Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

घुसमट 3.0

Read Later
घुसमट 3.0


नेहा रक्षाबंधनची अगदी आतुरतेने वाट पाहत होती. लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच रक्षाबंधन होत. माहेरी ती सर्वांची लाडकी असल्याने आणि शिवाय लग्न झाल्यापासून सासरी गुंतल्याने तिला माहेराची अतोनात ओढ लागली होती.

तिने माहेरच्या कुणाला काय काय गिफ्ट घ्यायचा ह्याचा पुरेपूर विचार करून ठेवला होता अर्थात ती खूपच एक्ससायटेड होती रक्षाबंधन साठी. दोन दिवस आधीच सर्व शॉपिंग करून ती घरी परतली. लग्नानंतर पहिलाच सण सर्वांनी आनंदाने, उत्साहने साजरा करावा, असे तिला वाटत होत. ती देखील खूप खुश होती कारण तिच्या माहेरच्या घरातही ही तिचा पहिल्यांदाच माहेरवाशीन म्हणून मानपान होणार होता.

तिच्या माहेरच्या घरी पहाटे हवन आयोजित केले होते अर्थात ही त्यांची कौटुंबिक परंपरा होती. माहेरी अतिशय धार्मिक वातावरण असल्यामुळे घरातील मुलीचे लग्न झाल्याने तीच लक्षमीची पाऊले रक्षाबंधनला घरी उमटतात अशी त्यांची धारणा होती.

" विपुल , दीदी माझ्या घराजवळ राहते तर आपण आदल्या दिवशीच तिच्या घरी जाऊन राखी बांधूयात , मग सकाळी माझ्या घरी हवनाला जाऊ.. तुम्हाला चालेल ना.. "

\"का? तुला तुझ्या घरी का जायचं आहे? तूझ्या भावाला इथे बोलव. मी पण दीदींला दुपारी घरी बोलवतो. ती ह्या घरची एकुलती एक मुलगी आहे आणि तीचा योग्य सन्मान व्हायला हवा कुठं काहीही कमी पडायला नको तिला ही आता तुझी जबाबदारी आहे.

\"ठीक आहे विपुल , आपण दीदींला इथे बोलवू. माझ्या घरी सकाळी हवन आहे. मी सकाळी लवकर जाईन आणि दुपारपर्यंत येईन. दीदीही दुपारी येणार आहेत. अर्थातच हे त्यांचे स्वतःच हक्काचं घर आहे, त्यांनी यायलाच हवं..!"


"नाही नेहा... मग दीदीसाठी जेवण कोण बनवणार? घराची साफसफाई कोण करणार? तु तुझा हवनाचा बेत रद्द कर. आता तुझी प्रयोरिटी हे घर आहे, तुझं घर नाही."

नेहाने तिचा हवणाला जाण्याचा प्लॅन रद्द केला, ती घरी जाऊ शकली नाही आणि तिचे आई बाबा खूप दुःखी झाले. दीदी आपल्या माहेरच्या घरी जाऊ शकते , मग नेहा आपल्या माहेरच्या घरी का येऊ शकत नाहीत? बरं, दीदी आली, सगळ्यांनी जल्लोषात राखीपौर्णिमा साजरी केली. आणि दीदीला हे कळत नव्हत कि नेहा देखील कुणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे.. लेक आहे .. नेहानेही तिला सुरेख अशी साडी गिफ्ट केली.


नेहा तिच्या माहेरच्या घरी का जाऊ शकली नाही ह्याचा विचार देखील विपुल च्या बहिनिने केला नाही... बरं, तेवढ्यात तिला काकांचा फोन आला, त्यांनी विपुल आणि दीदीला जेवायला बोलावलं होतं.

" नेहा , नुकताच काकांचा फोन आला होता आणि त्यांनी मला आणि विपुलला जेवायला बोलावलंय. नवीन सुनेला तो कोणत्यातरी \"खास\" प्रसंगी बोलावेल अशी प्रथा असल्यामुळे त्याने तुला आमंत्रित केले नाही. म्हणून आम्ही बाहेर जातो. तुलाही तुझ्या माहेरी जायचं असेल ना.. तर तू जाऊन ये.. "

नेहा मात्र शॉक झाली. विपुल देखील काही नाही बोलता दीदीने सांगितल्या प्रमाणे तयार झाला आणि सामान उचलले आणि दीदीला घेऊन घराच्या बाहेर पडला.

नेहा मात्र तिथेच निशब्द त्या दोघं भावांडाना बाहेर जाताना बघत होती.

आता न विचारता काय करणार? ती घरी जाईल का? कसं चालेल? कोणी पिकअप करेल का तिला कि कॅब करावी लागेल ? तिचा हवनाचा बेत रद्द झाला होता , सायंकाळ झाली होती म्हणून आता आई-वडील किती वाईट वाटेल? कसे साजरे करणार राखी पौर्णिमा ? या अकथित गोष्टीचा विचार नेहा मनातच करत राहिली आणि दुसरीकडे संवेदनाहीन वागणूक देऊन विपुल आपल्या बहिणीला घेऊन निघून देखील गेला.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//