घे भरारी... भाग 7

Smitane gunvanla sansthet pathavlech nahi ti gharunach gunvancha abhyas ghyaychi

घे भरारी भाग 7


आधीच्या भागात आपण पाहिले की,

पोलिसांना गुणवानची माहिती मिळाली , पोलिसांनी गुणवानला शोधलं, तो सापडला आणि पोलिसांनी गुणवान कडून हे सगळं कोणी केलं याची माहिती मिळवली...

त्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांनी हे सगळं का केलं? कशासाठी केलं? याची पूर्ण माहिती मिळवली.. स्मिता आणि केशवनी गुणवानला घरी आणलं, स्मिताने गुणवानला आंघोळ घातली, त्याला नवीन कपडे घालून दिले आणि त्याच औक्षवंन केलं आणि त्याला बोलली की आता यापुढे मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, माझ्या नजरेच्या समोरच ठेवणार मी, तुला संस्थेत परत पाठवणार नाही....


 आता पुढे,


स्मिताने गुणवानला संस्थेत पाठवलेच नाही, ती घरूनच गुणवानचा अभ्यास घ्यायची, घरी शिकवण्यासाठी तिने एका शिक्षकाची नेमणूक केली होती..


 एक लेडीज शिक्षक आणि जेन्ड्स शिक्षक दोघेही घरी येऊन गुणवानला शिकवायचे, गुणवानची चित्रकलेची आवड बघता त्याला चित्रकला शिकवण्यासाठी चित्रकला शिक्षकांना पण बोलावलं, आणि चित्रकलेचा क्लास सुरू केला.... गुणवानच मन अभ्यासात कमी आणि चित्रकलेत जास्त रमायचं...

 गुणवान घरी असल्यामुळे स्मिता थोडी निश्चिंत झाली होती, दिवसभर गुणवानच करण्यात तिचा वेळ जायचा, पण तरी ती आनंदी होती... कारण चोवीस तास गुणवान तिच्या डोळ्यासमोर असायचा....

 एकदा स्मिता बाजारात गेली होती, गुणवाननी रेडिओवर गाणी लावली, आवाज मोठा झाला.. त्याला कमी करता येईना...

इतक्यात शेजारच्या  जाधवकाकू आल्या आणि गुणवानला नाही नाही तसं बोलल्या... त्याच्या डोळ्यात पाणी आलं, तो हिरमसून सोफ्यावर जाऊन बसला, थोड्या वेळाने स्मिता घरी आली.. तर रेडिओचा आवाज एवढा मोठा होता आणि गुणवान सोफ्यावर बसलेला होता.. तिने आधी रेडिओ बंद केला आणि गुणवान जवळ जाऊन बसली,
“ बाळा.. काय झालं? असं का बसलास...”

 “आई रेडिओचा आवाज खूप मोठा झाला होता, मला तो कमी करता आला नाही.. बाजूच्या जाधव काकू येऊन मला खूप ओरडल्या...”

 “बाळा तू नरवस होऊ नकोस, मी बोलते जाधव काकूशी.. स्मिता पटकन जाधव काकूकडे गेली..
“ काकू.. काकू....”
“ काय ग स्मिता....?”
 “काकू…. माझा मुलगा...”

 स्मिता समोर काही बोलणार तितक्यात जाधव काकू बोलल्या...

“ त्याचं तर काही बोलूच नको किती मोठा आवाज करून बसला होता तो, त्याला आवाज कमी कर म्हटलं तरी त्याला करता येईना....”

“ मान्य आहे तो आवाज मोठा करून बसला होता.. अहो त्याच्या हाताने चुकीने आवाज मोठा झाला त्याला कमी करता येईना म्हणून तू चुपचाप होता पण तुम्ही त्याला समजून न घेता त्याला नको नको ते बोललात, हिरमसून बसला होता तो..”

 “मग मी काय करू?....


“  काही करू नका तुम्ही, पण कमीत कमी त्याला बोलू तरी नका, तुम्हाला माहिती आहे ना बाकीच्या मुलांसारखा नाहीये तो.. त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागते, स्पेशल अटेन्शन द्यावा लागतो.. तुम्हाला त्याच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलता येत नसतील ना तर त्याच्यावर रोषही दाखवू नका, माझी तुम्हाला विनंती आहे..”

 अस म्हणत स्मिता तिथून निघून गेली, स्मिताने घरी येऊन गुणवानची समजूत घातली, गुणवान खूश झाला आणि खाली खेळायला गेला...

 खाली पार्किंग मध्ये गुणवान बाकावर बसला, त्याच्या बरोबरचे सगळे मुलं खेळत होते, गुणवान पण खेळायची इच्छा झाली...

 सगळी मुले क्रिकेट खेळत होते, खेळता-खेळता बॉल गुणवानच्या पायाशी आला, गुणवाननी तो बॉल पकडला आणि सरळ दिशेने फेकला तो सरळ स्टॅम्पला जाऊन लागला आणि तिथला एक खेळाडू रण आऊट झाला... रन आउट झालेला मुलगा खूप चिडला, तो गुणवानकडे आला,


“ काय गरज होती तुला माझ्या बॉलला हात लावायची?... हात लावलास वरून मला आऊट केलस,  समजतोस काय तू स्वतःला?.... स्वतःची अक्कल तर आहे नाही उगाच फालतू काम करतोय.. यानंतर माझ्या खेळात लक्ष घालायचं नाही,  मी फक्त सांगतोय तुला.... काय सांगितलं लक्षात राहील  माझ्या बोलला हात लावायचा नाही.....”

