घोस्टने मिला दी जोडी भाग ५

घोस्टने मिला दी जोडी भाग ५
मागील भागात,

हे ऐकून माधवही वरमला .आज पहिल्यांदाच पल्लवी व त्या मुलामुळे रमा वीस वर्षानी त्याच्यासमोर उभी राहून शांतपणे बोलत होती.

"रमा मला माफ कर . खरतर लग्नात हुंडा ही गोष्ट आपल्यावेळी एवढी सामान्य होती की आई बाबांनी  जेव्हा मागितला तेव्हा मला काहीच वाटलं नव्हतं..पण भर मांडवात त्यांनी जेव्हा तुम्हाला लुटायचा प्रयत्न केला तेव्हा मी विरोध करायचा प्रयत्न केला रमा पण..मला सगळ्या नातेवाईकांनी गप्प बसवलं."

" शब्दाला शब्द वाढला आणि लग्न मोडलं. रमा मी भ्याड होतो गं. मला ती हिमंतच झाली नाही की त्यांना झिडकारून तुझा हात धरावा. लहानपणापासून आई वडिलांच्या धाकात वावरलेल्या मला हे करणं सुचलचं नाही आणि मला ते जेव्हा मांडवातून खेचून नेत होते  ना रमा तेव्हा खरं सांगतो..मी सुन्न झालो होतो.आपलं लग्न मोडतयं ह्यावर विश्वासच नव्हता."

"रमा मला माफ करशील का आतातरी ?" माधव भुताने डबलेल्या डोळ्यांनी  रमाचा हात पकडत विचारलं, इतक्यात रमाला बेडरूमच्या आतून कपाट उघाडायचा आवाज आला.

आता पुढे...
 
तो आवाज ऐकून रमा माधवचा हात सोडवतं म्हणाली,

"तो मुलगा उठला असेल. मी बघून येते."

नाही रमा थांब ! तुलाही माहिती आहे आणि मलाही ही फक्त वाऱ्याची झुळूक होती. ज्याने रिकाम्या बेडरूमचं कपाट वाजलं असेल. "

तरीही रमा भुतिण माधवला टाळून बेडरूमच्या आवाजाकडेच लक्ष देऊ लागली. ते पाहून माधव भुताने चिडून रमा भुतिणीला आपल्या जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात पाहतं म्हणाला,

"रमे !आय लव यू..जेव्हा तू आत्महत्या केल्याच कळलं ना तुला माहीत आहे मी काय केलं ?"

माधवचं अचानक असं तिला पहिल्या सारखं हक्क गाजवणं आवडलं. कितीतरी वर्ष ती रागवून धुसफूसुन त्याला  झिडकारत होती. तिने वीस वर्षापुर्वी जरी आत्महत्या केली असली तरी माधव मात्र तिच्या भूत आयुष्यात गेल्या दहा वर्षापासूनच डोकावत होता.

ती मेल्यावर तिने रागाने माधवच्या परिवारास त्रास देण्यासाठी घराबाहेर पडली ,पण तिला मात्र घराचं कुंपण पार करताच येईना. तिची आत्महत्या आणि तिचं लग्न मोडल्यामुळे झालेली बदनामी यामुळे तिची आई हाय खाऊन मेली.

  तिच्या भावानेही हे घर सोडून पुण्यात बदली घेतली. तेव्हापासून ती एकटीच ह्या घरात वावरत होती. रागाने मग तिने हे घर कधी कोणाला विकू दिलं नाही का भाड्यावर राहू दिलं नाही. त्यामुळे तिच्या भावानेही घराचा नाद सोडला. मग अचानक दहा वर्षानी माधव भूत म्हणून तिच्यासमोर आला.

माधववरचं प्रेम आता तिच्या रागात रूपांतरीत झालं होतं म्हणून आजपर्यंत ती माधव पासून लांबच राहीली.आताही तिनेच तिच्या शक्तीने कपटाचा दरवाजा उघडल्याचा आवाज केला होता. ही युक्ती माधवने ओळखली की रमा त्याला टाळत आहे म्हणून त्याने आज काही झालं तरी तिच्याशी बोलायचं ठरवलंच होतं.

रमाला मनात असूनही माधवचे हात आपल्या दंडावरून काढवेना. कुठेतरी तिला माधवच्या आवाजात पहिल्यांदाच वेदना जाणवली होती. मग ती म्हणाली,

"माधव काय केलं असणार ? थोडीशी हळहळ व्यक्त केली असणार. अजून काय ? "

"रमा! मी शिक्षा दिली. "

रमाने ह्यावर प्रश्नांअर्थी नजरेने माधवकडे पाहिलं.

"तुझी बातमी आली आणि मी माझ्या आई ,वडिल ,बहिण ,लहान भाऊ यांच्याशी बोलणचं टाकलं. कर्ता सावरता मुलगा, असा मुली पायी विरक्त झाला म्हणून खुप रडायची. देव दोरे केले. माझ्या हाता पाया पडली, पण मी बधलो नाही. लग्नाला परत उभाच राहीलो नाही. तुझा अपराधी आहे ही बोचणी सतत असायची."

एवढं बोलल्यावर माधवचा गळा एकदम दाटून आला. त्यानेही खरचं स्वत:ला त्रास करून घेतलाय हे पाहून रमा वरमली. ती माधवच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली,

"माधव जाऊ दे.."

