घे भरारी... भाग 6

Polisanni tya thikani chaukashi suru keli

घे भरारी भाग 6


आधीच्या भागात आपण पाहिले की,


गुणवानच अपहरण झालं पण संस्थेत कुणालाच माहीत नव्हतं..केशव स्मिता आले तेव्हा त्यांना कळलं...


 पोलिसांना सांगितलं तर आम्ही तुमच्या मुलाला मारून टाकू अशी धमकी त्यांनी दिली होती, त्यामुळे केशवने संस्थेत सांगितलं की तुम्ही काहीही करा पण माझ्या गुणवानला मला परत आणून द्या...


स्मिताच्या दूरच्या आत्याने फोन करून सांगितलं की तिला गुणवान सारखा मुलगा दिसला, नाही नाही तर तो गुणवानच होता, मी त्याच्या जवळ गेल्यावर तो पळाला.. ही सगळी माहिती स्मिताने पोलिसांना दिली पोलिसांनी तपास सुरू केला

आता पुढे,


पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी सुरू केली, जास्त माहिती मिळाली नाही पण तिथे एक माणूस ठेवण्याचा निर्णय घेतला.. रोज पोलिसांचा एक माणूस तिथे असायचा आणि तो त्या ठिकाणी नजर ठेवायचा, कोण येतं कोण जातं....

 असाच एक दिवस एक मुलगा मळकट कपड्यातला डोक्यावर दुपट्टा घेऊन चेहरा झाकणारा मुलगा दिसला... पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तो काहीच बोलला नाही, त्याचा चेहराही ओळख दाखवत नव्हता...

 पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले, तेव्हा त्याने त्याचे नाव सांगितलं आणि ओळख पटली कि तो गुणवान आहे, गुणवानच्या आई-बाबांना बोलवण्यात आलं आणि त्यानंतर गुणवानला हे सगळं कोणी केलं? का केलं?.. त्याच्याकडून सगळी माहिती काढली...

 त्या संस्थेत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी गुणवानला किडनॅप केलं, त्या दोन कर्मचाऱ्यांची नावे गुणवाननी सांगितली आणि पोलिसांनी लगेच ताफा संस्थेकडे फिरवला, पोलीस संस्थेत गेले,


“ काय झालं साहेब....?


“ मार्कंड आणि देविदास कुठे आहेत?..
“ काय झालं साहेब?... आहेत ना ते पण आज कामावर नाही आलेत...


“ त्यांना फोन करा आणि इकडे बोलून घ्या...


“ साहेब काय झालं?...


“ तुमच्या दोन कर्मचाऱ्यांनी गुणवानला पळवल होत, आता गुणवान आमच्या ताब्यात आहे आणि त्यानी त्या दोघांची नावे सांगितली आहेत, त्यामुळे आम्ही त्याला अटक करायला आलोय...

“ काय?.. नाही हो साहेब, ते खूप वर्षापासून येथे काम करतात असं कसं करतील ते....


“ तेच आम्हाला जाणून घ्यायचं की ते असं कसं करतील,  तुम्ही त्यांना ताबडतोब बोलवून घ्या...


“ हो सर, तुम्ही बसा मी फोन करते त्यांनी....
वॉर्डननी फोन लावला, मार्कण्डनी फोन नाही उचलला, देविदासला लावला.. देविदासनी उचलला


“ हॅलो देविदास.. कुठे आहेस?..


“ मॅडम मी जरा बाहेर आहे..
“ संस्थेत ये आता.. मला तुझ्याशी बोलायचं आहे..
“ आता नाही येऊ शकणार...


“ हे बघ देविदास... तुला आत्ताच यावं लागेल नाहीतर तू जिथे कुठे असशील ना तिथे मी तुला हुडकून काढील, येतोय ईकडे की नोकरीवरून काढून टाकू....


“ नाही नाही मॅडम येतो मी... असं मला देविदासनी फोन ठेवला, अर्धा तासात देविदास हजर राहिला.…


 पोलिसांना पाहून तो दचकला पोलिसांना त्याला पकडून मार्कण्डला फोन लावायला सांगितला,त्याने फोन नाही उचलला पण थोड्यावेळाने त्याने फोन उचलला आणि बोलला..


 “मार्कन्ड कुठे आहेस?.. संस्थेत लवकर ये..
“ नाही रे, आता नाही येत... त्या पोराची यायची वेळ झाली...
“ मार्कंड पोरगा आता नाही येणार, तु इकडे ये मला तुझ्याशी काम आहे....


“ अरे असा कसा पोराला एकटा टाकुन येऊ?..अस कस चालेल आपलं काम अजून पूर्ण व्हायचं माहिती आहे ना तुला...

“ मार्कड आपल काम आता पूर्ण  होणार नाही....
“का?.. असं का बोलतेस?.. पोरगा पळाला का?..


“ नाही नाही तो नाही पळाला, पण मला तुला अजून काही दाखवायचे आहे तुला, काही सांगायचे आहे तूला... तू ये इथे आपण इथेच बोलू तसही कोणी नाही आहे इथे...
“ मी येतो...


 देविदासनी खोटं बोलून मार्कण्डला बोलावून घेतलं.. थोड्या वेळाने मार्कंड संस्थेचे आला, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं... पोलीस स्टेशनला नेलं... तिथे गुणवान आणि गुणवानचे आई बाबा बसले होते..  


