घोस्टने मिला दी जोडी भाग ७

घोस्टने मिला दी जोडी भाग ७
मागील भागात,

आता मात्र रमाला आता त्याची दया यायला लागली. तिने ठरवलं की ह्याला नाव गाव पत्ता फळ फुल विचारून आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करायचं. म्हणून तिने त्याला म्हटलं,

"समजलं ! पण माझ्या प्रश्नाची उत्तर दे मग जा ! नाही खरी उत्तर दिली तर पोलिसांना बोलवून तुझ्यावर आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करेन हा !"

आता पुढे..

रमा भुतिण ओट्यावर बसली आणि त्यालाही  हातने  ओट्यावर बसायचा इशारा केला. त्याने मग थोडसं नाखुशीनेच पल्लवीचं म्हणणं ऐकलं. खरतरं त्याला उगाच हुकुम गाजवणारी आणि  सतत पोलिसांची धमकी देणारी मुलगी नाही आवडली .रमा भुतिणीलाही त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी दिसत होती, पण ती त्याकडे दुर्लक्ष करत तिने पहिला प्रश्न विचारला,

"तुला एवढं सुंदर जीवन संपवायचं का आहे?"

ह्यावर आतापर्यंत आत्महत्या करायचा निर्धार करून बसलेल्या त्यालाच पटकन उत्तर सुचेना. बस्सं नाही सहन होतं हा विचार करून आता जीवन संपवायचं हाच निर्धार फक्त  त्याच्या मनात होता. मग त्याने काही क्षण विचार केला आणि तो बोलायला लागला.

" मी ज्या कंपनीत होतो ती करोनामुळे बंद पडली, लवकर जॉबही मिळेना. तीन महिने भाडं थकलं म्हणून घर मालकाने सामान जप्त करून घराबाहेर बाहेर काढलं. डिपॉझिट पण नाही दिलं..जेणेकरून नवीन घर शोधेन."

रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून जीव मेतकुटीला आला. त्यात  उपाशी आहे दोन दिवसांपासून. त्याआधी अर्धपोटी होतो. आंघोळीचाही पत्ता नाही. मग असं भिकाऱ्यासारखं  गलिच्छ जगत राहण्यापेक्षा डायरेक्ट मरणं सोप वाटलं मला ."

त्याचा गदगदलेला स्वर ऐकून रमा भुतिणाला खुप वाईट वाटलं. इकडे त्यांच बोलणं चोरून ऐकणारा माधवही थोडासा मनातून हेलावला. त्याला आता त्याचीच लाज वाचू लागली की त्याने रमाप्रमाणे खरतर त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करायला हवा होता. त्याएवजी तोच स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला मरायला प्रोत्साहन देत होता.

  रमा भुतिणने मग आपल्या शक्तीने पल्लवीच्या पर्समधलं चॉकलेट काढलं आणि  स्वत:च्या हातात घेत  म्हणाली,

"थांब !मी बघते काही खायला आहे का ? माझ्या ड्रेसमध्ये पॉकेट आहेत त्यात  काहीना काहीतरी असतचं. हा हे घे चॉकलेट. "


त्याने पल्लवीच्या हातातील  चॉकलेटकडे एक नजर टाकली आणि मग  म्हणाला

"मला नको आहे. थँक्स."

ते पाहून पल्लवीचं रूप घेतलेली रमा नाटकीपणे चॉकलेट निरखून बघत त्याच्या नजरेसमोर आणून पटकन हातात लपवलं आणि गोड हसत म्हणाली,

"हा चॉकलेट ब्रँड आवडत नाही का चॉकलेटच आवडत नाही ?"

"नाही !दोन्ही आवडतं..ब्रँन्ड आणि चॉकलेट.."

"मग खा ना ! नाटक नको करूस..खाऊन मेला तर कोणी फासावर नाही लटकवणार...परत..."

