Feb 27, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

घुसमट २.०

Read Later
घुसमट २.०


नवी नवरी नेहा रात्री तिचे दागिने काढून ठेवण्यासाठी तिच्या ड्रेसिंग टेबल जवळ स्टूल वर बसली होती. इतकी थकलेली हरलेली कदाचित पहिल्यांदाच बघत होती आरशात... तिच्याच विचारांत गढलेली ... तीन दिवसांपासूनचे एक एक प्रसंग डोळ्यासमोर तरळून जात होते...


तीन दिवसांपूर्वी,

लग्नात पाठवणी होत असताना नेहाची सासू मीरा अगदी साळसूदपणे विहिन बाईला म्हणजे नेहाच्या आईची, किमयाची रडताना समजूत काढत होती, "वहिनी, तुम्ही काळजी करू नका. नेहाची अगदी मुलीप्रमाणेच काळजी घेईन आणि बाईमाणुस म्हणलं की प्रत्येकाला काही ना काही तडजोड करावी लागते, नाही का?"

*******

नेहा आणि विपुलचे रिसेप्शनचे वेळी,
"अरे आम्हालाही नेहासोबत फोटो हवा आहे. "
"विपुल इतक दूर का उभा आहेस, नेहाच्या गळ्यात हात घाल."

"हो भाऊ, आपणही वहिनीच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहू."

"नेहा लाजू नकोस, तू आता आमच्या घरची आहेस. "

" चला हातात हात घ्या, अरे एक कपल डान्स तो बनता है..! एकदम रोमँटिक वाला!"

********

जेव्हा नेहाचा गृहप्रवेश झाला आणि सगळे सोपस्कार पार पडले.

" नेहा ऐकतेस का, तू सकाळी ६ वाजता उठ. बाकी सर्वजण झोपत राहतील, पण काही काम आहे की नाही हे बघण्यासाठी घराची फेरी मारावी लागेल. थोडी थंडी असेल, पण तु स्वेटर घाल. म्हणजे तुला गरव्याचा त्रास होणार नाही."

"आणि हो एक सांगायचं राहील, आता सुळसुलीत साडी नेस घरात वापरता येईल अशा. काम करताना ह्या हेवी साड्या सांभाळता येणार नाहीत."

"आई, पूर्ण वेळ साडीची सवय नाही तर मी काही सलवार सूट शिवलेत, ते घालते ना..! आणि ओढणी घेईन मी डोक्यावर..!"

"कधी नसतेच सवय मुलींना साडी नेसण्याची, ती लग्नानंतर अंगवळणी पडते.."

"पण प्रीती ताईच ही लग्न झालंय, त्या ही ड्रेस वापरतात की..!"

"नेहा मुली घालू शकतात, तू फक्त साडी नेस, तू मुलगी नाहीस ना?"

*********

"नेहा, सकाळी उठून सगळ्यांच्या पायाला हात लावला का? आजी पासून मोलकरीण?"

"हो..."

"आम्ही पाहिला नाही...काकांच्या पाया पडलीस..? परत जा आणि परत पाया पडून ये.."

" घरात प्रत्येकाच्या पाया पडायचं. मुली फक्त पाया नाही पडत आपल्या घरात पण तुला मुलींच्या पाया पाडाव लागेल भलेही त्या वयाने तुझ्यापेक्षा लहान असेल तरीही.. वयाचा काही फरक पडत नाही."

*******

"नेहा, इतकं काय बोलत होतीस विपुल सोबत..? सगळे तिथे बसले होते. असं काही बरं वाटत नाही."

\""भाऊ-बहिणी बोलू शकतात, मुलीही बोलू शकतात. तू असं सगळ्यांसमोर बोलत जाऊ नकोस. आणि हो, इथे सर्व पुरुष आधी जेवतात. तिकडे डायनिंग कडे जाऊ नकोस आणि जेवण वाढायला करायला गेलीस तर काही बोलू नको आणि पदर घे डोक्यावर.."

" आणि काही अडचण असेल तर मुलींना पाठव वाढायला त्यांना पदर वगैरे डोक्यावर घ्यायच टेन्शन नसतच मुळी."

*******

दागिने काढताना विपुल मागून आला आणि नेहाच्या गळ्यात आरशात बघतच हातांचा हार केला. पण नेहाने नाराजीने तो हात झटकला आणि जाब विचारल्यागत विचारलं.

" विपुल, दिवसभर मी जेवले की नाही हे तू विचारलंही नाहीस? तु दिवसभर कुठे असतोस?"

"नेहा इथे एकत्र जेवत नाहीत... मला वाटलं तू घरातल्या बायकांसोबत जेवली असेल."

"विपुल, दिवसभरात सगळे \"बसले\" असताना तुम्ही एकत्र येऊन बसू शकता ना?\"

"नाही... नुकतेच लग्न झाले आहे, मी तुझ्यासोबत बसू शकत नाही, हॉलमध्येही खिडक्या आहेत, घरातील बाल्कनीतून आजूबाजूचे लोक पाहतात."

"अरे मग? लग्नाच्या वेळी सर्वजण तुला घेऊन नाचायला येत होते, तुझा हात माझ्या हातात देत होते, फोटोसाठी पोज देत होते आणि रोमँटिक डान्सची मागणी करत होते... आणि आपण इथे घरी एकत्र बसूही शकत नाही का? बाहेर आधुनिक असल्याचे ढोंग करता?"

"दिखावा? तुझ्या आणि माझ्या बहिणींमध्ये कोणी काही फरक केला आहे का? तुझा पदर पडत होता, त्यामुळे तुला त्रास होऊ नये म्हणून आईने हॉलच्या खिडक्या बंद केल्या तरीही तुला अस बोलवत तरी कसं?"

"विपुल , मी पदर न घेता राहता यावे म्हणून खिडकी बंद केली नाही, लोकांनी राईच पहाड बनवू नये म्हणून आणि आपल्याला दिखावा करता यावा.."

"लक्ष्मीच्या रुपात घरात प्रवेश करणाऱ्या \"सूने\"ला \"नवरात्री\"त \"दुर्गा\" म्हणून पूजल्या जाणाऱ्या मुलींपेक्षा वेगळे का वागवले जाते? मुलगी असणे आणि मुलीसारखे असणे यात हा फरक आहे. असल्यास, दोन्ही समान आहेत का? देशातील सूनही \"मुलगी\" मानल्या जातील आणि \"मुलगीसारखी\" व्हायला पुन्हा कोणती मुलगी घाबरणार नाही, याला कदाचित काही वर्षे लागतील."

विपुल विचारात पडला की नेहा बरोबर बोलते आहे पण ते बरोबर कसे मान्य करणार? त्याचा अहंकार दुखावला गेला असता आणि तो आपल्या घरच्यांविरुद्ध बोलूही शकत नाही... नाहीतर नेहाला गप्प बसण्याचे प्रशिक्षण कसे मिळणार? नेहाचे बोलणं विपुलने ऐकले न ऐकले केले आणि मोठयाने जांभई देत पलंगावर स्वतःला झोकून दिले. नेहा मात्र आरशातून झोपलेल्या विपुलच्या उत्तराची आसुसलेल्या नजरेने वाट बघत होती.

सगळे तिच्या मनाविरुद्ध तिला वागवतात आणि ज्याच्यासाठी ती आपलं स्वातंत्र पणाला लावून गृहप्रवेश करते त्याला देखील तिची कदर नसते...कदाचित हीच ती घुसमट असते प्रत्येक स्त्रीची...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//