घे भरारी... भाग 9

Dusrya divshi pari gunvan kade aali

घे भरारी भाग 9


आधीच्या भागात पाहिले की,

गुणवानच्या हाताला दुखापत झालेली तरी तो जिद्दीने क्रिकेट खेळला आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला...

गुणवान आणि त्याच्या घरचे खूप खूश होते, खूप आनंदात होते.. गुणवान क्रिकेट सोबत पेंटिंग पण करायचा.. एकदा बाजूच्या काकूंना त्याची पेंटिंग खूप आवडली म्हणून त्यांनी त्याला विचारलं कि माझ्या परीला पेंटीग शिकवशील का तर गुणवाननी होकार दिला आणि फिस बद्दल विचारले तर त्यानी म्हटलं की नाही मी असाच शिकविल फिस वगैरे काही घेणार नाही..

हे सगळं स्मिता बघत होती आपला मुलगा इतका मोठा झालाय, त्याचा तिला अभिमान वाटला...


 आता पुढे,

 दुसऱ्या दिवशी परी गुणवानकडे आली, गुणवान परीला
“ हाय परी..”
“ हाय दादा..”
 परी सात वर्षाची मुलगी गुणवानच्या बाजूला राहायची, अगदी गोड होती,गुणवान खूप लाड करायचा परीचे.....

“ काय काय आणलस परी?.”
“ ड्रॉइंग बुक आणि कलर्स...”
“ओके, चल मी तुला शिकवतो...”
दोघेही हॉल मध्ये बसले असता स्मिता आली,

“ काय काय शिकवलं आज परीला...”
 “ आज बेसिक शिकवलं आणि तिला थोडं खायला दिलं....”
“अरे वा..छान”

 संध्याकाळ झाली आणि परी तिच्या घरी गेली, गुणवान त्याच्या रूममध्ये पेंटिंग करत असताना स्मिता तिथे आली..
“ आई ये ना...”
 स्मिता त्याच्या चेहऱ्याकडे फक्त बघत होती...
“ आई असं काय बघतेस...”

“ बघू दे रे, बघते की माझा बाळ.. माझा गुणी बाळ किती मोठा झाला?.. क्लास घ्यायला लागला आता काय बाबा गुणवानची कमाई व्हायला लागेल....”

“ आई तू माझी मस्करी करतेस?..”
“ नाही रे बाळा, मला तुझा खरच अभिमान वाटतो तू तुझ्या मेहनतीने  सगळं काही करतोयस , खूप खूप मोठा होशील याची मला खात्री आहे आणि तू खूप मोठा पेंटर आणि क्रिकेटर होशील...”

“ आई मी कितीही मोठा झालो ना तरी तुझ्यासाठी नेहमी लहानच असेल आणि मी मोठा कसा होणार... मी फक्त इतरांसाठी मोठा आहे, तुझ्यासाठी नाही.. तुझ्या साठी मी तुझा गुणी बाळच आहे...”

 “हो रे माझ्या राजा” म्हणत स्मिताने त्याला कुरवाळलं....
 गुणवान रोज छोट्या-मोठ्या पेंटिंग करायचा, सकाळी आणि संध्याकाळी ग्राउंडवर क्रिकेट मॅच आणि दिवसभर पेंटिंग हेच त्याचं दररोज रुटीन झालं होतं...


 स्मिता त्याच्या पेंटिंगचे फोटो काढून मोबाईल वर अपलोड करायची.. त्यातूनही गुणवानवर कौतुकाचा वर्षाव व्हायचा... आता शंभरावर जास्त गुणवानच्या पेंटिंग तयार झाल्या होत्या... स्मिता आणि केशवने त्याच्या पेंटिंगच एक्झिबिशन करायचं ठरवलं... तसं त्यांनी हॉल बुक करून अनाउन्समेंट केली आणि ठरलेल्या तारखेवर गुणवानच्या पेंटिंगच एक्जीबिशन लावण्यात आलं....

 एक्जीबिशनला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्याची पेंटिंग चांगल्या किमतीत खरेदी केली गेली, काही लोकांनी त्याला पेंटिंग साठी ऑर्डर सुद्धा दिल्या...

 गुणवानची प्रगती व्हायला लागली, त्याची सगळीकडे चर्चा व्हायला लागली..गुणवानच्या शाळेतले शिक्षकही अवाक् झाले, गुणवान असं काही करू शकतो त्यांचा विश्वास बसेना पण सगळ्यांनी गुणवानच खूप कौतुक केलं.... जे त्याला टोमणे मारायचे, ज्यांनी त्याला नाही नाही ते बोलले त्या लोकांनी सुद्धा खूप कौतुक केलं... आता गुणवानचा पेंटिंग वर जम बसला होता, त्याच्या पेंटिंग सर्वत्र पसरल्या होत्या.. गुणवान आनंदी होता, याच्यातून त्याचा नवीन बिझनेस सुरु होणार होता...

 हे सगळं सुरू असताना गुणवान क्रिकेटला विसरला नाही, त्याचं क्रिकेट खेळणं सुरू होतं, क्रिकेटमध्ये बॉलिंग करताना थोडा फार त्रास व्हायचा पण तरी तो सहन करत त्यानी तिथेही जम बसवला...


 आता हळूहळू तो छोट्या छोट्या मुलांना पण क्रिकेट खेळायला शिकवायला लागला... सकाळी ग्राउंड वर मुलांना शिकवायचा दुपारी पेंटिंग क्लास आणि संध्याकाळी पुन्हा क्रिकेट शिकवायला ग्राउंड वर जायचा...

