिंग किंवा कँपिंगसाठी जात असतील तर त्यांना देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बॅटरी मधील सेल संपले किंवा ऐनवेळी काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून बॅटरी चालू झाली नाही अशी स्थिती पुन्हा उद्भवणार नाही. हे लँप दिवसा उन्हात चार्ज होतात आणि चांगला प्रकाश देतात.

• तुमचे बाबा हेल्थ कॉन्शिअस आहेत का? मग हे खास पर्याय तुमच्यासाठी

१. फिटनेस बँड:- दिवसभरात आपण किती कॅलरी बर्न केल्या, किती चालणे झाले हे माहीत करून घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

२. जिम मेंबरशीप:- तुमच्या बाबांना आरोग्याची काळजी असल्याने त्यांना जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे नक्कीच आवडेल.

३. रूटीन चेकअप:- फादर्स डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बाबांचे रूटीन चेकअप करून घेऊ शकता. यात बऱ्याच प्रकारच्या ब्लड टेस्टचा समावेश असतो. भविष्यातील त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे एक चांगले गिफ्ट ठरू शकते.

४. बी.पी. मशीन:- आजच्या धावपळीच्या युगात सतत कामाचा ताण असतो आणि त्याचा परिणाम आपल्या ब्लड प्रेशरवर होत असतो म्हणूनच हा एक उत्तम गिफ्ट ऑप्शन ठरू शकतो.

• लो बजेट गिफ्ट काय असू शकतात?
जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही काय गिफ्ट देऊ शकता याचा विचार करत असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी आहेत. तुम्ही तुमच्या बाबांना प्रेमाने काहीही दिलं तरीही त्यांना ते लाखमोलाचे असणार आहे म्हणूनच आपण किती महागडी किंवा स्वस्त वस्तू देतोय याचा विचार न करता त्याच्या मागच्या भावना जपा.

१. वॉलेट:- अगदी सगळ्यांच्या बजेटमध्ये सहज बसेल आणि तुमच्या बाबांच्या कामी देखील येईल असा हा एक ऑप्शन आहे.

२. शूज:- तुमचे बाबा सकाळी मॉर्निंग वॉक ला जात असतील तर त्यांना हे फार आवडेल.

३. ऑफिस बॅग:- बाबा नेहमी सगळ्यांना नवीन वस्तू घेऊन देतात पण त्यांनाच वस्तू घ्यायच्या राहतात म्हणूनच त्यांना ऑफिसला जायला चांगल्यातली बॅग देणे हा उत्तम पर्याय असेल.

४. परफ्यूम:- तुमच्या बाबांच्या आवडीनुसार तुम्ही त्यांना परफ्यूम देऊ शकता.

५. बाबांच्या नावाने बँकेत किंवा पोस्टात आर.डी. अकाउंट:- यासाठी तुम्हाला एकदम पैसे असण्याची गरज नाही त्याचप्रमाणे तुमच्या या थोड्या थोड्या प्रयत्नांनी तुमच्या बाबांसाठी काही ठराविक वेळेनंतर एकदम रक्कम त्यांच्या हातात असेल.

तर हे होते काही गिफ्ट ऑप्शन्स. आशा आहे तुम्हाला या फादर्स डे निमित्त काहीतरी गिफ्टचा पर्याय आवडला असेल आणि तुमच्या बाबांना तुम्ही खुश कराल.