घोस्टने मिला दी जोडी भाग ६.

घोस्टने मिला दी जोडी भाग ६
मला हा मुलगा माझ्या घराजवळ झाडाला फाशी लावताना दिसला. मग मी त्याला वॉचमन बनुन हटकलं आणि मग ...अस म्हणून माधवने रमाला त्या मुलाबद्दल सांगायला सुरवात केली. मग त्याने सांगायला सुरवात केली.

" रमा तुला तर माहीत आहे. माझं घरही पडीक आहे कारण माझाही भाऊ कॅनेडात सेटल झालाय. तिकडे मीही एकटाच असतो तुझ्यासारखा. "

माधव अजून रमाला काही बोलणार इतक्यात बेडरूमधून कपाट उघाडण्याचा आवाज आला , तशी रमा माधवला म्हणाली,

"माधव तुझा फ्लॅशबॅक नंतर ऐकु या..तो उठला आहे असं वाटतयं. तू पल्लवीकडे बघ. मी त्याला पाहते. "

आता पुढे...

"तू का बघते त्याच्याकडे ?  मी पाहतो त्याला. तू तुझ्या भाचीची काळजी घे.."

माधव भूत काहीश्या मस्तराने (जेलसी) रमाला अडवत म्हणाला. माधवला रमा बद्दल अजूनही प्रेममय मस्तर वाटतो हे पाहून रमा आतल्या आत सुखावली खरी पण तरी माधवची रमाला थोडी भीती वाटत होती. तो परत त्या अनोळखी मुलाला पुन्हा आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त तर करणार नाही ना..

कधीकधी प्रेम आणि एकटेपणा माणसांकडून आयमिन भुतांकडूनही काहीही चुकीचं करवून घेऊ शकत ह्याची जाणीव रमाला झालेली होती.

ती माधवला चुचकारत अगदी प्रेमाने म्हणाली,

"माधवा...घाबरू नकोस.लग्न, प्रेम ह्या भावना चितेवरती टाकल्यावरचं हवेत विरल्या. देह अकाली नष्ट केला म्हणून आयुष्याचे भोग भोगण्यासाठी ह्या योनीत अडकली आहे. "

"मी तुझीच आयडीया वापरून त्याला विचारणार आहे की.."

"त्याला काय विचारायचं, मला सगळं माहीत आहे..मी सांगतो तुला !" माधव पटकन म्हणाला.

"हा ! मग सांग त्याने आत्महत्या करायचा विचार का करतोय ?"

रमाने भुवई उडवत विचारलं तसा माधव एकदम गप्प बसला कारण त्याने नेमकं तेच विचारलं नव्हतं. त्यावर रमा म्हणाली,

"मी पटकन पल्लवीच रूप घेऊन आता जाते आणि बघते की तो कोण आहे, कसा आहे ते. तू तिथपर्यंत ही बया शुद्धीवर आली तर त्या मुलाचं रूप घेऊन हीला बोलण्यात गुंतव."

असं म्हणून रमा भुतिण परत बेडरूममध्ये गेली. रमाने ठरवलं की याला जास्त काही विचार करायचा अवधी द्यायचा नाही. तिने पाहीलं तो नुकताच कपाटातून बाहेर आला होता आणि रमाच्या भूत शक्तीने बेडरूमचे घट्ट लागलेले खिडकी व  बंद दरवाजे उघडून बाहेर जायचा प्रयत्न करत होता. त्याचाच आवाज बाहेर येत होता.

तिने पल्लवीचं रूप घेतलं आणि दरवाजा उघडू न त्याच्या समोर आली. एका अनोळखी मुलीला पाहून तो एकदम दचकचला. त्याच असं दचकणं पाहून रमाला जाम मजा आली. तिने मग हसत त्या मुलाकडे पाहीलं तर तिला त्या मुलाच्या पाठी माधव भूत दिसलं जो पल्लवीला सोडून रमा इकडे नक्की काय करते हे पाहयला आला होता.

"  तू काय करतो आहेस तू इकडे ? जा इथून  बघू "

पल्लवीचं असं चिडून बोलणं ऐकून तो मुलगा दोन पावलं मागं सरकला आणि म्हणाला,

"हो जातो! पण तुम्ही  दरवाजातून बाजूला तर व्हा ना ! "

त्याचं असं बोलणं ऐकून रमा थोडीशी ओशाळली आणि माधव मात्र एवढसं तोंड करून चुपाचापणे उडत बाहेर हॉलमध्ये गेला. रमाने पाठी वळून माधव गेला की नाही हे नक्की केलं मग त्या मुलाकडे परत वळून मग सारवासारव करत म्हटलं.

" तू नाही !  तो उंंदीर ..  हा ! तू पण इकडे काय करतो आहेस ? चोरी करायला आला आहेस ना ?  तू कोठेही जायचं नाही आहे.  थांब !  तुझं नाव पोलिसात देते ,"

"हँ.. पण तुला माझं नावचं माहीत नाही आहे. मी तर चाललो. "

असं म्हणून तो पल्लवीच्या उजव्या बाजूने दरवाज्यातून सटकायचा प्रयत्न करणार इतक्यात रमाने त्याला आपल्या भूत शक्तीने त्याच्या तोलच बिघडवला.
जेणेकरून तो पल्लवी रूपातील रमाच्या शरीराला स्पर्श करणार नाही. जर त्याने तसं केलं असतं तर पल्लवीही भूत असं वाटलं असतं त्याला. तो मग तोल न सावरल्यामुळे बेडरूमच्या आत  उताण पाडला.