रमा भुतिणच्या ह्या ज्योकवर त्यालाही हलकेचं हसू आलचं आणि  माधव भूतही जोराने हसला. माधवच्या हसण्याचा आवाज ऐकून रमाला भुतिणीला जाणवलं की तो आसपास आहे. ती त्या मुलाला म्हणाली,

"हे बघ खाऊन घे. मी येते पाच सात मिनिटात. तिथपर्यंत इथून करायचा प्रयत्न करायचा नाही. माझे कान सशाचे आहेत. समजलं.."

असं म्हणून रमा भुतिण माधव भूत जिकडे लपला होता तिकडे गेली. माधव भुताला मात्र ह्याची जराही कल्पना नव्हती की रमाला तो तिकडे असल्याची जाणीव आहे. तो मस्त किचनच्या खिडकी बाहेरून रमा आणि त्या मुलाला पाहत होता. त्याच्या समोर अचानक रमा भुतिण आली आणि तो तिला पाहून दचकला आणि त्याने विचारलं,

"रमे !तू इकडे का आलीस ?"

"हेच मी तुला विचारतेय..तू इकडे काय करतोय. पल्लवीकडे कोण आहे ?"

"अरे ! ती झोपली आहे ग..एकदम ढाराढुर पंढरपूर."

असं म्हणून माधवने हाताने झोपाल्याचा इशारा केला.ते पाहून रमा भुतिण माधव भुताकडे हाताची घडी घालून तीक्ष्ण नजरेने पाहत त्याला विचारलं,

"माधव, ती उठली आणि तिला आत्महत्या करायचा परत विचार आला तर..तिला कोण अडवणार ?"

ह्यावर माधव खट्याळपणे हसत तिच्या खांद्यावर  दोन्ही हात ठेवत म्हणाला,

"रमा फक्त तुझे नाही तर माझेही कान तिष्ण आहेत ग..आणि मी किचनच्या बाहेर का उभा आहे."

माधवचं बोलणं ऐकून रमाने नाक उडवत म्हटलं ,

"कशाला ? आमचं बोलणं चोरून ऐकायला.."

"अगं माझी राणी..किती ग विसभोळी तू. " असं म्हणताना त्याने रमाचे गाल ओढले आणि परत म्हणाला,

"आठवतं! जेव्हा मी तुला लपूनछपून भेटायचो तेव्हा मी किचनच्या खिडकीच्या झाडासमोर का उभं राहायचो माहीत आहे ?

" कारण किचनमधून मी काम करताना तुझ्याशी पटकन बोलता यायचं आणि आई किंवा वहिनी आली की तुला झाडापाठी लपताही यायचं." रमाने उत्तर दिलं.

"मला फक्त तुझ्या आई व वैनी पासूनही लपता नाही यायचं तर मला हॉलमध्ये बसलेल्या तुझ्या वडीलांवरही माझं लक्ष राहायचं..जसं आता पल्लवीवर आहे. समजलं..!"

"अच्छा! म्हणून तू बोलता बोलता मध्येच लपायचा. मला तेव्हा नाही समजायचं की किचनमध्ये कोणी नसतानाही तू गायब का व्हायचा. अच्छा मी परत जाते त्याच्याकडे मग बोलूया. "

रमा भुतिण हसत म्हणाली. मग तिला काहीतरी आठवलं आणि तिने विचारलं,

"माधव ह्याच नाव काय आहे आणि तो तुला भेटला कसा ?"

"ह्याच नाव भौमिक वैद्य आहे. तुला तर माहीत असेल माझ्या घराचा लिगल मॅटर. आम्ही  आणि अजून एका सेम आडनाव असलेल्या फँमेलिनेही ते घर त्यांच्या मालकी हक्काचे आहे म्हणून क्लेम लावला आहे.