“ नाही लावणार....”
 तितक्यात दुसरा मुलगा आला
“ अरे छान बॉल मारलास, ये बघ ना तुला रन आऊट केलं, अजून काय हवंय.. आपल्याकडे असा खेळाडू राहिला तर आपण नक्कीच जिंकू आणि ही तर प्रॅक्टिस आहे...

 आपण याला घेऊया आपल्या टीम मध्ये, मॅच मध्ये जर हा आपल्या सोबत राहिला तर आपली टीम जिंकेल...”

“ ये वेड आहेस का तू?... ह्या मुलाला तू टीममध्ये घेतलंस तर  सगळे वेड्यात काढतील आपल्याला...”

“ अरे पण मी काय म्हणतो त्याला एकदा चान्स घ्यायला काय हरकत आहे...”
 “गुणवान चल आमच्यासोबत खेळायला....”
 गुणवान गेला..

 त्यांनी गुणवानच्या हाती बॉल दिला आणि बॉलिंग करायला सांगितले, जस गुणवाननी बॉलिंग केल, तसच समोरच्याने तो बॉल जाणून बुजून गुणवानच्या डोक्याकडे फिरवला, आणि तो बॉल गुणवानच्या डोक्याला लागला.. तसाच किंचाळत गुणवान खाली बसला आणि


“ लागलं.. लागलं..”
 असं ओरडायला लागला...
“ लागलं.. लागलं.. अरेरे लागलं माझ्या बाळाला…..”
अस म्हणत एक मुलगा चिडवायला लागला.. आमच्या सोबत खेळायचे होते, बॉलिंग करायची होती.. एका मुलाने असं बोलून त्याला डिवचल.. खरं तर त्या मुलांची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी हे जाणूनबुजून डावपेच केला...

 गुणवान रडत रडत घरी गेला आणि त्याने घरी जाऊन सगळं स्मिताला सांगितलं...
 तशीच स्मिता खाली आली,


“ काय रे पोरांनो.. का बॉल मारला तुम्ही त्याला?...
“नाही काकू आम्ही काही नाही केलं...

 “खोटे बोलू नका त्यानी सांगितले तू जाणून त्याच्याकडे बॉल फिरवलास..”
 “काकू मी जाणून बुजून कशाला करील, त्याला खेळण्याची हाऊस होती ना... तो खेळला आणि चुकून त्याला बॉल लागला एवढच..”

“ तुम्ही स्वतःला खूप शहाणी समजताना.. तुम्ही शरीर आणि बुद्धीने मजबूत आहात म्हणून स्वतःला शहाणे समजता?.. हा शरीराने वाढला असलाना तरी बुद्धीने आणि मनाने तो अजूनही लहानच आहे... तुम्ही त्याला समजून घ्यायला हवं, त्याला तुमच्यात घेऊन त्याला खेळवायला हव... तुम्ही त्याची टिंगल उडवता, त्याची मजा बघत आहात.. तुमच्यासारखा नॉर्मल नाहीये तो.. तुम्हाला कळतय का तो ॲबनॉर्मल आहे...”
 स्मिता डोळ्यात पाणी आणून त्यांना सांगत होती..

 सगळे मुले शांत झाले..


 स्मिता गुणवानला घेऊन घरी गेली, काही क्षण मुले तशीच उभी होती त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातून चूक झाली आहे, ते गुणवानच्या घरी गेले,
“ गुणवान.. गुणवान... मुलांनी आवाज दिला...
 स्मिता बाहेर आली
“ खाली त्रास दिला तो कमी होता का की पुन्हा वरती त्रास द्यायला आलात तुम्ही....”


“ नाही काकू आम्हाला आमची चूक कळली आम्ही गुणवानची माफी मागायला आलोय..


 त्यातला दुसरा बोलला 
“हो काकू खरच आम्हाला आमची चूक जाणवली, आम्ही त्याच्याशी चुकीचे वागलो आम्हाला त्याच्याशी बोलू द्या काकू प्लीज...”


 मुलांनी विनंती केली म्हणून स्मिताने मुलांना गुणवानशी बोलण्याची परमिशन दिली, गुणवान सोफ्यावर बसलेला होता


“ गुणवान आम्हाला माफ कर आम्ही चुकलो आम्ही तुझी टिंगल करायला नको होती, आम्ही तुला समजून घ्यायला हवं होत..”
“ तुला आवडतं ना क्रिकेट खेळायला?..”


 गुणवाननी होकारार्थी मान हलवली.
“ तू खेळणार आमच्यासोबत?.. तू आमच्या टीमचा मेंबर हो, मग आमची टीम जिथे जिथे खेळायला जाईल आम्ही तुला आमच्या सोबत  घेऊन जाऊ..येशील ना आमच्या सोबत?..
 गुणवाननी पुन्हा होकारार्थी मान हलवली... सगळे मुले त्याला जाऊन बिलगली आणि खूष झाली...


 मुलांचा आणि गुणवानचा आनंदी चेहरा बघून स्मिताला पण आनंद झाला... 


क्रमश:


 गुणवानच्या आयुष्यात नेमकं काय काय घडेल बघूया पुढील भागात.. 


ही कथा फ्री आहे,ही कथा वाचण्यासाठी सबस्क्रिपशन लागणार नाही..

🎭 Series Post

View all