घे भरारी... भाग 8

Gunvanchya manat criket khelnyachi ichha balavat geli

घे भरारी भाग 8


 आधीच्या भागात आपण पाहिले की,


 गुणवान मुलांसोबत क्रिकेट खेळायला गेला तर मुलांनी त्याची चेष्टा करून त्यालाच बॉल मारला, गुणवान नर्वस होऊन घरी गेला, स्मिताच्या लक्षात आलं आणि स्मिता खाली त्या मुलांना जाऊन बोलली.. त्यांनी बोलण मनावर घेतलं, मुलांना त्यांची चूक कळली आणि मुलं गुणवानची माफी मागायला त्याच्या घरी गेले...
 गुणवाननी त्यांना माफ केलं आणि मुलांसोबत खेळायला तयार झाला....
 आता पुढे,


गुणवानच्या मनात क्रिकेट खेळण्याची इच्छा बळावत गेली, आणि तो छान प्रकारे क्रिकेट खेळायला लागला.. खूप छान जमायचं म्हणून त्याला बॉलिंग करायला दिलं जायचं...

 गुणवानची प्रगती बघता कोचने त्याला त्यांच्या टीम मध्ये घेतलं... एकदा क्रिकेटच्या सामन्यांमध्ये यांच्या टीमची निवड झाली आणि हे लोक बाहेरगावी क्रिकेट खेळायला जाणार होते....

 गुणवानला अस एकट नेणं त्यांना पटलं नाही म्हणून ते गुणवानच्या घरी गेले,

“ काकू येऊ का?...”
“या मुलांनो.. आज कसं काय केलं?..”
 “काकू आमची क्रिकेटची मॅच बाहेरगावी खेळायला चालली आहे, गुणवानला पण यायचं होतं पण तो एकटा कसा येणार? त्याच्या सोबत कुणीतरी हवं ना मग काकू तुम्ही येणार का सोबत आम्ही तसं सरांशी बोलून घेऊ कारण तिथे दोन दिवस तरी राहावे लागेल....”

“ हो हो चालेल.. मी येते, तुम्ही बोला तुमच्या सरांशी...

स्मिता गुणवानच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहायची.. तो जिथे जिथे जायचा तिथे त्याच्यासोबत जायची... स्मिता त्यांच्यासोबत गेली आणि सगळे खुप मस्त खेळले, ती टीम जिंकली.. त्या जिंकण्याचा आनंद गुणवानच्या चेहऱ्यावर झळकत होता , त्या दिवशी तो खूप जास्त आनंदी होता....

 आता त्याला असं वाटलं की आता आपण क्रिकेट खेळावं.. क्रिकेटची धुंदीत चढली होती त्याला, आता अगदी छान बॉलिंग करायला लागला होता...

 सगळे खुश होते त्याच्यावर, बघता बघता गुणवान मोठा झाला... त्याचा विसावा वाढदिवस स्मिता आणि केशवनी खूप थाटामाटात साजरा केला, वाढदिवसाला स्मिता आणि केशवनी संस्थेच्या संस्थापिकेला बोलावले होते, त्यांनी पण गुणवानच  खूप कौतुक केलं, गुणवान छान खेळतो आणि पेंटिंगही करतो असं म्हणून त्यांनी गुणवानच खुप कौतुक केलं... बोलता बोलता स्मिताजवळ बोलल्या,
“ एक बोलू का?..”


“ हो, बोला ना मॅडम..”


“गुणवानला चित्रकला आणि क्रिकेट या दोन्ही मध्ये खूप जास्त रस आहे, त्याच्या त्याच कलेवर तुम्ही भर द्या, तो इतरत्र नाही शिकला तरी चालेल पण त्याला ज्या गोष्टीत रस आहे तुम्ही त्याला ते करू द्या... त्याच्या करिअरची चिंता करू नका तो त्याच्या कलेमध्ये देखील उत्तम करियर करू शकतो त्याच्यात ती कॅपाबिलिटी आहे.. त्यामुळे त्याला खेळण्यापासून आणि पेंटिंग पासून लांब करू नका....”

“ हो मॅडम तुमचं बोलणं मी लक्षात ठेवेल.. थँक्यू मॅडम..”
  वाढदिवस साजरा झाला सगळे आपापल्या घरी निघून गेले..
 दुसऱ्या दिवशी सकाळी गुणवान उठून छान तयार करा आणि क्रिकेट खेळायला म्हणून बाजूच्या ग्राउंड मध्ये गेला, बॉलिंग करता करता त्याच्या खांद्याच्या जॉईन मध्ये अचानक दुखापत झाली, तो विव्हळत घरी आला.. आईला सगळं सांगितलं, आईने लगेच त्याला दवाखान्यात नेलं..


डॉक्टरांनी चेक करून एक्स-रे काढायला सांगितला.. एक्स-रे मध्ये कळलं की त्याच्या जॉईंट मध्ये ग्याप आली आहे काही दिवस आराम करावा लागेल...


 पंधरा दिवसांनी गुणवानची क्रिकेट मॅच होणार होती, आता आराम कसा करायचा आता तर प्रॅक्टिसची वेळ आहे हा विचार मनात आणून गुणवानच्या डोळ्यात पाणी आलं... त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून स्मिताचे डोळे पाणावले...
ती त्याच्या जवळ जाऊन,


“ रडू नको बाळा... सगळं ठीक होईल..”

“ पण आई पंधरा दिवसांवर क्रिकेट मॅच आली, कसा खेळणार मी?.. मला खेळायचं आहे, या हाताला आत्ताच दुखापत व्हायची होती, असं का होतं माझ्यासोबत.. मी काहीतरी चांगलं कार्य करायला जातो आणि तिथे असंच होतं, मला खेळायच आहे ग...”