"त्यामुळे ते घर कोणीच वापरत नाही. मी असाच माझ्या फेवरेट पिंपळावर बसलो होतो तर हा तिकडे  जीव द्यायला आला. त्याला असं करताना पाहून मीही घाबरलो ग..अगं रोज किती नवीन आणि डेंजर भुतांपासून मी माझी जागा सेफ ठेवली आहे हे माझं मला माहित. आता मग मीही विचार केला ह्याला अडवायचं.मी वॉचमन रूप घेऊन त्याला अडवलं."

"तर हा पठ्या समुद्रात जीव द्यायला चालला होता. तो तसाही मरणार होताच, मग मी विचार केला की ह्याचा उपयोग तुला मिळवण्यासाठी केला तर..."

मग त्याला हाक मारली आणि त्याचं नाव विचारलं. तो कुठे राहतो हेही आणि मग त्याला म्हणालो,

हे बघ भौमिक, तू समुद्रात उडी मारली तर कोण कोण वाचवेल. त्यापेक्षा तू अमुक घरात जा..तिकडे कोण तुला अडवणार नाही. त्या घरात कसं शिरायचं तेही सांगतो. "

त्यावर त्या हुशार मुलाने मला विचारलं,

"जर मी तिकडे मेलो तर तुमचा काय फायदा होईल ?"

"मग मी सांगितलं की जर तो इकडे मेला तर घरमालकाला त्रास होईल. त्या घरमालकाचं आणि माझं वाकडं आहे. तू मरताना एवढं पुण्याचं काम केलं तर तुझं पुढचा जन्म सुखाचा होईल."

"त्यालाही ते पटलं आणि तो इकडे आला. मला वाटलं तू घरी नसशील आणि मग... पुढचं तर तुला माहीतच आहे. "

"माधव मला ना तुला कुटावसं वाटतयं..तू स्वत:च्या स्वार्थासाठी असा कसा वागू शकतोस.प्लीज आता तरी सुधर ..आणि माझ्यावर फुकट संशय न पल्लवी व भौमिकला आत्महत्या करण्यापासून वाचवायला मदत कर."

रमा भुतिणीने थोडसं चिडक्या स्वरात म्हटल्यावर माधव भुताने ह्या कानापासून त्या कानापर्यंत मान डोलावली. रमा गेल्याचं पाहून सुटकेचा निश्वास टाकणार इतक्यात एका झटक्यात रमा भुतिण परत  तरंगत माधव भूतकडे आली. ते पाहून तो दचकला आणि त्याने डोळ्यानेच तिला विचारलं, आता काय?

त्याला थोडसं घाबरलेलं आणि दचकलेलं पाहून रमाला भुतिणीला माधव भूताची जाम मजा वाटली. तरी ती आपला चिडका स्वर तसाच ठेवून माधवच्या चेहऱ्यावरती ठेवतं म्हणाली,

"आणि आता आमच्यावर पाळत नाही ठेवायची समजलं..एवढा संशयी राहिलास तर मी परत तुझ्याकडे येणार नाही़ आणि भौमिक माझ्या मुलासारखाच आहे समजलं."

हे ऐकून माधव भुतानेने फक्त होकारात मान हलवली आणि मग त्याला जाणवलं की रमा भुतिणीने त्याला होकार दिलाय. जेव्हा त्याला जाणवलं तेव्हा त्याने जोरात "रमा आय लव यू " असं म्हटलं .रमा भुतिणीनेही आपली मान  तीनशे साठ अंश कोनात पुर्ण वर्तुळाकार फिरवुन माधव भुताकडे एक गोड स्मित दिल आणि ती परत भौमिकशी बोलायला स्वयंपाक घरात गेली.


क्रमश:

 कशी रोखणार भुते भौमिक आणि पल्लवीला ? काय होणार आता पुढे ?

ह्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कथेसोबत रहा आणि पुढचा भाग नक्की वाचा.
खरच कथा आवडत असेल तर कमेंट करा.

🎭 Series Post

View all