त्या दोघांना बघताच स्मिता,


“ काय रे माझ्या पोराला किडनॅप केलं, माझा मुलगा कमी बुद्धीचा आहे तुम्ही असा गैरफायदा घेतला, त्याला कामाला लावलं, काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून, काय मिळालं?.. सांगा.. त्याला कामाला लावून त्याच्याकडून काम करून घेतलं आणि वरून तुम्ही आम्हाला पैसे मागत होतात... का केले तुम्ही सगळं सांगा...


 मार्कंड आणि देविदास आधी काही बोलायला तयार नव्हते पण पोलिसांनी पोलिसांचा हिसका दाखवताच पटापट पोपटासारखे बोलायला लागेल,


“ साहेब मारू नका सांगतो आम्ही देविदास बोलला 
“साहेब आम्हाला संस्थेत खूप कमी पगार मिळतो, आमच घर चालत नाही, आमचं भागत नाही.. आमच्या डोक्यात असा प्लान झाला की आपण असं काहीतरी करायचं त्यातून आपल्याला पैसा मिळेल आम्ही गुणवानला पळवून नेले,त्याच्या कडून काही काम करवून आपण पैसे कमवू असा विचार डोक्यात आला आणि आम्ही गुणवान ला पळवल...त्याला पळवून मार्कन्डच्या शेतीच्या खोलीत ठेवलं, 
“हे बघ आता तुला इथेच राहायचं आहे, आता हेच तुझं घर आहे...आणि उद्यापासून कामावर जायचय, हाताला जे काम आलं ते करायचं, समजलं .....


“नाही मी कुठेही जाणार नाही, मी कोणतंही काम करणार नाही...
“ जास्त शहानपन करायचा नाही जेवढं सांगितलं ना तेवढेच करायचं...


“ नाही मला इथून जाऊ द्या, मला दादा कडे जाऊ द्या... मला राजन दादाकडे नेऊन द्या...


“तुला जायचं नाहीये, तू आता इथेच राहायचं, इथे राहून तुला काम करायच आहे... आमच्यासाठी काम तू करायचं आणि त्याचे पैसे तू आम्हाला द्यायचे आणि जास्त जर केलंस ना तर तुझं तोंड कायमच बंद करू.. समजलं...


 गुणवान काम करायला तयार नव्हता आणि त्याला असे बोलून बोलून त्याच्याकडून काम करून घ्यायचो, मग आम्ही त्याच्या आई-बाबांना फोन केला ते घाबरून आपल्याला पैसे देतील हा विचार आमच्या मनात आला, त्यांना फोन केला आणि त्यांच्याकडे पैशाची मागणी केली...


“ आणि काय काय केले तुम्ही त्याच्यासोबत?...

“ साहेब आम्ही त्याला फाटके कपडे द्यायचो आणि कामाला पाठवायचो, पण तो काहीच काम करायचा नाही.. दोन-तीन दिवस त्यानी काहीच केलं नाही मग आम्ही त्याच्या हातात भांड दिल आणि मंदिरासमोर बसवलं, येणारे जाणारे त्याच्या भांड्यात पैसे टाकायचे...


 त्याच हे बोलणं ऐकताच केशव उठून आवाज मोठा केला, त्यानी मार्कन्डची कॉलर पकडली,


“ माझ्या पोराला कामाला लावलेस, तू माझ्या गुणवानला भिक मागायला लावली... तो आमचा जीव की प्राण आहे, आमच्या घरची शान आहे, आमचा अभिमान आहे, त्याला तू भिकेला लावलं ...


माझा मुलगा आयुष्यात इतका मोठा होईल त्याला कधी भीक मागायची गरच पडणार नाही, तुम्ही त्याला भिक मागायला लावली.. पाप केलं तुम्ही, खूप मोठे पाप केलं, देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही.. कधीच माफ करणार नाही...

“ साहेब माफ करा.. माफ करा आम्हाला.. आम्ही सगळ पैशासाठी केलं, आता आम्हाला आमची चूक कळली.. मेहनत केल्याने पैसा मिळतो मेहनतीचं फळ मिळत आधी मेहनत करायला हवी आम्ही चुकलो साहेब माफ करा.

“ मी तर तुम्हाला कधीच माफ पाप करू शकणार नाही, ते पोलिसही तुम्हाला माफ करणार नाही, शिक्षा तर तुम्हाला होईल...


 असं म्हणत गुणवान, स्मिता आणि केशव घरी गेले... पोलिसांनी केस फाईल केली, आता ती केस कोर्टात जाणार होती...


  घरी आल्यानंतर स्मिताने  सगळ्यात आधी गुणवानला अंघोळ घातली, त्याला छान नवीन कपडे घालून दिले आणि त्याचा औक्षवन केलं आणि भावुक झाली


“ माझा गुणी, माझा राजा मी आता तुला माझ्या नजरेसमोरून कधीच दूर करणार नाही, कधीच मी तुला माझ्यापासून दूर करणार नाही... राजा आता मी तुला संस्थेतही नाही पाठवणार.... तू माझ्या जवळ राहायचं, तू आता माझ्या डोळ्यासमोर राहणार आहेस, मी तुला कुठेही पाठवणार नाही असं म्हणत ती त्याला बिलगली...


 एका आईचं अंतकरण भरून आलं...


क्रमशः


ही कथा फ्री आहे, सबस्क्रिपशन लागणार नाही..

🎭 Series Post

View all