रमाला त्यातही त्याची ही गोष्ट आवडली की त्याने तोल सावरायला पल्लवीचा हात नाही पकडला तर बेडरूमच्या दाराची चौकट पकडायचा प्रयत्न केला.ह्याचा अर्थ तो चांगला मुलगा आहे अशी रमाने मनात नोंद केली.
त्या बिचाऱ्याने मात्र मनात विचार केला की तोल सावरताना हिला जर मी हात लावला आणि हिने अजून भलता सलता विचारा केला तर मी जायचो बाराच्या भावात. त्यापेक्षा हीला समजावलं की मी इकडे मरायला आलेलो तर ही मला जाऊ तरी देईल.

पल्लवीने त्याला उठायला हात नाही दिला हे पाहून नाही म्हटलं त्याला पल्लवीचा रागच आला. तो मग जमिनीवर हात ठेवून उठला. पल्लवीच रूप घेतलेल्या रमाने त्याला विचारलं,

"जास्त लागलं तर नाही ना !"

"नाही ! मी ठीक आहे. ( खडूस)"

खडूस शब्द मात्र त्याने मनात उच्चारला. तो नीट ोाहे पाहून रमाने त्याला विचारलं ,

"हं! आता सांग इकडे काय करतो आहेस..?"

"मी ! मी ते ?..."

त्या खरतरं एखाद्या अनोळखी आणि त्याचे मते खडूस मुलीला आपण आत्महत्या करायला आलो आहे हे सांगण फार अवघडल्यासारखं वाटतं होतं. तो काहीच बोलतं नाही हे पाहून त्याला बोलतं करण्यासाठी रमा भुतिणीने पल्लवीच्या  मोबाईलमध्ये फोटो काढला. अचानक तोंडावर पडलेला फ्लॅश पाहून तो  थोडासा दचकला, आणि मग त्याने विचारलं,

"तुम्ही फोटो का काढताय माझा ?"

पोलिसांना देण्यासाठी ? कोणास ठावूक तू कशासाठी आला आहेस ? चोरी करायला ? कुणाला मारून गाडायला..का..? रमाने मुद्दाम वाक्य अर्धवट सोडलं, ज्याने तो घाबरून खरं बोलेल.

"गाडायला..? नाही हो..! मी तर स्वत:च ..?"

"मी तर काय ?" असं म्हणत पल्लवीची अवतार घेतलेल्या रमा भुतिणीने त्याच्यावर ओरडत विचारलं. मग ती बेडरूमधून पटकन किचनमध्ये आली आणि
स्वयंपाकघरामध्ये सगळीकडे सामन आहे का नाही हे पाहायचं नाटक केलं. मग मान वरती करून छताकडे पाहत आश्चर्य व्यक्त केलं आणि त्याला आवाज देत म्हणाली,

"ए हँन्डसम ! इकडे ये ?"

असं म्हणताच तो बेडरूमधून हॉलमध्ये जात होता तो किचनमध्ये वळला. तो स्वयंपाक घरात आल्यावर पल्लवी बनलेल्या रमाने छताकडे बोट दाखवत त्याला दटावत विचारलं,

"हे काय आहे ?"

त्याने वर पाहीलं तर फास लावायचा दोरखंड आणि तो फास छताला टंगून होते. हे पाहून तो गोधंळला कारण तो तर फास बांधून दमला होता म्हणून त्याने दोरीही काढून तिकडेच ओट्यावर ठेवलेली होती. आता तो फास आणि तो दोरखंड हवेत झुलत त्याला वाकुल्या दाखवत होते.
तो फक्त एवढं म्हणाला,

"दोरखंड !"

"हो !मला माहीत आहे हा दोरखंड पण हा इकडे का आहे ? तू आणलास ना तो ? आणि का आणलास..?"

तो मुलगा पल्लवीच रूप घेतलेल्या रमाला काही उत्तर देणार इतक्यात रमा पल्लवीची एक्टिंग करत म्हणाली,

" ओह माय गॉड! समजलं मला .. तू .." एवढं बोलून रमा भुतिणीने दोरखंडाकडे पाहायचं नाटक केलं आणि त्याला काहीतरी निष्कर्ष काढल्याचा चेहरा बनवून त्याच्याकडे चकीत नजरेने पाहत म्हणाली,

"सुसाईड.. तू माझ्या घरात सुसाईड करणार होतास ? "


"हो ! करणार होतो मी आत्महत्या पण आता नाही करत. मी दुसरीकडे जाऊन मरतो. सॉरी ! मला कोणीतरी सांगितलं होतं की ह्या घरात कोणी राहत नाही. मी आरामात मरू शकतो, म्हणून आलो होतो."


आधीच पल्लवीच्या अवतारातील रमा भुतिणीच्या दादागिरी व वैतागून तो चढ्या आवाजात पल्लवीच्या अवतारातील रमावर ओरडला आणि ओट्यावर चढून
छतावरचा दोरखंड काढू लागला. आता मात्र रमाला आता त्याची दया यायला लागली. तिने ठरवलं की ह्याला नाव गाव पत्ता फळ फुल विचारून आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करायचं. म्हणून तिने त्याला म्हटलं,

"समजलं ! पण माझ्या प्रश्नाची उत्तर दे मग जा ! नाही खरी उत्तर दिली तर पोलिसांना बोलवून तुझ्यावर आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करेन हा !"

क्रमश:

का करणार होता तो सुसाईड आणि रमा त्याचही मन बदलवू शकेल का ? का तो दुसरीकडे जाऊन आत्महत्या करणार ? काय होणार आता पुढे ?

ह्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कथेसोबत रहा आणि पुढचा भाग नक्की वाचा.
खरच कथा आवडत असेल तर कमेंट करा.


🎭 Series Post

View all