घुंगरू (भाग १)

लघुकथा


आशेचा किरण

आजही कोणीतरी येईल आणि आपल्याला आपल्या घरी घेऊन जाईल. या आशेवर ती जगत होती. पण, गेली दहा वर्षं झाली. ना कोणी आलं ,ना साधी चौकशी झाली. एक आशेचा किरण कधीतरी आपल्या आयुष्यात येईल आणि आपण येथून परत फिरू. असे तिला सारखे वाटायचे.

पण, या अशा झगमगाटी दुनियेतून आपल्या जगात जाण्याचा अधिकार खरंच राहिला आहे का? कोणी आपल्याला पुन्हा स्वीकारतील की नाही याची शंका सतत तिच्या मनात यायची.\"

तेवढ्यात मोहिनी , अरे अभी तक तयार हुईं की नहीं । चलो कस्टमर आते ही होंगे। इतने साल गुजर गए फिरभी खिडकीके बाहर झांकती रहती हो।

"हां गंगुबाई अभी आती हूॅ।

मोहिनीने आरशात स्वतःला निरखून बघीतले. लिपीस्टीक नीट केली आणि बाहेर आली.

पिवळ्या रंगाच्या साडीतून तिने घातलेले चमचमते ब्लाऊज आणि त्यातून झळकणारे तिचे सौंदर्य ठळकपणे दिसत होते. ओठांवर लाल चुटुक लिपिस्टीक, केसांमध्ये खूप सारे गजरे आणि पायात घुंगरू बांधून ती तयार होती. प्रत्येक घुंगरू मधून बाहेर पडणारा नाद तिच्या हृदयात घाव करीत होता. खूप हतबल होती. पण, काजळ घातलेले तिच्या डोळ्यांत मादकता दिसत होती.‌

ती तयार होऊन बाहेर आली. तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत एक जण तिच्या समोर येऊन उभा राहिला.

एकमेकांची नजरानजर होताच, साब पहले डान्स देखोगे की और कुछ। असे म्हणत तिने टेबलावर ठेवलेल्या ग्लासात दारू ओतली आणि त्याच्या जवळ आली. जवळ येताच तिचा पदर खाली घसरला. पण, लगेच मुद्दामहून स्वतः चा पदर सावरत उभी राहिली.

"मेघना! तू!"

कौन मेघना साब। मैं तो मोहिनी हूॅ मोहिनी। पैरों में घुंघरू बांध कर , अपने आप को आप जैसे लोगों के हवाले करके अपना पेट भरती हूॅ।

"अगं मेघना मी अनुराग. तुझा क्लासमेट. तू आणि मी आपण एकाच एरियात राहत होतो. मग तरी तू मला ओळखत नाहीस. आपले एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.

अरे,ओ साहाब, तुम यहा किसलिए आए हो। जो काम हैं वो करो नहीं तो मेरे पास और भी कस्टमर है।

" पण, मी तुला ओळखणार नाही. असे होणार नाही."

" हे बघा साहेब तुम्ही तुमचे काम करा आणि परत जा. मी कोण आहे? याच्याशी तुमचा काही एक संबंध नाही."

ती चालत असतांना तिच्या पायातील घुगरूंचा आवाज अविनाशला त्रास दायक ‌वाटत होता.

"अगं, थांब ना. मी काय म्हणतो आहे. ते एकदा तरी ऐक."

"हे बघा , माझ्या जवळ भरपूर गिऱ्हाईक आहे. तुम्ही कोण आहात ? इथे कोठून आलात? याच्याशी मला काही ‌देणेघेणे नाही. नाही तर तुम्ही परत जाऊ शकता.‌"

तिचे बोलणे, चालणे ,तिचे भडक आणि तंग कपड्यात वावरणे. त्याला सहन होत नव्हते.

पण, ती स्वतः हून त्याच्या जवळ गेली. स्वतः च्या मादक सौंदर्याने ती त्याला घायाळ करण्याचा प्रयत्न करू लागली.
ती त्याला घेऊन बैठकीत आली. तिचे पाय थिरकू लागताच पेटी, तबला, ढोलकीवर थाप पडली. घुंगरूचा आवाज सगळीकडे घुमू लागला. सोबतच मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. ती त्याच्या अवतीभवती नाचत त्याच्या बाहुपाशात जाण्याचा प्रयत्न करत होती. पण, त्याने तिला झिडकारले आणि तो फक्त तिला बघू लागला.

"मेघना!

असे म्हणत त्याने पाठ फिरवली आणि तो तेथून बाहेर जाण्यासाठी निघाला.


©® अश्विनी मिश्रीकोटकर









🎭 Series Post

View all