 गुणवानचा आता खूप बिझी शेड्युल सुरू झाला पण म्हणतात ना सगळं काही छान होत असताना काहीतरी विचित्र हे घडतच...


 तसच गुणवानच्या आयुष्यात झालं, गुणवानचा छोटासा एक्सीडेंट झाला आणि त्या एक्सीडेंट मध्ये गुणवानचा पाय फ्रॅक्चर झाला...


गुणवान आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि जेव्हा घरी आला तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती...
“ गुणी बाळा.. असा निराश होऊ नकोस सगळं व्यवस्थित होईल, देव तुझी परीक्षा पाहतोय असच समज आणि या परीक्षेत पास होऊन दाखव, नशीब आपल्याशी असाच खेळ खेळतोय रे कधी सुखाचे दिवस तर कधी दुःखाचे दिवस येतात.. हेही दिवस जातील तू निराश होऊ नकोस हरुन जाऊ नकोस, हिम्मत ठेव हे ही दिवस जातील....”


  असं म्हणतं स्मिताने गुणवानला धीर दिला...

 डॉक्टरांनी पूर्ण सहा महिने आराम करायला सांगितला होता, या सहा महिन्यात स्मिताने दिवस-रात्र एक करून त्याची काळजी घेतली पण सहा महिने गुणवान स्वस्त बसणार नव्हता..... महिन्याभरातच त्यानी बसल्याबसल्या पेंटिंग क्लासेस सुरू केले आणि पूर्ण सहा महिन्यानंतर क्रिकेट खेळायला सुरुवात केली....

 आता सर्व पूर्ववत झालं पण हे सगळं सुरू असताना ही गुणवनला समाधान वाटत नव्हतं.. आपल्या हातून काहीतरी सुटतंय आपण काहीतरी चुकतोय काहीतरी करण्यात कमी पडतोय असं त्याला वारंवार भासत होतं... पेंटिंग, क्रिकेट  सगळं सुरू असतानाही त्याला समाधान मिळत नव्हतं...

 एक दिवस तो संस्थेत गेला, तिथल्या मुलांशी दिवसभर खेळला, त्यांच्या सोबत राहिला, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याशी बोलला आणि संध्याकाळी घरी आल्यावर त्याच्या मनात विचार आला आपण हे जे नॉर्मल मुलांसाठी करतोय हे जर संस्थेतल्या मुलांसाठी केले तर त्यांनाही कुठून तरी फायदा होईल त्यांनाही काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होईल हा विचार त्याच्या मनात आला आणि त्यानी संस्थेत जाऊन पेंटिंगचे क्लास घेण्याचं ठरवलं.....


 तिथल्या मुलांसोबत दिवसाचे दोन तास घालवून गुणवानला खुप समाधान मिळत होतं... त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता...


स्मिताच्या लक्षात आल आणि तिने त्याला दाद दिली, ती पण त्याच्यासोबत संस्थेत जायला लागली, संस्थेत सगळे खूष होते की गुणवान स्वतःच्या बळावर इतकं सगळं करतोय हे बघून त्यांनाही खूप आनंद झालाय.... 

गुणवाननी शिक्षणात करिअर नाही केलं तरी त्यानी त्याच्या कलेतून करियर केलं,तो त्यात निपुण आहे... तो स्वतः शिकला आणि आता दुसऱ्यांनाही शिकवतोय, ही गोष्ट बाकीच्या लोकांसाठी जरी नॉर्मल असली तरी गुणवान सारख्या मुलासाठी खूप महत्त्वाचं आहे ,आता गुणवान स्वतःला  ऍबनॉर्मल समजतच नाही, स्वतःला मतिमंद समजत नाही, नॉर्मल लोकं पेंटिंग करू शकत नाहीत असा पेंटिंग गुणवान करतोय, त्याच्या पेंटिंगला तोड ... गुणवाननी आता संस्थेतच काम करायचं ठरवलं, आपण मुलांना शिकवायचं इथेच नोकरी करायची इथेच राहायचं असा त्यानी मनात निश्चय केला आणि त्यानी घरच्यांना सांगितलं घरच्यांनी त्याला सपोर्ट केला......

 गुणवान आणि स्मिता संस्थेत जायच्या...तिथल्या मुलांना शिकवणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे हे सगळं त्याला खूप आवडायचं, त्याला आनंद मिळत होता... बाहेर राहून तो पैसे कमवू शकला असता पण त्या हजारो रुपयांपेक्षा त्याला संस्थेत जो आनंद मिळतोय तो मिळाला नसता... तो आनंद त्याला त्या संस्थेतच मिळतोय....


गुणवान संस्थेत काम करतो याबद्दलही नातेवाइक आणि शेजारचे त्याला बोलले,

स्मिताला बोलले
“ तुझा मुलगा आधीच असा आहे, आता कुठे त्याला पैसे मिळायला लागले आता कुठे तो कमवायला लागला..आणि आता हे सगळं सोडून त्या संस्थेत फुकटात काम करतोय, तिथे आयुष्य घालवणार आहे का?. तुम्ही दोघ आहात तोपर्यंत ठीक आहे, पण समोर जाऊन तो काय करेल? कुठून पैसा येईल...”
 अस बरंच स्मिताला ऐकायला लागलं...


पण गुणवानच ठरलेलं होतं आपण स्वतःसाठी नाही तर त्या मुलांसाठी जगायचं हा त्याचा निर्णय ठाम होता आणि स्मिता आणि केशव निर्णयाचा आदर केला...


 क्रमश:


ही कथा फ्री आहे, सबस्क्रिपशन लागणार नाही

🎭 Series Post

View all