भुताचे जंगल भाग ५

भुताचे जंगल

भुताच जंगल ... भाग ५.... अंतिम....  

                                                  " मग मालती कशी वाटली स्टोरी ? " 
अस म्हणतच सुहासने मालतीकडे पाहील , पण त्या सीटवर आता कोणीही नव्हत! 
" मालती , ?" 
एक -दोन वेळा पुढच्या  मिररमध्ये पाठिमागे पाहत सुद्धा  सुहासने हाक दिली पण व्यर्थ,शेवटी सुहासने आपली चार चाकी कार रस्त्याच्या आडबाजूला थांबवली ,व कारचा दरवाजा उघडून तो बाहेर आला .पुर्ण जंगलात अंधार पसरला होता . भुताच्या जंगलात सुहास एकटाच त्या रस्त्यावर  उभा राहुन मालतीला हाका देत होता ,
                                                                                 " मालती ? यार बस झाल ना आता , हे बघ मला भिती वाटतीये हा! तू . प्लीज ..बाहेर येणा.....!  किती ही मस्करी  पुरे आता  चल पाहु घरची वाट पाहत असतील ? " 
                                                      सुहास आता रडकुंडीला आलेला ,पुर्ण रस्त्यावर त्याच्या शिवाय कोणीही नव्हत ,दुर-दुर पर्यंत स्मशान शांतता पसरली होती ,  त्यातच हे जंगल विचीत्र अशा कारणाने बदनाम होत, आता सुहासच्या मनात तेच विचार येत-जाऊ लागले , त्यातच तो लहान मुला सारखा रडू लागला . 
                                        " मालती ? मला भिती वाटतीये! चल ना ग....! आहा,आह,आहा, मालती..., ?   ये.....मालती ?" 
हूंदके देतच सुहास  मालतीला ओरडून हाका मारत होता.रस्त्याच्या आडबाजुला असलेल्या एका झाडावर बसलेला तो घुबड, मगाचपासून हे दृश्य एखाद्या चित्रपट पाहणा-या प्रेक्षकाप्रमाणे पाहत होता.
की तोच सुहासला एक आवाज येतो , 
" सु.....हा...... स.... " 
हा आवाज खुपच लहान व अशक्त असा होता, तरीसुद्धा सुहासने आपले कान टवकारले व पुन्हा तो आवाज आला.
" सु....हा......स...."  हिहिहि ,हिहिहिही ,खिखिखी 
ह्या आवाजा सोबतच एक हसू सुद्धा  बोनस म्हनुन आल होत ,मृत्यूच बोनस , 
जे सुहास ऐकू शकला नाही! 
                                                       " मालती...!कुठे आहेस  तू ? हे बघ पुरे  हा आता तुझा मस्तीपणा चल पाहु उशिर होतोय आपल्याला? घरची वाट पाहत असतील? " 
सुहासला वाटल की तो आवाज आपल्या प्रिय पत्नीचा आहे, आपल्या मालूचा आहे , पण सुहास एक गोष्ट विसरला तो म्हणजे त्या आवाजाच प्रकार एक सामान्य मणुष्याचा आवाज तो बिल्कुल नव्हता  एक खोट, नकली आवाज होत ते 
ज्यातला फरक तो सुहास प्रेमापोटी समजू शकला...नाही! 
" सु..हा... स... ! ? मी  ईथे आहे ?      झाडा मागे !   ये पाहु  इकडे  !  
हिहिही,हिहिही, ये ये सुहास लवकर ये.... हिहिही, याव ,याव ,याव " 
आतिशय भयानक असा आवाज होता तो , परंतु सुहास तर संमोहित झाला होता ना...त्याला..त्या आवाजातला .फरक कसा कळणार मित्रानो ....ज्या दिशेहून आवाज येत होता त्या   दिशेने हलके-हलके पाऊल टाकत सुहास निघाला. आपण काय करतोय , कुठे जातोय ह्या बदल त्याला काहीच ठावूक नव्हत ! काही वेळ असच काट्या कूट्यातुन चालत जात तो एका मोठ्या वडाच्या झाडाखाली आला!   वडाच्या झाडाखाली  त्याला मालती
पाठमोरी ऊभी दिसली. तिच्या चारी बाजुने  अनैसर्गिक धुक पसरल होत ,
" मालती ? अगं   इथे काय करतेस ,  चल पाहु... उशिर होतोय आपल्याला  !?" 
सुहास पाठमो-या उभ्या मालतीला म्हणाला .पण तीच प्रतिउत्तर काही केल्या आल नाही!  तस तो पुढे सरसावळा व  सुहास ने आपला हात वाढवत मालतीच्या खांद्यावर ठेवला!  व लगेच एक झटका बसाव तस काढून सुद्धा  घेतला,का तर तिच शरीर एखाद्या मेलेल्या जिव नसलेल्या प्रेता सारख थंड पडल होत.  
" मालती "  तु.... तुझ शरीर इतक थंड का पडलय "? " 
                                                                                  सुहासची बोबडीच वळली होती,घाबरतच एका बोबड्या मणुष्या सारखा तो  उच्चार करत म्हणाला.त्याच्या ह्या वाक्यावर पाठमो-या मालतीने हलकेच आपला एक हात त्या वडाच्या झाडावर केला. जणू ती वर पाहण्यास खुणावत होती.!  तस हळुच सुहासने एकवेळ मालती कडे पाहिल व त्याने वडाच्या दिशेने वर  पाहण्यास सुरुवात केली.! 
                                                                               जस सुहास वर बघतो त्या क्षणी त्याला एक जीवघेणा हादरा....बसतो . भीतिने बोबडी वळली जाते , हात पाय जागीच गोठले जातात, मेंदू बधिर होतो , डोळे खोबणीतून बाहेर येतील इतके मोठे होतात, वर झाडाच्या फांदीवर मालतीच प्रेत फास लावून लटकलेल असत ,डोळे मोठे वटारलेले,जिभ बाहेर आलेली , एकटक ते निर्जीव प्रेत सुहास कडेच पाहत असत, की तोच  अचानक सुहासच्या मनात भीतिने गोळा येत  जस सुहास पुढे त्या आकृती कडे पाहतो त्या क्षणी ती अभद्र आकृती सुहासकडे पाहत  त्यांच्या अंगावर एक काळ  झडप घेते ............ .... उरते ती....फक्त...... .सुहास ची......शेवटची..रहस्यमय .किंकाळी......
आ....आ.....आ.....आ......!   

: समाप्त:

मग येताय ना...
अमावास्याला 
भुताच्या ....जंगलात  
हिहिहिही, हिहिही
नक्की या बर का..
तो वाट पाहतोय.... 

नव्या सावजाची .....

🎭 Series Post

View all