माधवने त्याच्या तोंडावरता रमाचा हात अलगद काढला आणि म्हणाला,

"रमा बोलू दे..मी आईला फार मोठी शिक्षा दिली गं. खरतर तिचा तसा दोष नव्हता.अवाजवी हुंडा मागणार्या माझ्या लोभी बापाला फक्त तिने साथ दिली कारण..."

हे बोलून माधवने अंवढा गिळला आणि परत बोलायला लागला,

"कारण ,आर्य परंपरेत स्त्रीने कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याचं ऐकायलाचं हव ना.. मी हळूहळू डिप्रेशनमध्ये गेलो आणि मग ठार वेडा झालो.  मग असाच वेड्याच्या  भरात घरातून पळालो आणि गाडीखाली येऊन मेलो."

" माझ्या भावडांना आणि  वडीलांना माझ्याशी कसलही सोयर सुतक राहीलं नव्हतं. त्यांनी सुटकेचा निश्वासच सोडला. तसेच त्यांनी लहान भावाच्या लग्नात स्वत:चा स्वार्थ साधला... पण आई !  ती मात्र  माझ्सासाठी तळमळत राहीली ,रडत राहीली.  मी जीवंत असेपर्यंत मी बरा व्हावा म्हणून हजारवेळा तरी तिने तुझी माफी मागितली असेन. "

एवढं बोलून माधव शांत झाला. रमा माझं एकच ऐकशील..?"

"हं! " कमाने फक्त हुंकार दिला. माधवला आता रमाने पुर्ण मनाने माफ केलं होतं. त्याची वाताहात ऐकून तिलाही वाईट वाटत होतं. तिने ठरवलं की माधवला बरं वाटेल असं करावं लागलं तर करायचं, भले ते तिच्या मनाविरुद्ध का असेना. तिचा होकार पाहून माधवला बरं वाटलं , तो म्हणाला,

"माझ्या आईला माफ करशील ? आणि मलाही !"

रमाने मान हलवून होकार दिला. तसा माधवचा धीर चेपला. त्याने एक गुडघ्यावर बसत लग्नासाठी मागणी घालायची पोजीशन घेतली आणि म्हणाला,

"रमा माझ्याशी लग्न करशील ? तुझी माफी आणि लग्न हेच माझं स्वप्न होतं."

हे ऐकून रमा लाजली, पण तिला काहीतरी
लक्षात आल्यासारखं तिने लाजेने खाली घातलेली  आपली मान झटक्यात वरती केली आणि माधवचा हात झटकून चिडत म्हणाली,

"आता मला समजली तुझी खोडी, लबाड माणसा ! "

"म्हणजे ? " माधव गडबडून म्हणाला,

"हेच कि त्या मुलाने इकडे आत्महत्या करावी आणि भूत बनून माझ्या घरावर कब्जा करावा आणि मी बेघर झाली की तुला शरण येऊन तुझ्या त्या गलिच्छ घरात यावं .. हो ना  माधव!  तुला हे ही माहित होतं की मी आज माझ्या श्रद्धाला इकडे नसते म्हणूनच तू त्याला इकडे यायला सांगितलं ना ?"

रमाने तर माधवच्या करणीचा कच्चा चिठ्ठाच उघडला तरी हार मानेल तो माधव कसला ? त्यानेच रमाला उलट विचारलं,

" एक वेळ मान्य केलं की मी असेल त्याला पाठवलं तरी तू त्याला मरू थोडी देणार होतीस ? उगाच कशालाही काहीही जोडतेस."

"माधव आज तिथी काय आहे ?"  रमा भुतिणीने माधव भूताच्याच्या डोळ्यात डोळे घालत विचारलं.

माधवने नजर चोरत चाचरत उत्तर दिलं, "कदाचित श्रावण शुक्लपक्ष द्वितीया."

"नाही यावेळी अधिक महिना आहे. " रमाने माधवकडे नजर रोखत म्हटलं.

"तरीच तू आज इकडे आहेस. नाहीतर तू  यावेळी तुझ्या तिथीला पुण्यात असते ना  तुझ्या भावाकडे. हे पंचागच भूत कॅलेंडर का नाही बनवत कोण भूत. ..श्या !"

माधव ने आपली हळहळ व्यक्त केली आणि खांदे उडवले. त्याला समजलं की रमाला समजलं आहेच तर लपवाछपवी करण्यात काही अर्थ नाही. तो मग म्हणाला,

मला हा मुलगा माझ्या घराजवळ झाडाला फाशी लावताना दिसला. मग मी त्याला वॉचमन बनुन हटकलं आणि मग ...अस म्हणून माधवने रमाला त्या मुला बद्दल सांगायला सुरवात केली.

तो म्हणाला,

" रमा तुला तर माहीत आहे. माझं घरही पडीक आहे कारण माझाही भाऊ कॅनेडात सेटल झालाय. तिकडे मीही एकटाच असतो तुझ्यासारखा. "

माधव अजून रमाला काही बोलणार इतक्यात बेडरूमधून कपाट उघाडण्याचा आवाज आला , तशी रमा माधवला म्हणाली,

"माधव तुझा फ्लॅशबॅक नंतर ऐकु या..तो उठला आहे असं वाटतयं. तू पल्लवीकडे बघ. मी त्याला पाहते. "



क्रमश:

काय होणार आता पुढे ?
बेशुद्ध माणसा बरोबर आता पल्लवीचही काय करणार रमा माधव.हे जाणून घेण्यासाठी कथेसोबत रहा.


खरच कथा आवडत असेल तर कमेंट करा. पुढचा भाग तीन दिवसांनी येईल.

🎭 Series Post

View all