घे भरारी... भाग 5

Gunvanla aadhi kahi divas tithe tras zala

घे भरारी भाग 5

आधीच्या भागात आपण पाहिले की,

केशव आणि स्मिता गुणवानला संस्थेत सोडून आले ...पण इकडे स्मिताचे रडुन रडून हालबेहाल झाले..आपला मुलगा आपल्याशिवाय कसा राहील या विचाराने तीच मन भरून येत होत. 

रोजच्याप्रमाणे त्याच्या रूम मध्ये जाऊन त्याला आवाज दिला आणि लक्षात आलं की गुणवान नाही, लगेच स्मितानी वॉर्डनला फोन केला आणि त्यांनी गुणवानशी बोलणं करून दिल..
फोनवर गुणवान पण व्याकुळ झाला होता...

केशवनी स्मिताला जवळ घेऊन दिलासा दिला की सर्व ठीक होईल..

आता पुढे,

गुणवानला आधी काही दिवस तिथे त्रास झाला... त्याला आईची सवय झाली होती, त्याच्या प्रत्येक गोष्टीत आई त्याच्या सोबत असायची..आईच्या आठवणीने त्याचा जीव कासावीस व्हायचा...बोलावं तर जवळ मोबाईल नाही, वॉर्डन दिवसातून एकदाच फोन करू द्यायची...

एका रात्री आईच्या आठवणीत गुणवान न जेवताच झोपला.... कुणाच्या तरी स्पर्शाने दचकून उठला पाहतो तर एक मुलगा त्याच्या बाजूला बसून त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता....

गुणवान आईच्या आठवणीत जेवला नाही,तसाच झोपला ही गोष्ट त्या मुलाला समजण कठीण पण तरी त्यानी समझुन घेतलं ही खूप कौतुकाची गोष्ट होती....


गुणवान दचकून उठला आणि घाबरून त्या मुलाकडे बघू लागला...


“अरे ,घाबरू नकोस..मी राजन..मी खूप वर्षांपासून इथे राहतो... तू न जेवताच झोपला ना म्हणून मी जेवण घेऊन आलोय...


घाबरू नकोस मी तुला काहीच करणार नाही, मला तुझा मोठा भाऊ समज...तुला कोणी बहीण भाऊ आहे...?..

गुणवाननी नकारार्थी मान हलवली...

राजन हसून,
“नाही ना...मला माहित होतं...
गुणवान विचारात पडून,
“कस?.


“अरे..आपल्या सारख्या मुलांना भाऊ बहीण नसतात...आपले पालक आपल्याला नवीन नाती देतच नाहीत, त्यांना अस वाटत आपल्याला भावना नाही, आपल्याला काय कळणार, पण त्यांना हे कळत नाही की आपण मतिमंद असलो तरी आपल्याला सगळं कळत....

पण तू काळजी करू नकोस आता आपण भाऊ भाऊ...चालेल ना तुला..


“हो.


राजननी गुणवानला जेवण भरवल आणि गुणवानही त्याच्या हातानी पोटभर जेवला...
राजननी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याला झोपवलं..


दोघात घट्ट नात निर्माण झालं...


हळूहळू दिवस, महिने, वर्ष उलटली...
राजन काही छोटी मोठी कामे करायचा...आणि ते सगळं गुणवानही शिकत होता...


सगळं सुरळीत सुरू होत...पण म्हणतात ना, नियती कधी पान पलटेल सांगता येत नाही....नियती क्रूर असते, कधी कुणाशी काय डाव खेळेल कळत नाही.....


संस्थेतल्या काही क्रूर माणसांनी डाव साधून गुणवानला किडनॅप केलं... त्यांना केशव आणि स्मिता कडून पैसे हवे होते...


पोलिसात जाल तर मारून टाकू अशी धमकी दिली...


फोन येताच केशव आणि स्मितानी संस्थेत धाव घेतली...
तिथल्या वॉर्डनला बघून केशव बोलला..


“कुठे आहे आमचा गुणवान..? कुठे आहे?..तुमच्या संस्थेतून तो गायब झाला आणि तुम्ही आम्हाला कळवलं सुद्धा नाही...

असे कसे वागू शकता तुम्ही, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही आमचा विश्वासघात केला....सांगा कुठे आहे माझा मुलगा...

“अहो शांत व्हा आधी..काय बोलताय तुम्ही?..
कोण गायब झाला?..
“आमचा मुलगा गुणवान...

“काय?...गुणवान गायब झाला..तुम्हाला कोणी सांगितलं..
“आम्हाला फोन आला होता..पोलिसात सांगाल तर जीवे मारू असे म्हणाले, त्यांनी पैशाची मागणी केलीय....


इतकी सीक्युरिटी असून सुद्धा माझा मुलाचं अपहरण झालं..
वॉर्डनला हे सगळं खोट वाटत होत पण खरच जेव्हा गुणवान दिसला नाही तेव्हा त्यांच्या लक्षात आलं..


“हे बघा, आम्ही पोलिसात गेलो तर ते गुणवानच्या जीवाच काही बर वाईट करतील,
 तुम्हीच काय ते तक्रार नोंदवा...काय करायचं ते बघा, मला माझा मुलगा हवाय...


स्मिता आणि तिच्या सासूचे रडून रडून हाल झाले होते....

पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली, तपास सुरू झाला, किडण्यापरच्या लक्षात आलं त्यांनी त्वरित केशवला फोन केला...


“आम्ही संगीतल होत ना पोलिसात तक्रार करायची नाही तरी केली आता चोविस तासाच्या आत पैसे घेऊन घाटावर या नाहीतर तुमच्या मुलाचा मृतदेह बघा....

