घुंगरू (भाग ४)

लघुकथा


आशेचा किरण ४

"हे बघ, मेघना मला असं वाटतं की आपले एकमेकांवर प्रेम आहे. हे आपल्या घरी सांगायला हवे."

"नको, इतक्यात नको. अजून चार पाच वर्षे तरी थांब. माझी स्पर्धा परीक्षा झाली की मग बोलूया."

अचानक मोना मेघनाला आवाज देऊ लागली. त्यामुळे
त्यांचा लग्नाचा विषय तिथेच बंद झाला.

मेघना आणि अनुरागही पाण्यात गेले . तिघेही मनसोक्तपणे समुद्रात खेळले. एकमेकांना ढकल, ओढाओढी कर ,पाणी उडवत अशी मस्ती बराचवेळ केली. त्यानंतर ते बाहेर पडले.

दुसऱ्या दिवशी फक्त राईड करायचे असे ठरले. ठरल्याप्रमाणे परत ते समुद्रावर आले. काही स्वतंत्र राईड झाल्यानंतर त्यांनी बनाना राईड करायचे ठरवले. तिघेही सेफ जॅकेट घालून बनाना राईड करण्यासाठी चढले.
बनाना राईड करतांना त्यांना अतिशय आनंद झाला. पण, काही वेळानंतर मेघना आणि मोनाला भिती वाटू लागली. कारण, राईड करतांना त्या व्यक्तीने त्यांना समुद्राच्या बरेच आत आणले होते आणि अचानक बोट उलटी केली. तिघेही पाण्यात पडले. जोरात किंकाळ्या फुटल्या. पण, त्या भितीपोटी होत्या. पाण्यात पडल्यानंतर लगेचच ते वर आले आणि पाण्यात तरंगू लागले. खूप मजा केल्यानंतर ते परत फिरले.

तिघेही खूप थकले होते. त्यामुळे ते आराम करण्यासाठी रुमवर परत आले. बराच वेळ आराम केल्यावर अनुराग तिला बोलला.

"मेघना, उद्या आपल्याला परत जायचे आहे. तेव्हा रात्री समुद्रावर फिरायला जाऊ या. आपल्या दोघांच्या मनात जे चालले आहे. ते व्यक्त करू या. तुझ्या सहवासाची ओढ मला शांत बसू देत नाही गं. परत ही संधी कधी मिळेल हे माहिती नाही.

"हो ,चालेल. पण, मोनाला काय सांगणार? काही तरी विचार करून मेघना बोलली. "मी सांगते तिला. तू काळजी करू नकोस."

रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर ते रूमवर‌ यायला निघाले.
"मोना तू पुढे हो आम्ही एक चक्कर मारून येतो आणि हो तुला झोप आली तर दार बंद कर. माझ्या कडे किल्ली आहे दुसरी." मेघना बोलली.

"ओके."असे म्हणत मोना रूमवर गेली. दिवसभर थकल्यामुळे तिला लगेच झोप लागली.

इकडे मेघना आणि अनुराग हातात घालून फिरू लागले. फिरत फिरत ते समुद्रावर आले.

अनुराग, दिवसभर खळखळणाऱ्या लाटा आता किती हळु येत आहे असे वाटते. त्यात फक्त आपण दोघेच.
अनुराग "आय लव्ह यू" असे म्हणत त्याच्या बाहुपाशात विसावली.
वाळूवर स्वतः च्या प्रेमाची अधुरी कहाणी ते उमटवत होते. आज मेघनाला खूप बरे वाटत होते. बराच वेळ त्यांनी एकत्र घालविला. बरीच सामसूम झाली होते. फक्त समुद्राचा आवाज आणि झाडांची सळसळ ऐकायला येत होती. हि नीरव शांतता तिला प्रेमाने स्पर्श करून गेली.

"अनुराग चल परत जाऊ या. बारा वाजत आले आहे आणि आजुबाजुला कोणीही नाही."

"हो चल , जाऊ या."

हातात हात घालून मग ते परत रुमवर यायला निघाले. काही अंतर चालत आल्यावर अचानक तीन चार माणसे त्यांच्या समोर आली. ते दोघेही घाबरले. पण, त्या माणसांनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. अनुरागला मारायला सुरुवात केली. अनुरागला तर त्यांनी बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारले होते.

अनुराग, अनुराग असे म्हणत असतांनाच तिला सुध्दा बेशुद्ध केले गेले आणि गाडीत टाकले आणि गाडी भरधाव वेगाने पुढे गेली.

जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती गंगुबाईच्या कोठ्यात होती. आपण कुठे आहोत याची तिला कल्पना आली. खूप विरोध करूनही ती बाहेर पडू शकली नाही. सतत होणाऱ्या मारहाणीला ती कंटाळली होती. शिवाय पोटाची आग तिला शांत बसू देत नव्हती. नाईलाजाने तिने पायात घुंगरू बांधले.
इकडे अचानक मोनाला जाग आली असता मेघना दिसली नाही आणि अनुरागही. मोना खूप घाबरली. हाॅटेलच्या मालकाच्या मदतीने तिने पोलिस स्टेशनला तक्रार केली. तोपर्यंत सकाळ झाली होती.
सकाळी सकाळी अनुरागही शुध्दीवर आला होता. त्यांच्या डोक्यात बरेच लागले होते. तो कसाबसा चालत पोलिस स्टेशनला आला. तिथे मोना आधीच आलेली होती. अनुरागने त्यांच्या सोबत घडलेली घटना सांगितली.

मेघना सापडते की नाही. पाहुया पुढच्या भागात.


©® अश्विनी मिश्रीकोटकर











🎭 Series Post

View all