“ काळजी करू नकोस, आता चांगला आराम करशील तर पुढे चांगल खेळू शकशील.. आता जर आराम केला नाहीस ना तर ते वारंवार दुखत राहील…”


 “पण आई मला खेळायला जायचंय..”

“ बाळा आठ दिवस तरी तू चांगला आराम कर..”
 ते आठ दिवस गुणवाननी कसेतरी काढले, ते आठ दिवस त्याला आठ वर्षासारखे वाटायला लागले होते..


 दिवसभर घरी झोपून राहणे त्याला अवघड गेले होते, आठ दिवसानंतर तो आईला न सांगता ग्राउंडवर गेला आणि बॉलिंग प्रॅक्टिस करायला लागला पण त्याला पुन्हा दुखापत झाली आणि तो घरी आला....
“ आई.. आई..”
“ अरे काय झालं?..”
“ पुन्हा हात दुखतोय..”
“ तू खाली क्रिकेट खेळायला गेला होतास?..”

“ अरे बाळा सांगितलं ना काही दिवस आराम कर, आराम केला नाहीस ना तर हे दुखणं असच राहील, तुला काही दिवस आराम करावाच लागेल..”


“ पण आई क्रिकेट मॅच...”
“ तु जा क्रिकेट मॅच खेळायला... पण आता नाही आता प्रॅक्टिस नको आता प्रॅक्टिस करत राहिलास तर नेमकं मॅचच्या दिवशी तुला त्रास होईल, ऐक रे माझ्या राजा...”


 बाकीच्या मुलांनी छान प्रॅक्टिस केली, आठ दिवसानंतर सगळ्यांनी मॅचला जाण्याची तयारी केली सगळे गुणवानच्या घरी आले..
“ गुणवान तू येणार आहेस आमच्या सोबत?..”
“ हो, मला यायचा आहे पण..”
“ तुझा हात कसा आहे?..


“ बरा आहे, मला खेळायचा आहे.. आज बघ मी कसा खेळणार अगदी सगळ्यांना आऊट करेन...”
“ अरे पण तुला त्रास होतोय ना?...”


“ मला त्रास झाला तरी चालेल पण मला ही मॅच खेळायचीच आहे, मला दाखवून द्यायचे आहे की मी पण काहीतरी करू शकतो, मी तुमच्या सारखा नाहीये ना पण मी तुमच्यासोबत खेळू शकतो, मी माझ्या खेळातून दाखवून देणार मी पण काहीतरी करू शकतो हे सगळ्यांना कळायला हवं आणि यासाठी मला खेळायला हव.. मी खेळणार मला त्रास झाला तरी चालेल, थोडासा त्रास सहन करून मला जर माझ्या ध्येयापर्यंत जाता आलं नाही तर मी तो त्रास सहन करेल, चला मित्रांनो मी तयारी करतो. आपण भेटू खाली...”


गुणवान आणि स्मिता तयार होऊन गेले, यावेळी स्मिता सोबत केशव पण गेला त्याला पण आज आपल्या मुलाची क्रिकेट मॅच बघायची होती. सगळे तिथे पोहोचले आणि क्रिकेट मॅच सुरू झाली..


 गुणवानला पहिली बॉलिंग मिळाली, एक ओवर झाल्यानंतर गुणवानच्या हाताला अचानक दुखापत झाली, पण तरी तो थांबला नाही त्याने बॉलिंग सुरूच ठेवलं... आणि चार बॉल मध्ये दोन विकेट घेतल्या... सगळ्यांच्या टाळ्यांचा गडगडाट झाला, थोड्यावेळाने गेम संपला आणि गुणवानच्या टीमने दहा गुणांनी प्रगती केली,टीम जिंकली, गुणवानला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मिळाली...


 ती ट्रॉफी घेऊन तो घरी आला.. आजी-आजोबांना दाखवली.. आजी-आजोबा पण खूप खूप खूप खुश झाले आणि त्यांनी गुणवानला आशीर्वाद दिला की अशीच प्रगती करत रहा...
  क्रिकेटच्या प्रॅक्टिस सोबत गुणवानची पेंटिंग पण सुरु होती, हळूहळू पेंटिंग मध्ये गुणवान निपुण होऊ लागला...

 एकदा अशाच बाजूच्या काकू येऊन बसल्या,  गुणवान पेंटिंग करत होता.. त्याची पेंटिंग काकुला खूप आवडली आणि त्यांनी गुणवानला विचारलं,


“ गुणवान तू माझ्या परीला पेंटिंग शिकवणार?.. खूप छान पेंटिंग करतोस माझ्या परीला शिकवशील?..”
“ हो काकू शिकवेल ना, नक्की शिकवेल..”
 “गुणवान तू शिकवायचं, मी तुला त्याची फिस पण देणार आहे..”


“परी खूप लहान आहे तिला शिकवण्यात मला खूप आनंद मिळेल त्यात फिस वगैरे काय?...


“ तू घेणार नाहीस मला माहिती आहे, पण गुरुदक्षिणा म्हणून तुला ठेवावी लागेल..”
 गुणवानने हसून समोरच समोर बघू, तुम्ही परीला पाठवा अस सांगितलं.. 


 हे सगळं स्मिता बघत होती आणि स्मिताला गुणवानचा अभिमान वाटला, आपला गुणवान इतका मोठा झाला.. इतका छान विचार करायला लागला.. या गोष्टी तिला अभिमान वाटला...


क्रमशः


ही कथामालिका फ्री आहे, सबस्क्रिपशन लागणार नाही...

🎭 Series Post

View all