स्त्रीजन्मा तुझी कहाणी

स्त्री ची कहाणी
*घुसमट*

अगदी जवळच्या नातेवाईकाला तुमच्या कडून
फिजिकल रिलेशन
हवे आहे ,
हे तुम्हाला कळतं
पण तरीही ते नातं अगदी हसत हसत
जपावं लागतं
तेव्हा होते खरी घुसमट

रोज त्याच्या कडून नजरेने होणार
बलात्कार सहन करावा लागतो न
ती असते खरी घुसमट

त्याचा नको वाटणारा स्पर्शही
सहन करावा लागतो न
ती असते घुसमट

कधी हसण्याचा बहाण्याने
तर कधी रंग लावण्याच्या निमित्ताने
त्याची होणारी नको असलेली
जवळीक सहन करणे म्हणजे
खरी घुसमट

तोंड दाबून
बुक्क्यांचा मार सहन करणे
म्हणजे खरी घुसमट

बाहेरच्या जगात ती कितीही
रणरागिणी असली तरी
तिथे का कमजोर पडते
याचे न सापडणारे उत्तर म्हणजे
खरी घुसमट

*©® मीनल सचिन*