“अहो..नाही..नाही , मी पैसे देतो..पण तुम्ही माझ्या मुलाला काही करू नका...मी येतो उद्या...


केशव समोर काही बोलणार फोन बंद झाला...


“केशव किती पैसे सांगितले त्यानी...
“माहिती नाही ग, करतील ते फोन, मी काही बोलायच्या आत फोन बंद झाला...


केशव फोनची वाट बघत बसला होता,, आता फोन येईल या आशेवर दोन दिवस गेले...या दोन दिवसात ना फोन आला ना मॅसेज..

एक एक क्षण घालवणं दोघांसाठी खूप त्रासदायक होत, एक एक दिवस एका वर्षीप्रमाणे वाटतं होते..


गुणवान कुठे असेल काय करत असेल,जेवला असेल की नाही असे प्रश्न स्मिताला विचारात पाडत होते..


दिवसामागुन दिवस गेले..किडनॅपरचा फोन आलाच नाही..

स्मिता दिवस रात्र फोनजवळ बसून असायची...पोलिसांनी पण तपास थांबवला...कुठून काहीच बातमी कळली नाही..केशवनी ऑफीसला जाणे बंद केले...स्मितानी जेवण सोडलं...तिची तब्बेत खूप खालावली... एक दोनदा ऍडमिट करावं लागलं...केशवनी ऑफिसला जाण बंद केल्यामुळे  नोकरीतून काढण्यात आल... त्याची नोकरी गेल्यामुळे घरची आर्थिक स्थिती बिघडली...


बिकट परिस्थिती निर्माण झाली... स्मिता आणि केशव हताश झाले, त्यांनी आशा सोडली...


एक दिवस दूरच्या नातेवाईकचा फोन आला..


“हॅलो...अग स्मिता बोलतेस का?..
“हो आपण कोण?...
“अग विमलआत्या बोलते...
“हम्म, बोला आत्या..


“अग, गुणवान बद्दल काही महिती मिळाली का?...
“नाही आत्या, अजून तरी माहिती मिळाली नाही..
“मी तुला काहीतरी सांगण्यासाठी फोन केला...


“बोला ना आत्या...
“अग मी आज गुणवानला बघितलं...खूप वाईट स्थितीत होता..


“वाईट स्थितीत म्हणजे?...कुठे दिसला तो तुम्हाला?..आत्या सांगा ना...


“अग हो..हो..

मी मार्केट मध्ये गेले होते भाजी घेता घेता अचानक ओट्याकडे लक्ष गेल.....एक मुलगा कटोरा घेऊन बसला होता ,अंगावर फाटके मळके कपडे...केस विस्कटलेले....चेहऱ्यावरून घाबरल्यासारखा दिसत होता...


“आत्या..तुम्ही नीट बघितलं का?.. तो आपला गुणवानच होता का...आणि तो तिथे कसा.??


“ते मला काही माहीत नाही…..मी त्याच्या जवळ गेले तर तो मला बघून भूत बघितल्यासारखा पळून गेला...


“आत्या..तुम्ही त्याच्या मागे का नाही गेलात,... आपल्याला काहीतरी माहिती मिळाली असती...


“अग मग मी गेले त्याच्या मागे पण तो स्पीडनी धावला ग,माझ्या वयोमानानुसार नाही होत ग...


“बर बर आत्या, मी ठेवते, तुम्हाला अजून काही कळलं तर नक्की कळवा, मी पण पोलीस ठाण्यात जाऊन सांगून येते...आत्या तिथचा पत्ता मला पाठवा, मी लगेच निघते...


स्मितानी फ़ोन ठेऊन लगेच केशवला फोन केला


“हॅलो केशव मी पोलीस ठाण्यात चालले तू पण तिथेच ये..
आणि हो, जरा लवकर ये...


“अग पण झालं तरी काय?..


“मी तिथे पोहचल्यावर सांगते, ये लवकर.…दोघांनीही फोन ठेवला आणि निघाले.... 

स्मिता आणि केशव पोहोचले, स्मितानी पोलीसांना सर्व घटना सांगितली...पोलिसांनी पण आश्चर्याचकित होऊन बघितल...
“अस कस शक्य आहे...


“आपण चौकशी करायला काय हरकत आहे...
“मला माझा मुलगा शोधून द्या हो....आता आशेची किरण मला दिसत आहे..


“तुम्ही शांत व्हा प्लीज..


आपण पूर्ण प्रयत्न करू...तुम्ही एकटे नाही आहात..
आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत...
“हो म्हणून तर मी इथे आले...


पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला...आत्यानी सांगितलेल्या ठिकाणी चौकशीनंतर काहीच माहिती मिळाली नाही..
तिथल्या एका फुलवाल्याने सांगितलं की एक मुलगा इथे बसायचा पण काही दिवसांपासून तो दिसत नाही आहे...


“तुम्ही त्याची काही माहिती देऊ शकता?..
“हो हो..नक्की..

हे बघा साहेब, मी त्याला जवळून नाही बघितलं.. पण तो तसाच दिसला... 


“ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता..


आत्यानी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली...


क्रमश:


काय झालं असेन गुणवानच्या आयुष्यात,?..कोणी किडनॅप केलं असेल, संस्थेतल्या लोकांनी की अजून कोणी...


समोर काय होईल जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा


धन्यवाद..


ही कथा फ्री आहे, याला सबस्क्रिपशन लागणार नाही ..


 

🎭 Series Post

View all